दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजीच्या शाळा बंद आंदोलनाबाबत Shala Band Andolan

Shala Band Andolan

Shala Band Andolan

School shutdown movement

School closure movement

School closure Strike

Shala Band Andolan Update Information

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

क्र. शिसंमा-२५/शाळा बंद/निवेदन/ई. ऑ.-६४४३१८०/एस-६-७/1576756

दि. 03 DEC 2025

विषय: दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजीच्या शाळा बंद आंदोलनाबाबत.

संदर्भ :-

१) विविध वर्तमान पत्रामध्ये छापून आलेली बातमी

२) महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती यांचे दि. निरंक चे निवेदन

३) मा. श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत, सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद यांचे दि.०१/१२/२०२५ चे पत्र

४) महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांचे दि.०१/१२/२०२५ चे निवेदन

वरील विषयाबाबतचे संदर्भीय निवेदन सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित/ अंशतः अनुदानित/ विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यासाठी दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे उक्त संदर्भीय निवेदन/वृत्तपत्रातील बातमीद्वारे निर्देशनास आलेले आहे.

तरी विद्यार्थी हीत लक्षात घेता दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही यांची आपल्या स्तरावरून दक्षता घ्यावी, तसेच ज्या शाळा दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही आपल्यास्तरावरून करण्यात यावी व सदर बाब सर्व शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी.

परिपत्रक पीडीएफ लिंक

Read More

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११ ००१

प्रत मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तय सविनय सादर.

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग, सर्व.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. सर्व.
३) शिक्षण निरिक्षक, बृहमुंबई (उ.द.प.)

This page has been viewed 3710 times.

Leave a Comment

error: Content is protected !!