Shalapurv Tayari Abhiyan
Shalapurv Tayari Abhiyan
Shalapurv Tayari Abhiyan 2026-27 Chi Yashasvi Amalbajavani
Regarding the successful implementation of the Pre-School Readiness Campaign 2026-27
शाळापूर्व तयारी अभियान २०२६-२७ ची यशस्वी अंमलबजावणी करणेबाबत परिपत्रक
विषय:- शाळापूर्व तयारी अभियान २०२६-२७ ची यशस्वी अंमलबजावणी करणेबाबत.
संदर्भ : शाळापूर्व तयारी अभियान सन २०२२-२३ ते २०२४-२५.
उपरोक्त विषयान्वये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) यांचे मार्फत प्रथम संस्थेच्या सहकार्याने एप्रिल ते जून या दरम्यान “पहिले पाऊल” शाळापूर्व तयारी अभियान शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ते २०२४-२५ ह्या शैक्षणिक वर्षात राबविण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून असे दिसून आले की, शाळेत जाण्यापूर्वी पहिलीत दाखलपात्र मुलांची माता / पालक घरीच शाळापूर्व तयारी करून घेतात. ज्यामुळे पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवश्यक पूर्वतयारी होते आणि विद्यार्थ्यांना पुढील अध्ययन करणे सुलभ जाते.
सर्व शाळांना या अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात व यशस्वितेचा अनुभव असल्याने शैक्षणिक वर्ष २०२६-
२७ मध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्याची शाळापूर्व तयारी करून घेण्याच्या दृष्टीने सदर उपक्रम विना अर्थ सहाय्य तत्वावर राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ माहे एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात आणि मेळावा क्र. २ माहे जून २०२६ मध्ये आयोजित करण्यात यावे. दोन्ही मेळाव्यादरम्यान ६ ते ७ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करावी.
आणि हो हेही वाचाल –
संदर्भीय परिपत्रके शाळापूर्व तयारी अभियान सन २०२२-२३ ते २०२४-२५ वाचा या ओळीला स्पर्श करून
संदर्भीय परिपत्रके शाळापूर्व तयारी अभियान सन २०२४-२५ वाचा या ओळीला स्पर्श करून
अ.क्र. उपक्रम तपशील सहभागी कालावधी आयोजन जबाबदारी
१ राज्यस्तरीय online बैठक शिक्षणाधिकारी (प्राथमिक), DIET प्राचार्य व जिल्हा नोडल अधिकारी, ICDS विभाग प्रतिनिधी, प्रथम संस्था (प्रत्येकी १ व्यक्ती) = ५ (प्रत्येक जिल्ह्यातील) १ दिवस (ऑनलाईन) दि. २४ एप्रिल २०२६ SCERTM पुणे
२ शाळास्तर मेळावा क्र. १ मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, लीडर माता, माता, स्वयंसेवक १ दिवस (प्रत्यक्ष) दि. २७ एप्रिल ते १ मे २०२६ यापैकी कोणताही एक दिवस) मुख्याध्यापक, शिक्षक
३ शाळापूर्व तयारीच्या कृती/उपक्रम माहे एप्रिल ते जून २०२६ दरम्यान इयत्ता पहिलीत दखलपात्र बालके, पालक, लीडर माता, माता, स्वयंसेवक ६ ते ७ आठवडे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका
४ शाळास्तर मेळावा क्र. २ मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, लीडर माता, माता, स्वयंसेवक १ दिवस (प्रत्यक्ष) दि. १५ ते २० जून २०२६. मुख्याध्यापक, शिक्षक
क) राज्यस्तरावरील अंमलबजावणीचे स्वरूप
उपरोक्त तक्त्यातील अ.क्र. १ मध्ये नमूद सर्वांसाठी राज्यस्तरावरून online बैठकीचे झुमच्या माध्यमातून आयोजन दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय online बैठकीची लिंक स्वतंत्रपणे whatsapp गटावर शेअर करण्यात येईल.
ब) जिल्हास्तरावरील अंमलबजावणीचे स्वरूप
१. राज्यस्तरीय online बैठकीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), DIET प्राचार्य व जिल्हा नोडल अधिकारी, ICDS विभाग प्रतिनिधी यांनी वेळेत उपस्थित रहावे.
२. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांना शाळापूर्व तयारी अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर पत्र तातडीने निर्गमित करावेत.
३. आवश्यकतेनुसार क्षेत्रीय यंत्रणेची online बैठक आयोजित करून सर्वांना शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उत्साहात आयोजन करणे व शाळापूर्व तयारी मेळाव्यास भेटी देण्याबाबत सूचना द्याव्यात.
४. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे नियोजन करावे.
५. विहित कालावधीत जिल्हा ते केंद्र स्तरावरील सर्व क्षेत्रीय अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळामध्ये शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ व २ साठी उपस्थित राहतील यासाठी नियोजन करावे.
६. उपस्थित पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांनी राज्यस्तरावरून दिलेल्या https://gpconnect.prathaminsights.in/gp/MH/home/srm या लिंकवर शाळास्तरावरील पहिल्या मेळावा भेटी संदर्भातील माहितीची नोंद शाळा परिसरातील माता पालक यांचे मार्फत बालकांच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेवून व त्याचे निरीक्षणाची नोंद दुसऱ्या मेळाव्याच्या वेळी नमुना आधारित मूल्यांकन (SBA) 7-10 दाखलपात्र मुलांची विकासपत्र मधील पहिल्या मेळाव्याची आणि दुसऱ्या मेळाव्याची माहितीची नोंद, अशा प्रकारे तिन्ही प्रकारच्या नोंदी भराव्यात.
५. मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #Shalapurva Tayari Abhiyan२०२६, व #शाळापूर्वतयारीअभियान२०२६ या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रच्या http://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टेंग करण्यात यावे.
६. जिल्ह्यातील शाळापूर्व तयारी अभियान २०२६-२७ पूर्ण झाल्यानंतर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे मार्फत प्रस्तुत कार्यालयास सादर करण्यात यावा.
क) शाळा स्तरावरील अंमलबजावणीचे स्वरूप
१. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून इयत्ता पहिलीतील दाखलपात्र सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.
२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.
३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.
४. शाळास्तरावर दि. २७ एप्रिल ते १ मे २०२६ दरम्यान कोणत्याही एका तारखेस शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ चे आयोजन करण्यात यावे. त्याप्रमाणे सात टेबल व आवश्यक साहित्यासह मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.
५. शाळास्तरावरील मेळाव्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी, प्राचार्य, DIET, शिक्षणाधिकारी तसेच तालुकास्तरावरील शिक्षणक्षेत्रातील अधिकारी यांना प्रत्यक्ष शाळेवर शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करावे.
६. दाखल पात्र विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन विकास पत्राची प्रिंट किंवा झेरोक्स काढाव्यात. प्रत्यक्ष मेळाव्याच्या वेळी दाखल पात्र बालकांची विकासपत्रातील सर्व विकासाची स्थिती नोंदवून पालकांकडे देण्यात यावे.
७. उपक्रमाच्या अनुषंगाने यापूर्वी अंमलबजावणी केल्यानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात.
८. शाळास्तरावर व परिसरातील उपलब्ध साधनांचा मेळाव्यामधील ७ स्टॉल्ससाठी वापर करण्यात यावा.
९. पहिल्या मेळाव्यानंतर दाखलपात्र बालकांच्या मातांचे वाडी वस्तीनिहाय माता-पालक गट तयार -करावेत. यासाठी यापूर्वी निपूण अंतर्गत तयार केलेल्या माता पालक गटातील सक्रीय लीडर मातांना देखील सहभागी करून घेण्यात यावे.
१०. यावर्षी शाळापूर्व तयारी अभियान बदललेले स्वरूप जाणून घेण्यासाठी सोबत व्हिडिओचा QR code देण्यात आलेला आहे. तो काळजीपूर्वक पहावा.
११. SCERT च्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले साप्ताहिक आयडिया व्हिडिओ आणि अॅक्टिव्ह वर्कशीट या गटांना WhatsApp समूहाद्वारे आठवड्याच्या सुरुवातीला पाठविण्यात यावेत.
१२. प्रत्येक माता- पालक गटातील लीडर मातेस संबंधित गटाचे सोयीनुसार आठवड्यातून किमान एक तास एकत्र येऊन आठवड्यासाठी दिलेल्या साप्ताहिक आयडिया व्हिडिओ आणि अॅक्टिव्ह वर्कशीट पाहून गटात चर्चा करण्यात यावी.
१३. दोन्ही मेळाव्यादरम्यानच्या कालावधीत इयत्ता पहिलीत दखलपात्र असलेल्या मुलांचे पालक / माता यांनी आयडिया व्हिडिओ व अॅक्टिव्ह वर्कशीट मदतीने साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार घरी आपल्या पाल्यांकडून करून घ्याव्यात.
१४. शाळास्तरावर दि. १५ जून ते २० जून २०२६ दरम्यान कोणत्याही एका तारखेस शाळापूर्व तयारी मेळावा क्र. २ चे आयोजन करण्यात यावे.
१५. शाळास्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती संकलित करण्यासाठी बालशिक्षण विभाग व प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेबपोर्टलच्या https://gpconnect.prathaminsights.in/gp/MH/home/srm वापर करण्यात यावा.
१६. मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #Shalapurva TayariAbhiyan२०२६, व #शाळापूर्वतयारीअभियान२०२६ या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रच्या http://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.
१७. दुसरा मेळावा झाल्यावर पहिलीत दाखलपात्र बालकांच्या मातांना निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत कार्यरत माता पालक गटांमध्ये समावेश करून माता गटांची पुनर्बाधणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी करण्यात यावी.
करिता आपल्या स्तरावरून आपले अधिनस्त कार्यालयास या अभियानाची वरीलप्रमाणे अंमलबजावणी करण्याविषयी सुचित करण्यात यावे.
शाळापूर्व तयारी अभियान बदललेले स्वरूप स्पष्ट करणारा व्हिडिओ पाहण्यासाठी सोबतचा QR code स्कॅन करावा.
Digitally signed by Nandkumar Chaitram Bedse Date: 22-04-2026 16:06:32
नंदकुमार बेडसे (भा.प्र.से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
३. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
४. मा. आयुक्त, एकात्मिक बाल विकास विभाग, बेलापूर, मुंबई
प्रत माहितीस्तव तथा कार्यवाहीस्तव :
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) आपण आपल्या स्तरावरून शाळापूर्व तयारी मेळाव्यांना भेटी देण्याचे नियोजन करावे. शाळांना हे शाळापूर्व तयारी अभियान अंमलबजावणी करणे दरम्यान आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे.
प्रति,
संचालक,
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

