शासकीय/निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती करणेबाबत स्पष्टीकरण Shikshan Sevak Vetananischiti

Shikshan Sevak Vetananischiti

Shikshan Sevak Vetananischiti

shasakiya/nimshasakiya sevetun shikshan sevak padavar niyukt honarya umedvaranchi vetananischiti karanebabat spashtikaran

Clarification regarding salary determination of candidates appointed to the post of Education Servant from government/semi-government service

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

शासकीय/निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती करणेबाबत स्पष्टीकरण

दिनांक : १५ जून, २०२६.

संदर्भ :शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समक्रमांक, दि. १८.०२.२०२६

शासन परिपत्रक :

नियमित शासकीय सेवेतील अथवा ज्याचे वेतन अनुदान शासनामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अदा केले जाते, अशा नियमित निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच या विभागाच्या अधिपत्याखालील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये/शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा या शाळांमधील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक पदावर विहित पध्दतीने नियुक्ती होतो, त्यावेळी त्यास वेतन संरक्षण देण्यासाठी त्यांची वेतन निश्चिती कशाप्रकारे करण्यात यावी, याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

वाचा –

संदर्भ :शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समक्रमांक, दि. १८.०२.२०२६ पीडीएफसाठी या ओळीला स्पर्श करा

२. वेतन संरक्षण व वेतननिश्चितीबाबत उपरोक्त प्रमाणे तरतूदी करण्यात आल्या असल्या तरी या शासन निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्रिय स्तरावर होत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी व पात्र उमेदवारांकडून प्राप्त होत आहेत. वस्तुतः संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहेत. असे असतानाही क्षेत्रिय कार्यालयांकडून सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतची अनास्था अनाकलनीय आहे. प्राप्त झालेल्या निवेदनांद्वारे काही मुद्दांबाबत अधिकचे स्पष्टीकरण अपेक्षिले आहे. हे मुद्दे व त्याबाबतचे शासनाचे स्पष्टीकरण याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र. ८७२/टीएनटी-१ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

शासकीय/निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती करणेबाबत स्पष्टीकरण Shikshan Sevak Vetananischiti
शासकीय/निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती करणेबाबत स्पष्टीकरण Shikshan Sevak Vetananischiti

Leave a Comment

error: Content is protected !!