Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा प्रशिक्षण गट व प्रकार बदल

Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

image 58
Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी
यांचा प्रशिक्षण गट व प्रकार बदलाबाबत

जा.क्र.राशैसंप्रपम/से.शी/बदल/२०२५/
दिनांक : ३०.०५.२०२५.

विषय:- वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा प्रशिक्षण गट व प्रकार बदलाबाबत…


उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सूचित करण्यात येत आहे की, वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी प्रक्रिया दि. २१ मे ते ६ जून २०२५ या कालावधीमध्ये राबविण्यात आली होते. या तसेच यानंतर दिनांक ८ व ९ जून २०२५ या कालावधीमध्ये प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार बदलासाठी आवश्यक दुरुस्ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.


तथापि सद्यस्थितीमध्ये देखील काही प्रशिक्षणार्थी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याशी आवश्यक दुरुस्तीसाठी संपर्क साधत आहेत. तरी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गटाबाबत शिक्षकांच्या असणाऱ्या बदलाबाबतची माहिती खालील नमुन्यामध्ये घेऊन

या ई-मेलवर पाठविण्यात यावी.

                माहिती नमुना

प्रशिक्षणार्थी नोंदणी क्रमांक
प्रशिक्षणार्थीचे नाव
शालार्थ क्रमांक
सद्यस्थितीमधील प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार
बदल करावयाचा प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार
माहितीच्या आधारे पडताळणी करून त्यानंतरच आवश्यक बदल करण्यात येईल व केलेल्या बदलाची माहिती आपणास कळविण्यात येईल जेणेकरून आपण तयार केलेल्या बॅचमध्ये आवश्यक बदल करावा.

Circular PDF COPY LINK

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

image 59
Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०
संपर्क क्रमांक (०२०) २४४७ ६९३८ E-mail: preserviceedudept@maa.ac.in
प्रति,
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था… (सर्व)

Also Read –

IMG 20250506 200706
Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शासन
शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

जा.क्र.राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२४-२५ 02689

दिनांक : ०६/०५/२०२५

प्रति,

  1. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
  2. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई.
  3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
  4. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
  5. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक / माध्यमिक)… सर्व.
  6. शिक्षण निरीक्षक (उत्तर/ पश्चिम/दक्षिण), मुंबई.
  7. प्रशासन अधिकारी, म.न.पा/न.पा

विषय :- ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत….

संदर्भ :- 1. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२४-२५/०२३६७दि.११/०४/२०२५

  1. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२४-२५/०२६१० दि. ३०/०४/२०२५

उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येत आहे की, संदर्भीय पत्रानुसार दिनांक २१/०४/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून नावनोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक २ अन्वये नावनोंदणी प्रक्रियेसाठी दिनांक ०६/०५/२०२५ रोजी सायं. ६:०० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

यानुसार ऑनलाईन प्रशिक्षण नावनोंदणी करत असताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यांची निवड करत असताना चुका केलेल्या आहेत. अशा प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक ७/०५/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून दिनांक ८/०५/२०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आपण स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्ती करणेसाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तरी यानुसार केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करावयाची आहे, केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांची नावनोंदणी अचूक झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कोणतीही दुरुस्ती यामध्ये नोंदवू नये. तसेच दुरुस्तीची ही अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे, नमूद कालावधीनंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली जाणार नाही याची नोंद, नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी घ्यावी अशा सुचना आपल्यास्तरावरून सर्व नोंदणी केलेल्या पात्र प्रशिक्षणार्थ्यांना निर्गमित करण्यात याव्यात.

शालार्थ / आश्रम शालार्थ/ BMC स्टाफ आय. डी असलेल्या या पर्यायामधून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

  1. आपल्या शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदविणे.
  2. निवड श्रेणी साठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीने वरिष्ठ श्रेणी मध्ये नोंदणी केले असणे, केवळ यासाठी प्रशिक्षण प्रकार दुरुस्ती करणे.
  3. प्रशिक्षण गट (प्राथमिक / माध्यमिक/उच्च. माध्यमिक / अध्यापक विद्यालय) दुरुस्ती करणे.
  4. प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक/उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नसताना चुकीने कला शिक्षक व क्रीडा शिक्षक अशी नोंदणी केली असणे. यासाठी दुरुस्ती करणे.

शालार्थ / आश्रम शालार्थ/ BMC स्टाफ आय. डी नसलेल्या या पर्यायामधून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

  1. आपल्या शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदविणे.
  2. निवड श्रेणी साठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीने वरिष्ठ श्रेणी मध्ये नोंदणी केले असणे. केवळ यासाठी प्रशिक्षण प्रकार दुरुस्ती करणे.
  3. प्रशिक्षण गट (प्राथमिक / माध्यमिक/उच्च. माध्यमिक / अध्यापक विद्यालय) दुरुस्ती करणे.
  4. प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक / उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नसताना चुकीने कला शिक्षक व क्रीडा शिक्षक अशी नोंदणी केली असणे. यासाठी दुरुस्ती करणे.
  5. शाळा व्यवस्थापन प्रकार दुरुस्त करणे.

उक्त नमूदप्रमाणेच दुरुस्ती असेल तर अशाच दुरुस्ती प्रशिक्षणार्थ्यांना करता येणार आहेत. केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्ती करणे आवश्यक आहे केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्ती नोंदवावी.

IMG 20250507 111040

ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी

शालार्थ आयडी/सेवार्थ आयडी/बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) स्टाफ आयडी असलेल्या शिक्षकांसाठीची दुरुस्ती

केवळ समाज कल्याण विभाग (सर्व शिक्षक), अध्यापक विद्यालय विशेष शिक्षक, नागपूर मनपा (केवळ प्राथमिक शिक्षक), पुणे मनपाच्या केवळ इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील कनिष्ठ महाविद्यालयातील कनिष्ठ अधिव्याख्याता, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय अखत्यारीतील शिक्षक आणि आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गतच्या शासकीय आश्रमशाळा शिक्षकांसाठी नावनोंदणी

परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडी

एफ मध्ये प्राप्त करा

उपसंचालक (सेवापूर्व शिक्षण) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

मा. आयुक्त (शिक्षण), महराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे

Also Read 👇

IMG 20250430 232424
Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

जा.क्र.राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२४-२५/०२६१०

दिनांक : ३०/०४/२०२५

विषयः- सन 2025-26 मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक / मुख्याध्यापकांकरिता निवड श्रेणी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेत समाविष्ट करणे बाबत

संदर्भ:

  • 1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि.२०.०७.२०२१
  1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्रमांक राप्रधो-२०२५/प्र. क्र. २६/प्रशिक्षण दिनांक ३० एप्रिल, २०२५

उपरोक्त विषयांन्वये कळविण्यात येते की, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत एप्रिल – मे 2025 या कालावधीमध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे.

सद्यस्थितीत प्रशिक्षणाची ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया दिनांक २१.०४.२०२५ पासून सुरू करण्यात आली असून सदरच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी प्रक्रियेमध्ये दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत १२ वर्षे अर्हताकारी सेवा अथवा २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण केली असेल असेच शिक्षक/मुख्याध्यापक नाव नोंदणी करू शकत होते.

तथापि राज्यामध्ये काही शिक्षक/ मुख्याध्यापक हे दिनांक ३०.०४.२०२५ ते दिनांक ३०.०४.२०२६ या कालावधीत २४ वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण करत आहेत आणि ते माहे एप्रिल २०२६ पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा कालावधी लक्षात घेता, जे शिक्षक / मुख्याध्यापक हे दिनांक ३०.०४.२०२५ ते दिनांक ३०.०४.२०२६ या कालवधीत सेवानिवृत्त होत असल्याने व सेवेची २४ वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण होत असल्याने अशा शिक्षक / मुख्याध्यापक यांना नावनोंदणी करणेसाठीची सुविधा दिनांक ०१/०५/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच सर्वांसाठी नावनोंदणीस दिनांक ०६/०५/२०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.

तरी अशा पात्र शिक्षक / मुख्याध्यापक यांना निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणेबाबतबाबतच्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक/मुख्याध्यापक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे.

परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

IMG 20250430 232434
Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

प्रति,

  1. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
  2. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
  3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
  4. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
  5. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)
  6. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम / दक्षिण/उत्तर)
  7. प्रशासन अधिकारी, (मनपा/नपा) (सर्व)

प्रत माहितीस्तव सविनय सादर

  1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई
  2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे,

Also Read 👇

IMG 20250423 155548
Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

Regarding online registration for Senior and Selection Grade Training 2025-2026

Varishth Nivad Shreni Prashikshan

महत्वाची सूचना

जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२४-२५/०२४८०

दिनांक : २३/०४/२०२५

विषयः- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२५-२०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत

संदर्भ:-

  1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि.२०.०७.२०२१
  2. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्रमांक राप्रधो २०२५ / प्र.क्र. २६ / प्रशिक्षण दि ०९.०४.२०२५
  3. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. जा. क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) /२०२४-२५/०२३६७ दि.११/०४/२०२५

उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 नुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणे करिता पोर्टल दिनांक १५.०४.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २५.०४.२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु राहणार होते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे सदर पोर्टल निर्धारित कालावधीत सुरु होऊ शकले नाही. सद्य परिस्थितीत पोर्टल २१.०४.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सुरु करण्यात आले असून ते दिनांक ०२.०५.२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० पर्यंत सुरु राहणार आहे.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे.

परिपत्रक पीडीएफ कॉपी लिंक

उपसंचालक (सेवापूर्व शिक्षण) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रति,

  1. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
  2. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
  3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
  4. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
  5. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)
  6. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम/दक्षिण / उत्तर)
  7. प्रशासन अधिकारी, (मनपा/ नपा) (सर्व)
IMG 20250411 202012
Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

जा.क्र.राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२४-२५/०२३६७

दिनांक : ११/०४/२०२५

विषयः वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२५-२०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत

संदर्भ:-

  1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/ प्रशिक्षण, दि. २०.०७.२०२१
  2. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्रमांक राप्रधो २०२५/प्र.क्र.२६ / प्रशिक्षण दि ०९.०४.२०२५

उपरोक्त संदर्भ दिनांक २० जुलै २०२१ च्या शासननिर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

वरिष्ठ व निवडश्रेणी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणेबाबत. दिनांक ०३/०६/२०२४.चे परिपत्रक वाचा सविस्तर या ओळीला स्पर्श करून

संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. 2 नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. (नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.)

शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे.दि.२४/०३/२०२५ चे परिपत्रक वाचा सविस्तर या ओळीला स्पर्श करून

१) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.

२) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.

३) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.

४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक १५.०४.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २५.०४.२०२५ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

५) सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.

६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत

गट क्र. १- प्राथमिक गट (इ.१ली ते ४ थी, इ.१ली ते ५ वी, इ.१ली ते ७ वी, इ.१ली ते ८ वी, इ.६वी ते ८ वी)

गट क्र. २- माध्यमिक गट (इ.९ वी, १० वी)

गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ.११वी, १२ वी)

गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट

मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.

७) नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी.

८) प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ / सेवार्थ/ बीएमसी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी, जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ / सेवार्थ/ बीएमसी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी.

९) शालार्थ / सेवार्थ/ बीएमसी प्रणालीवर अद्ययावत करावयाची माहिती खालील प्रमाणे

  • स्वतःचे नाव (देवनागरी लिपी)
  • लिंग
  • जन्म दिनांक
  • पदनाम
  • Udise No.
  • जिल्हा
  • तालुका
  • शाळा व्यवस्थापन प्रकार
  • नियुक्ती दिनांक
  • शाळेचे नाव
  • मुख्याध्यापकाचे नाव
  • मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक
  • व्यावसायिक अर्हता (सेवा कालावधीत व्यावसायिक अर्हता वाढवली असल्यास)
  • शैक्षणिक अर्हता (सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास)
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी

१०) प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ/सेवार्थ/बीएमसी ID, ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता माहिती उपलब्ध करून देणेबाबत…दिनांक : १५/०३/२०२५ चे परिपत्रक वाचा सविस्तर या ओळीला स्पर्श करून

११) आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ/सेवार्थ/बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या ई-मेल आय.डी. वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. तसेच आपल्या शालार्थ/सेवार्थ/बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक यांचे verification होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी.

१२) नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकार (वरिष्ठ व निवड) यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात.

१३) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडीओ, सर्व माहिती

IMG 20250418 121405
Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण अनुषंगाने महत्त्वाचे शासन निर्णय –

➣ शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग – दि. २ सप्टेंबर १९८९ – लिंक

➣ शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दि. ८ डिसेंबर १९९५ – १ – लिंक

➣ शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दि. ८ डिसेंबर १९९५ – २ – लिंक

➣ शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. २० जुलै २००४ – लिंक

➣ शासन शुद्धीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. १५ नोव्हेंबर २००६ – लिंक

➣ शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. २८ नोव्हेंबर २००६ – लिंक

➣ शासन निर्णय – दि. २० जुलै २०२१ – लिंक

ऑनलाइन नोंदणी माहिती पुस्तिका

ऑनलाइन नोंदणी व्हिडीओ

➣ शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या माहितीत काही बदल असल्यास, आपण येथे क्लिक करुन आपली माहिती अद्ययावत झाल्यानंतरच आपली नोंदणी करावी.

➣ बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षकांसाठी) प्रणालीमध्ये आपल्या माहितीत काही बदल असल्यास, आपण येथे क्लिक करुन आपली माहिती अद्ययावत झाल्यानंतरच आपली नोंदणी करावी.

➣ सेवार्थ (आदिवासी विकास विभाग) प्रणालीमध्ये आपल्या माहितीत काही बदल असल्यास, आपण येथे क्लिक करुन आपली माहिती अद्ययावत झाल्यानंतरच आपली नोंदणी करावी.

image 53
Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link

प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी लिंक

Registration Link

या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

१४) या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील.

१५) इंटरनेट बँकिंग / क्रेडीट / डेबिट कार्ड/UPI payment या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल.

१६) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये- दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit Card, Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे.

१७) एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवाशुल्क बँकेच्या guideline नुसार प्रशिक्षणार्थीना लागू राहतील याची नोंद घ्यावी.

१८) ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल.

१९) प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन (रिसिप्ट) पावतीची PDF जतन करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इ. तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ई मेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

२०) नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डी. वरून gradetraining@maa.ac.in या ई-मेल आय.डी. वर संपर्क करावा.

२१) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहिती साठी वेळोवेळी www.maa.ac.in हे संकेत स्थळ पाहावे.

२२) प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. तथापि वाचनसाहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल. याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे. उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या

स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत

करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

अभय परिहार – अधिव्याख्याता संपर्क क्रमांक – ९००४११९९२६

अभिनव भोसले – विषय सहाय्यक संपर्क क्रमांक ८२०८८७९१५९

तांत्रिक सहाय्य (Trifmd Pvt. Ltd.) संपर्क क्रमांक – ९५११८७४३७३ (कार्यालयीन वेळेत)

(राहूल रेखावार भा.प्र.से.)

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत:-

माहितीस्तव सविनय सादर

  1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई
  2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे,

महाराष्ट्र शासन
शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

circular PDF copy link

प्रति,

  1. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
  2. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
  3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
  4. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
  5. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)
  6. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम/दक्षिण/उत्तर)
  7. प्रशासन अधिकारी, (मनपा/नपा) (सर्व)

8 thoughts on “Online Registration For Senior And Selection Grade Training 2025 2026 Link वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा प्रशिक्षण गट व प्रकार बदल”

  1. Amchi shala gujarati medium ahe.secondary section 8th to10th ashi ahe.me HM.ahe.1999 chi mazi appointment ahe.HM plus 4 teachers asa staff ahe.tr maze varishtha vetan shreniche prashikshan 2016 madhye zale ahe.mala nivadshreni prashikshan gheta yeil ka.please guide.

    Reply
  2. 13june2025 या तारखेला 24 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे निवड श्रेणी ट्रेनिंग घेता येणार का

    Reply
  3. माझे 11 जून 2025 रोजी 24 वर्षे पूर्ण होत आहेत,मलाही प्रशिक्षण करता येईल का?

    Reply
  4. 10/09/2025ला मला सहा.शिक्षक या पदासाठी 24 वर्ष पुर्ण होत आहेत.
    निवड श्रेणी करीता माझे नाव रजिस्ट्रेशन होईल काय

    Reply
  5. निवड श्रेणी ट्रेनिंग होऊन 2 वर्ष झालेल्या शिक्षकांना अजुन निवडश्रेणी मिळालेली नाही त्याबद्दल तर कोणीच updates देत नाही ट्रेनिंग झालेल्यांना कधी मिळणार?

    Reply
    • Automatically मिळतं नही त्यासाठी शिक्षणाधिकारी यांचे कडे प्रस्ताव टाकून मान्यता पत्र घ्यावे लागते त्यानंतर पे फिक्सेशन करून service book वेतन अधीक्षक यांचेकडून verify karave लागते व त्यानंतर पुढील वेतन घेनेसाठी वरिष्ठ श्रेणी वेटणाला मंजुरी घ्यवी लागते

      Reply
  6. Mi nav nondni keli asun mi gpay dwara payment kele.
    Parantu recipt server problem mule reciept downlod zali nahi.
    Parantu mail id var succses fully done mgs aala.
    Reciept sathi kay karave.

    Reply
  7. वरिष्ठ श्रेणी ट्रेनींग साठी नाव नोंदणी करायची आहे. रजिस्ट्रेशन लिंक ची मुदत वाढवून. मिळेल काय?

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!