वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ प्रशिक्षण माहे नोव्हें २०२६ पूर्वी आयोजित करण्याबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING

SENIOR AND SELECTION GRADE TRAINING

SENIOR AND SELECTION GRADE TRAINING

SENIOR AND SELECTION GRADE TRAINING UPDATE INFORMATION

Varishth Shreni Nivad Shreni Prashikshan

SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2026-27

Varishth Shreni V Nivad Shren Shikshak Prashikshan

Instructions regarding Senior Pay Scale and Selection Pay Scale Training

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२६
दिनांक : ०८/०५/२०२६

विषय :- वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत…..

संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) दि.१७/०४/२०२६. २.या कार्यालयाचे पत्र जा.क्र.राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) दि.०७/०५/२०२६.
महोदय,

उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येत आहे की, संदर्भीय पत्रानुसार दिनांक २०/०४/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून नावनोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक २ अन्वये नावनोंदणी प्रक्रियेसाठी दिनांक १२/०५/२०२६ रोजी सायं. ६:०० वाजेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली होती.

यानुसार ऑनलाईन प्रशिक्षण नावनोंदणी करत असताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यांची निवड करत असताना चुका केलेल्या आहेत. अशा प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक १४/०५/२०२६ ते १६/०५/२०२६ या कालावधीमध्ये आपण स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्ती करणेसाठीची सुविधा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर

👇👇👇👇👇

प्रशिक्षणे मेनूअंतर्गत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण tab मध्ये link द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी यानुसार केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करावयाची आहे, केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी, ज्या प्रशिक्षणार्थ्यांची नावनोंदणी अचूक झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कोणतीही दुरुस्ती यामध्ये नोंदवू नये. तसेच दुरुस्तीची ही अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी.
उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी, ही विनंती.

Digitally signed by
KAMALADEVI SHRIDHAR AWATE
Date: 13-05-2026 12:37:06
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ प्रशिक्षण माहे नोव्हें २०२६ पूर्वी आयोजित करण्याबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ प्रशिक्षण माहे नोव्हें २०२६ पूर्वी आयोजित करण्याबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING

——————- ALSO READ 👇 ———————

जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२६/ 50
दिनांक : १२/०५/२०२६

विषय :- वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाबाबत....

संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) दि. १७/०४/२०२६. २. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) दि.०७/०५/२०२६.

उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येत आहे की, संदर्भीय पत्र क्र. १ नुसार दि. २० एप्रिल २०२६ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण पात्र शिक्षकांची नावनोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती. संदर्भ क्र. २ अन्वये या नावनोंदणी प्रक्रियेसाठी दि. १२ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

दरवर्षी सदरील प्रशिक्षणाचे नियोजन माहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाते. मात्र भारताची जनगणना २०२७चा पहिला टप्पा दि. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालवधीत नियोजित आहे. या राष्ट्रीय कार्यासाठी (घरगणना) बहुतांश शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे सदरील प्रशिक्षण माहे नोव्हें. २०२६ मध्ये दीपावलीच्या सुट्टीत आयोजित करण्याबाबतचे नियोजन सुरु आहे.

माहे जून २०२६ ते माहे ऑक्टो. २०२६ या कालावधीत सेवेची १२/२४ वर्षे पूर्ण होऊन सेवानिवृत्त होणाऱ्या व पोर्टलवर प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण माहे नोव्हें. २०२६ पूर्वी आयोजित करण्याबाबत पडताळणी सुरु आहे.

आपल्या कार्यक्षेत्रातील सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांना आपल्या स्तरावरून ही बाब निदर्शनास आणून द्यावी.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

डॉ. हेमंत वसेकर (भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रतः – माहितीस्तव सविनय सादर

  1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई
  2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, ४११००१
  3. मा. आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय, पुणे,
  4. मा. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ प्रशिक्षण माहे नोव्हें २०२६ पूर्वी आयोजित करण्याबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र २०२६ - २०२७
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ प्रशिक्षण माहे नोव्हें २०२६ पूर्वी आयोजित करण्याबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र २०२६ – २०२७

——————- ALSO READ 👇 ———————

जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२६/ दिनांक : ०५/०५/२०२६

विषयः- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत

संदर्भ:-
१. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि. २०.०७.२०२१
२. या कार्यालयाचे दिनांक १६/०४/२०२६ चे पत्र
३. या कार्यालयाचे दिनांक २८/०४/२०२६ चे पत्र
४. शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे पत्र सशि/२०२६-२७/ओडी/दिनांक ०४.०५.२०२६

उपरोक्त संदर्भा क्र. २ व ३ च्या पत्रानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणे करिता पोर्टल दिनांक २०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक ०४.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु होते.
संदर्भ क्रमांक ४ नुसार व इतर काही विभागांनी नावनोंदणीस मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली आहे. त्यानुसार दिनांक ०८.०५.२०२६ सकाळी ११.०० वाजेपासून ते दिनांक १२.०५.२०२६ सायंकाळी ०६.०० पर्यंत वरिष्ठ व निवड प्रशिक्षण नावनोंदणीस मुदतवाढ देण्यात येत असून पात्र शिक्षकांना आपली नावनोंदणी दिनांक १२.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० पर्यंत करता येईल. उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी.

२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी नोंदणी ( Registration for 24 years service completed) निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी (Selection Grade Registration)
DIRECT LINK

Digitally signed by HEMANT VASEKAR Date: 07-05-2026
डॉ. हेमंत घसकर (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत:- माहितीस्तव सविनय सादर

  1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई
  2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, ४११००१
    प्रति,
  3. मा. आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय, पुणे,
  4. मा. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक
  5. मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, संचलनालय, पुणे,
  6. मा. संचालक, उच्च शिक्षण संचलनालय, पुणे,
  7. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
  8. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
  9. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
  10. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
  11. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)
  12. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम / दक्षिण/उत्तर)
  13. प्रशासन अधिकारी, (मनपा/नपा) (सर्व)

मुदत वाढ वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र २०२६ - २०२७
मुदत वाढ वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र २०२६ – २०२७

————————— ALSO READ —————————

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२६/

दिनांक : २७/०४/२०२६

प्रति,

1. मा. आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय, पुणे,

2. मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, संचलनालय, पुणे,

3. मा. संचालक, उच्च शिक्षण संचलनालय, पुणे,

4. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

5. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)

6. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

7. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

8. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)

9. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम / दक्षिण/उत्तर)

10. प्रशासन अधिकारी, (मनपा/नपा) (सर्व)

     विषयः- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत

संदर्भ:- 1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि.२०.०७.२०२१

2. या कार्यालयाचे दिनांक १६/०४/२०२६ चे पत्र

3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांचे पत्र

उपरोक्त संदर्भा क्र. २ च्या पत्रानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणे करिता पोर्टल दिनांक २०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २९.०४.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु राहणार होते. परंतु काही प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी त्यांच्याकडे आलेल्या शिक्षकाच्या मागणी नुसार पोर्टलवर नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षण नावनोंदणीस मुदतवाढ देण्यात येत असून पात्र शिक्षकांना आपली नावनोंदणी पोर्टल दिनांक ०४.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० पर्यंत सुरु करता येईल.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी.

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे

प्रतः-

माहितीस्तव सविनय सादर

1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई

2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, ४११००

मुदत वाढ वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र २०२६ - २०२७
मुदत वाढ वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र २०२६ – २०२७

————————– ALSO READ 👇 ————————

जा.क्र. राशेसंप्रषम सेवापूर्व/ब.नि.५/२०२६/
दिनांक- १६/०४/२०२६

विषयः वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत
संदर्भ:- 1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि.२०.०७.२०२१

  1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्रमांक राप्रधो २०२५ / प्र.क्र.२६ / प्रशिक्षण दि ०१.०४.२०२५
    उपरोक्त संदर्भ दिनांक २० जुलै २०२१ च्या शासननिर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
    संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. 2 नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. (नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.)

१) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या

www.maa.ac.in

या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

अभिनव भोसले – विषय सहाय्यक संपर्क क्रमांक ८२०८८७९१५९ (कार्यालयीन वेळेत सकाळी ९.४५ ते सायं ६.१५ पर्यंत) तांत्रिक सहाय्य (Trifrnd Pvt. Ltd.) – संपर्क क्रमांक – ९५११८७४३७३ (कार्यालयीन वेळेत – सकाळी ९.४५ ते सायं ६.१५ पर्यंत)

Digitally signed by Nandkumar Chaitram Bedse Date: 17-04-2026 11:40:10 डॉ. नंदकुमार बेडसे (भा.प्र.से.)

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र. पुणे ७०८ आरची कमठेकर मार्ग. सदाशिव पेठ, पुणे-४११०३००

प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
2 उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)

  1. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
  2. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
  3. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)
  4. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम दक्षिण उत्तर)
  5. प्रशासन अधिकारी, (मनपा/नपा) (सर्व)

प्रत:-
माहितीस्तव सविनय सादर

  1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई
  2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, ४११००१

२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी नोंदणी ( Registration for 24 years service completed) निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी (Selection Grade Registration)
DIRECT LINK

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र २०२६ - २०२७
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत SENIOR AND SELECTION GRADE TRAINING शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र २०२६ – २०२७

This page has been viewed 13603 times.

Leave a Comment

error: Content is protected !!