Varishth Shreni Nivad Shreni Prashikshan

Varishth Shreni Nivad Shreni Prashikshan शिक्षकांसाठी ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण सन २०२४ – २५ करिता नावनोंदणी करणेबाबत

vivad
Varishth Shreni Nivad Shreni Prashikshan

Varishth Shreni Nivad Shreni Prashikshan

Senior and Selection Grade Training

राज्यातील सर्व शिक्षक शिक्षिका बंधू आणि भगिनींना प्रशिक्षण सुकर होण्यासाठी प्रशिक्षणा संबंधी अद्यावत माहिती वरचेवर आपलेपर्यंत पोहोचविण्यासाठी जसे की प्रशिक्षण नोंदणी लिंक प्रशिक्षणाला सुरुवात कशी करावी स्वाध्याय सोडवणे चाचणी सोडवणे अभिप्राय देणे प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड करणे वरिष्ठ व निवड श्रेणीचा मान्यता प्रस्ताव तयार करणे तसेच यापूर्वीचे व वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय व परिपत्रके आपल्याला प्राप्त व्हावीत इत्यादी साठी हा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला असून (Group Setting Only Admin Can Send Message आहे व आवश्यक वेळी सर्वांसाठी खुली करण्यात येईल व बंद केल्या जाईल) या ग्रुपमध्ये केवळ प्रशिक्षण हेतूनेच सामील व्हावे ही नम्र विनंती

hello click here
1680269441151

Also See Videos

Telegram JOIN

🫢 🤔
रहा अपडेट 👇

      विविध माहितीसाठी
        🇬 🔘🔘 🇬 🇱 🇪 
          —-सर्च करा—

eshala

🥏 Join Social Media
LINKS
┈┉┅━━❀DT❀━━┅┉┈
Next Update
FOLLOW WEBSITE LINK


📰
For Google News – LINK

┈┉┅━━❀DT❀━━┅┉┈
©️®️

Senior Grade Training

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण

हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
  • जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
  • शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
  • नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
  • एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
  • शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
  • मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

    १२ वर्षाची अर्हताकारी सेवा

  • या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
  • त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
  • ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

Selection Grade Training

निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण

हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

  • बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.
  • मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.
  • शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.
  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे.
  • मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
  • शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
  • जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

    २४ वर्षाची अर्हताकारी सेवा

  • त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
  • शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
  • प्राथमिक शिक्षकांसाठी – प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
  • प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
  • माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
संपर्क क्रमांक (०२०) २४४७६९३८
E-mail: itdept@maa.ac.in
जा.क्र. राशैसंप्रपम/ आय.टी./व.नि.प्रशिक्षण नानों/ २०२३/०२२८३
दिनांक : २६/०५/२०२३
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई,
५ शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व
६. शिक्षण निरीक्षक, मुंबई, (पश्चिम/दक्षिण/उत्तर) ७. प्रशासन अधिकारी, मनपा/नपा (सर्व)
विषय:- ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३ – २४ करिता नावनोंदणी करणेबाबत….
संदर्भ :- १) शासन निर्णय क्र. चवेआ-१०८९/१११ /माशि -२, दि.२.०९.१९८९.
२) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९ / प्र.क्र. ४३ / प्रशिक्षण, दि.२०.७.२०२१. ३) शासन पत्र क्रमांक : शिप्रधो २०२१/ प्र.क्र.६७/प्रशिक्षण, दि.०८.०५.२०२३.
            उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार २०२१-२०२२ दरम्यान ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ९४, ५४२ प्रशिक्षणार्थी यांनी प्रस्तुत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरु करणेसाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे –
१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या CLICK HERE या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच परिषदेच्या CLICK HERE या संकेतस्थळावर देखील सदरचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
३. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. प्रशिक्षण लिंक नोंदणी दिनांक २९ मे,२०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल.
५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.
६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत
Varishth Shreni Nivad Shreni Prashikshan
गट क्र.१- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)
७. प्रशिक्षणासाठी नावनोदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय.डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन पोर्टलवर “शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी हा पर्यायाचा वापर करून आपली नावनोंदणी करावी.
९. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
१०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय.डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येतील.
११. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.
१२. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय.डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल.
१३.नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास “माहितीत बदल करा” या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.
१४.प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ CLICK HERE या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
१५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.
१६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील- इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट/डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.
१७.सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क – ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.
१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ची रीसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ई-मेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.
१९.नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email CLICK HERE आय.डीवरून या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.
२०. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
Varishth Shreni Nivad Shreni Prashikshan
२१. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.
२२.शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही
विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.
२३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही यादृष्टीने केली जाईल याची नोंद घेण्यात यावी.
२४.सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी CLICK HERE हे संकेतस्थळ पहावे.
उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शानास आणून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
१. श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४
२. श्री. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, मो. क्र. ७७२२०७४२९४
(शरद गोसावी)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
सोबत – नोंदणी सूचनापत्रक (शालार्थ आयडी असलेले व नसलेले) प्रत माहितीस्तव सविनय सादर,
शासन निर्णय – दिनांक २० जुलै २०२१
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालयातील लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणेबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक शिप्रधो – २०१९ /  प्र क्र / ४३/ प्रशिक्षण मंत्रालय विस्तार भवन मुंबई दिनांक २० जुलै २०२१
सविस्तर वाचण्यासाठी या 👉 ओळीला स्पर्श करा 👇🏻

2 thoughts on “Varishth Shreni Nivad Shreni Prashikshan”

  1. Ahaa, its good discussion concerning thi pararaph at this place aat this
    website, I have read all that, soo at this timje me aalso cokmmenting here.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!