Sanch Manyata
Sanch Manyata
Rameshwar Dilwale
WP-5456-2025 & Connect
2025:BHC-AS:49260-
- In view of the foregoing discussions, the following order is passed:
(i). Writ Petition No.9276 of 2025 and Interim Application No. 24313 of 2025 in Writ Petition No.6213 of 2025 are disposed of with a direction to the respondent-Authorities to follow the G.R. dated 15th February 2018 for deployment of female and male teachers who have crossed the age of 53 years and such teachers should not be deployed in the difficult areas as far as practicable.
(ii). Writ Petition No. 8754 of 2025, Writ Petition (ST) No. 24468 of 2025 and Interim Application (ST) No.20158 of 2025 in Writ Petition No. 5460 of 2025 are disposed of with a direction to the respondent-Authorities to follow the instructions under the G.R. dated 18th June 2024 as far as practicable. Interim Application Nos. 10267 of 2025, 25647 of 2025, and Interim Application (ST) No.21996 of 2025 are, accordingly, disposed of.
(iii). The challenge laid to the G.R.-2024 fails and the writ petitions vide Writ Petition Nos. 5456 of 2025, 6028 of 2025, 7548 of 2025, 7552 of 2025, 8239 of 2025, 8753 of 2025, 8946 of 2025, 9977 of 2025, 10213 of 2025, 10432 of 2025, 10433 of 2025, 10470 of 2025, 10497 of 2025, 5759 of 2025, 6213 of 2025, 10321 of 2025, Writ Petition (ST) Nos. 15761 of 2025, 15782 of 2025, 13145 of 2025, 16603 of 2025 and Writ Petition (L) No.17362 of 2025 are dismissed. However, we observe that the respondent-Authorities shall not issue transfer orders after the cut-off date provided under the transfer policy, except in the administrative exigencies or under exceptional circumstances.
(iv). Contempt Petition No. 412 of 2025 is dismissed.
[MANJUSHA DESHPANDE, J.]
[CHIEF JUSTICE]
रामेश्वर दिलवाले
WP-5456-2025 आणि कनेक्ट
2025:BHC-AS:49260-
- वरील चर्चा लक्षात घेता, खालील आदेश पारित करण्यात येत आहे:
(i). २०२५ ची रिट याचिका क्रमांक ९२७६ आणि २०२५ ची रिट याचिका क्रमांक ६२१३ मधील अंतरिम अर्ज क्रमांक २४३१३ यांचा निपटारा करण्यात येत आहे आणि प्रतिवादी-अधिकाऱ्यांना ५३ वर्षे वय ओलांडलेल्या महिला आणि पुरुष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी १५ फेब्रुवारी २०१८ च्या जी.आर.चे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि अशा शिक्षकांना शक्य तितक्या कठीण क्षेत्रात तैनात करू नये.
(ii). २०२५ च्या रिट याचिका क्रमांक ८७५४, २०२५ च्या रिट याचिका (एसटी) क्रमांक २४४६८ आणि २०२५ च्या रिट याचिका क्रमांक ५४६० मधील अंतरिम अर्ज (एसटी) क्रमांक २०१५८ यांचा निकाल लावण्यात येत आहे आणि प्रतिवादी-अधिकाऱ्यांना १८ जून २०२४ च्या जी.आर. अंतर्गत शक्य तितक्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अंतरिम अर्ज क्रमांक १०२६७, २०२५ चा २५६४७ आणि अंतरिम अर्ज (एसटी) क्रमांक २१९९६ यांचा निकाल त्यानुसार लावण्यात येत आहे.
(iii). जी.आर.-२०२४ ला दिलेले आव्हान अयशस्वी झाले आणि रिट याचिका रिट याचिका क्रमांक ५४५६, ६०२८, ६०२५, ७५४८, ७५५२, २०२५, ८२३९, ८७५३, ८७५३, ८९४६, ९९७७, १०२१३, १०२५, १०४३२, १०४३३, १०२५, १०४७०, १०४९७, २०२५, ५७५९, ६२१३, १०२५, १०३२१, रिट याचिका (एसटी) यानुसार आहेत. २०२५ चा क्रमांक १५७६१, २०२५ चा १५७८२, २०२५ चा १३१४५, २०२५ चा १६६०३ आणि २०२५ चा रिट याचिका (एल) क्रमांक १७३६२ हे अर्ज फेटाळण्यात येत आहेत. तथापि, आम्हाला असे आढळून आले आहे की प्रशासकीय गरजा किंवा अपवादात्मक परिस्थिती वगळता, प्रतिवादी-अधिकारी हस्तांतरण धोरणांतर्गत दिलेल्या अंतिम तारखेनंतर हस्तांतरण आदेश जारी करणार नाहीत.
(iv). २०२५ चा अवमान याचिका क्रमांक ४१२ फेटाळण्यात येत आहे.
[मंजुषा देशपांडे, जे.]
[मुख्य न्यायाधीश]
Hon Court Order Dated 14 November 2025 Sanch Manyta PDF COPY LINK
Hon Court Order ENGLISH And MARATHI PDF COPY LINK
ALSO READ 👇
*संचमान्यता अपडेट*
****************
संचमान्यता 2025-2026 साठी सरल पोर्टलवर विद्यार्थी फॉरवर्ड करणेबाबत टॅब उपलब्ध….!
स्कुल पोर्टलवर माहिती जर फायनालाईज केलेली असेल तर आता तिथे `डाटा ईज एप्रोल्ड` असे नोटीफिकेशन दिसत असेल तर तुमचे स्कुल पोर्टलवरील काम पुर्ण झालेले आहे.
यानंतर सरल पोर्टलवर आता संच मान्यता टॅब मध्ये 2025-2026 वर्ष निवडल्यावर 23 ऑक्टोबर 2025 च्या सकाळी 11 वाजताचा शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचा डेटा म्हणजे एकुण विद्यार्थी संख्या, आधार वैध विद्यार्थी संख्या, वीस वर्षापेक्षा जास्त असलेली विद्यार्थी संख्या, वर्ग, तुकडी, माध्यम निहाय माहिती दिसत आहे. ती माहिती बरोबर असल्यास मुख्याध्यापक यांनी `फॉरवर्ड टु संचमान्यता` टॅबला क्लिक करुन ती माहिती क्लस्टर लॉगीनला फॉरवर्ड कलावी, म्हणजे सरल पोर्टलवरील आपले काम पुर्ण होईल.
त्यानंतर संच मान्यता पोर्टल सुरु झाल्यानंतर संचमान्यता आणि शालार्थ मधील कार्यरत कर्मचारी यांची नाव व नियुक्ती वर्गासह पदसंख्या आणि संचमान्यता मधील मंजूर पदसंख्या बरोबर असल्यास तो डेटा फायनालाईज करावा म्हणजे संचमान्यता मधील आपले सर्व काम पुर्ण होईल.
अशा प्रकारे तीनही पोर्टलचे काम झाल्यावर मुख्याध्यापक यांचे 2025-2026 चे संचमान्यतेचे सर्व काम पुर्ण होईल.
सर्वानी saral school beo login मधून school & cluster list – udise plus या tab मध्ये केंद्र निहाय शाळांची यादी निघत आहे..वर्ग खोली संख्या, माध्यम, वर्ग, व्यवस्थापन माहीती तपासणी करावी. माहिती चुकीची असल्यास udise मध्ये तशी दुरुस्ती करावी
Also Read 👇
क्रमांक : प्राशिसं/सं.मा/२५-२६/टे-५००/3968
दिनांक : ३१.१०.२०२५
विषय : सन २०२५-२६ च्या (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक) संचमान्यता, स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टल वर मुख्याध्यापक Loging वरुन माहिती अद्ययावत करणेबाबत..
उपरोक्त विषयांकित प्रकरणी सन २०२५-२६ ची प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक ऑनलाईन संचमान्यता निर्गमित करण्यासाठी इ १ ली ते १० वी व इ. ११ वी ते १२ वी च्या शाळा/वर्ग तुकडयांचे अनुदान प्रकार, माध्यम व व्यवस्थापनाबाबतची माहिती शाळांना स्कूल पोर्टलवर भरुन अद्ययावत करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना कळविण्यात येत आहे.
१. मुख्याध्यापक School Portel Loging करुन शाळेचे मेडीयम व अनुदान प्रकार निश्चित करुन शाळा Forward करणे.
२. मुख्याध्यापक यांनी student Portal ला जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या, अनुदान प्रकार, माध्यम व व्यवस्थापन प्रकार तपासून संचमान्यतेसाठी Forward करणे.
३. केंद्र प्रमुख यांना Cluster मधील सर्व शाळांची माहिती दिसेल. केंद्रप्रमुख यांनी शाळा निहाय माहिती तपासणे., एखाद्या शाळेची माहिती मध्ये बदल करावयाचा असल्यास तो बदल करुन Cluster च्या शाळांची माहिती गटशिक्षणाधिकारी यांना forward करेल, बदल नसल्यास केंद्रातील शाळा Verify करुन संचमान्यतेसाठी Forward होतील
४. मुख्याध्यापक Loging ला Fetch बटन असेल त्यावर Click करुन शाळेची संपूर्ण माहिती दिसेल शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी माहिती काळजीपूर्वक पडताळणी करावी. सर्व तपशील बरोबर असल्यास Verify करावे.
५. मुख्याध्यापक यांनी Loging करुन Get School Information Button Click करावे. आलेली माहिती चेक करुनच वर्किंग पोस्टच्या फॉर्मवर जावे. आणि युडायस प्लस मधील माहिती दुरुस्त करावयाची असल्यास माहिती दुरुस्त करावी.
६. सन २०२५-२६ या वर्षाच्या संच मान्यतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित वर कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती शालार्थ प्रणालीकडून घेतली जाणार आहे. एकपेक्षा अधिक माध्यमाची शाळा असल्यास शिक्षकांच्या नावासमोर माध्यमाची नोंद करावी. तसेच विनाअनुदानित तत्वावर वैयक्तिक मान्यता प्राप्त व कार्यरत असलेल्या प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची माहिती भरण्यासाठी शाळास्तरावर संचमान्यता पोर्टलला टॅब मुख्याध्यापक लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
उपरोक्त बाबतची कार्यवाही दिनांक ०७.११.२०२५ पर्यत पूर्ण करुन घेण्यात यावी. सदरची कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यास शाळांच्या सन २०२५-२६ च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगीनवर उपलब्ध होणार नाहीत.
सदरची कार्यवाही न केल्याने एखादया शाळेची संचमान्यता उपलब्ध झाली नाहीतर त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी.
सोबत : User Manual जोडले आहे लिंक
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे
शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
Also Read –
ALSO READ 👇
क. शिसंमा/2024-25/समायोजन/टि-8/02569
दिनांक: एप्रिल, 2025
27 MAY 2025
विषय: सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत..
संदर्भ :-
- शासन निर्णय क्रमांक एसएसएन-2017/(प्र.क्र.22/17)/टिएनटी-2, दि. 15.03.2024
- सन 2024-25 संच मान्यता
- शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र. प्राथ अतिरिक्त/2025/1249435, दि. 15.05.2025
- शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आस्था-क/टे का.प्राथ अतिरिक्त 2025/1805, दि.22.05.2025
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती विषद केली आहे.
सन 2024-25 ची संच मान्यता शासन निर्णय दि. 15.03.2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दि.30,09,2024 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च 2025 व एप्रिल 2025 च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सदर सन 2024-25 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती शासनास सादर करावयाची आहे. त्यानुषंगाने एकूण अतिरिक्त ठरलेल्या माध्यमनिहाय शिक्षकांची संख्या आणि माध्यमिक विभागातील जिल्हानिहाय आणि विषयनिहाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती दि.28.05.2025 पर्यंत संचालनालयास सादर करावी.
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
शिक्षण निरीक्षक (पश्चिम/दक्षिण/उत्तर), बृहन्मुंबई
Also Read 👇
Sanch Manyata
क्र. शिसंमा/2024-25/समायोजन/टि-8/2203
दिनांक: 28 APR 2025
विषय :- सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत….
संदर्भ :- 1. शासन निर्णय क्रमांक एसएसएन-2017/(प्र.क्र.22/17)/टिएनटी-2, दि. 15.03.2024
2 सन 2024-25 संच मान्यता
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय दि.15.03.2024 अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती विषद केली आहे.
सन 2024-25 ची संच मान्यता शासन निर्णय दि. 15.03.2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दि.30.09.2024 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च 2025 व एप्रिल 2025 च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सदर सन 2024-25 च्या संचमान्यतेनुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हास्तरावर अनुदान प्रकार (अनुदानित/अंशतः अनुदानित) व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दि. 13.05.2025 पर्यंत पूर्ण करावी.
दिनांक 13.05.2025 रोजी समायोजन झालेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरीत झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
तद्नंतर जिल्हास्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा/अतिरिक्त शिक्षक कर्मचारी (असल्यास) यांची यादी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दि.15.05.2025 पूर्वी सादर करावी.
विभागीय शिक्षण उपसंचालक, यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दि.22.05.2025 पर्यंत पूर्ण करावे. व उर्वरित रिक्त पदांचा तपशिल/अतिरिक्त कर्मचारी यांदी (रिक्त पदांचा प्रवर्ग/विषय/अनुदानाचा/व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास दि. 25.05.2025 पूर्वी सादर करावा, दिनांक 22.05.2025 रोजी विभागस्तरावर समायोजन झालेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरीत झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार समायोजन प्रक्रीया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करुन विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशिल/अतिरिक्त कर्मचारी यांदी (रिक्त पदांचा प्रवर्ग/विषय/अनुदानाचा/व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास सोबत जोडलेल्या नमून्यामधील तपशिलासह दि.25.05.2025 पूर्वी सादर करावा,
सदर बाब माध्यमिक/ उच्च माध्यमिक दोन्ही स्तराला लागू आहे.
प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र शासनशिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे
प्रति,विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरीक्षक (पश्चिम/दक्षिण/उत्तर), बृहन्मुंबई
Also Read 👇
संच मान्यता 2024-25 Update :
सरल संच मान्यता पोर्टलवर SM e-Sign टॅब सक्रिय झाला असून मुख्याध्यापक लॉगिन केल्यावर या टॅबवर क्लीक केल्यास सन 2024-25 ची संच मान्यता pdf स्वरूपात मा.शिक्षणाधिकारी यांच्या Digital Signature असलेली Download होत आहे. लॉगिन करून संच मान्यतेत दिलेले पद तपासून पहावे
वेबसाईट :
Also Read 👇
Sanch Manyata
Regarding the action to be taken regarding the pending Figure approval of the Zilla Parishad Primary School
क्रमांक : प्राशिसं/संमादु/२५/टे-५००/१४७४
दिनांक : १३.०३.२०२५
विषय : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रलंबित संचमान्यते विषयी करावयाच्या कार्यवाही बाबत..
उपरोक्त विषयी सन २०२४-२५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संचमान्यता आपल्या लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तथापि काही जिल्हा परिषद शाळेच्या संचमान्यता खालील कारणावरुन प्रलंबित आहेत. सदर प्रलंबित शाळेची यादी कारणासहित सोवत देण्यात येत असून भ्रमणध्वनीच्या ग्रुपवरही यादी देण्यात आली आहे. तरी, शाळेच्या नावासमोर दिलेल्या कारणाबाबत तात्काळ दिनांक १८.०३.२०२५ पुर्वी आवश्यक कार्यवाही करुन सदर शाळेच्या संचमान्यता उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावो.
अ.क्र.कारण
१ Data not available for S.M.
२ Sanch Base Post Data Not available
३ Student Data Not available
४ Student, School & Base Post Medium Mismatch
करावयाचो कार्यवाही
सदर शाळेच्या कार्यरत पदाची व शाळेची माहिती अंतिम करावी.
सदर शाळेची मागील वर्षाची संचमान्यता असलेल्या प्रलंबित कारणाचा निपटारा करुन संचमान्यता सन २०२३-२४ करुन घ्यावी.
विद्यार्थ्याची माहिती संचमान्यतेकरीता फॉरवर्ड करावी.
विद्यार्थ्याचे, शाळेचे माध्यम एकच असल्याचे खात्री करावी. एकापेक्षा अधिक माध्यम लागू नसल्यास सदरचे माध्यम शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरुन रिक्वेस्ट करुन शिक्षण उपसंचालक यांच्यास्तरावरुन मान्य करुन घ्यावेत. तसेच असे आढळून आले आहे की, सेमी इंग्रजी असताना शाळेचे माध्यम मराठो ऐवजी इंग्रजी करुन घेतले आहे. सेमी इंग्रजीची मान्यता असल्यास माध्यमात बदल होत नाही तरी अशा शाळांच्या बाबतीत माध्यम मागील वर्षाप्रमाणे ठेवावे.
२/- तसेच काही शाळांनी त्यांच्या वर्ग खोल्यांची माहिती शून्य नमूद करुन अंतिम केलेली आहे. त्यामुळे अशा शाळांना पदे मंजूर झालेले नाहीत. तरी अशा शाळांची यादी तयार करुन तात्काळ संचालनालयास सादर करावी. उपरोक्त निर्देशाप्रमाणे तातडीने कार्यवाही न झाल्यास आपणावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
शिक्षण संचालक
प्राथमिक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
Sanch Manyata
क्रमांक : प्राशिसं/सं.मा.दु/२४-२५/टे-५००/४१५
दिनांक : २० ०२.२०२५
FEB 2025
विषय: संचमान्यता २०२४-२५ बाबत..
उपरोक्त विषयी जिल्हा परिषद शाळेच्या सन २०२४-२०२५ च्या संचमान्यता शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ व अनुषंगिक शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तरी सदर उपलब्ध झालेल्या संचमान्यता तातडीने तपासून शासन निर्णयानुसार पदे अनुज्ञेय झाले आहेत किंवा कसे याबाबत खात्री करावी. संच मान्यतेमध्ये त्रुटी असल्यास संचालनालयास दिनांक २५.०२.२०२५ पुर्वी अवगत करावे. त्यानंतर आलेल्या त्रुटी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.

तसेच ज्या शाळेने दिनांक ३०.०९.२०२४ रोजी विद्यार्थी ऑनलाईन प्रणाली मध्ये नोंदविले नाहीत व ज्या शाळेमधील एकही विद्यार्थी आधार प्रमाणित केला नाही अशा शाळांची यादी संचालनालयास उपलब्ध करुन देण्यात यावी. त्याच प्रमाणे सद्यस्थितीत ज्या शाळांचे विद्यार्थी संचमान्यतेकरीता केंद्र प्रमुख/गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑनलाईन फॉरवर्ड केले आहेत व ज्या शाळांनी वर्कीग पोस्ट भरली आहे अशा शाळांच्या संचमान्यता झाल्या आहेत. तरी उर्वरित शाळांच्या ऑनलाईन विद्यार्थी फॉरवर्ड करावे व कार्यरत पदांची माहिती शाळास्तरावरुन अंतिम करावी.
शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, (सर्व)
क्रमांक : प्राशिसं/संकीर्ण/२४/८-५००/5653
दिनांक : .०८.२०२४
23 AUG 2024
विषय: संचमान्यता सन २०२४-२०२५ बाबत..
संदर्भ : शासन पत्र क्रमांक न्यायाप्र-२०२४/प्र.क्र.१६७/टिएनटी-२, दिनांक १२.०७.२०२४
उपरोक्त विषयी मा.उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथील रिट याचिका क्रमांक २८२२/२०२४ व रिट याचिका क्रमांक ५४७२/२०२४ मधील दिनांक १२.०६.२०२४ रोजीच्या आदेशान्वये मा. न्यायालयाने रिट याचिका क्रमांक २८९६/२०२४ मधील दिनांक १५.०३.२०२४ रोजीच्या आदेशातील परिच्छेद ५ मधील निर्देशाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये शासनाने निर्देश निर्गमित केलेले आहेत.
२/- शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत.
३/- सदरच्या शासन निर्णयान्वये दिनांक ३०.०९.२०२४ रोजीच्या आधार वैध पट विचारात घेवून संचमान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तरी, सन २०२४-२०२५ च्या संचमान्यता विहित कालावधीत करण्यासाठी ‘सरल’ प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक ३०.०९.२०२४ पुर्वी पुर्ण करुन घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावेत. ‘सरल’ प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती, कार्यरत पदांची माहिती, ‘सरल’ प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती, विद्यार्थ्यांचे आधार वैधता व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पुर्ण करण्यात यावेत. यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहतील यांची नोंद घेण्यात यावी.
(शरद गोसावी) शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व)
Also Read 👇
Sanch Manyata संच मान्यता 2022-23 चे कामकाज गटशिक्षणाधिकारी यांचेकडून 7 जूलै 23 पर्यंत करून घेणेबाबत

संच मान्यता Update
| प्रति, शिक्षण उपसंचालक सर्व विभाग |
| विषय : संच मान्यता 2022-23 चे कामकाज गटशिक्षणाधिकारी यांचेकडून 7 जूलै 23 पर्यंत करून घेणेबाबत |
| ज्या शाळांचे आधार Validation हे ९०% पेक्षा जास्त झालेले आहे परंतु शाळेतील उर्वरित 10%% विद्यार्थी Invalid /Unprocessed मध्ये आहेत काही तांत्रिक कारणास्तव त्या 10% विद्यार्थ्यांची आधार माहिती वैध होत नाहीत असे विद्यार्थी सन २०२२-२३ या वर्षाच्या संच मान्यतेकरीता विचारात घेण्याची सुविधा गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीन मध्ये दिलेली आहे हि सुविधा फक्त 7 जूलै २०२३ पर्यंत उपलब्ध असणार आहे 7 जूलै २०२३ नंतर संच मान्यता ह्या अंतिम केल्या जाणार आहेत त्यामुळे आपल्या विभागातील शाळांचे त्यांच्या १०% आधार *वैध्य न झालेल्या संख्येमुळे त्यांच्या गतवर्षीच्या मंजूर पदामध्ये फरक पडत असेल तरच* अशा १०% अवैध आधार असलेले विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित आहेत व ते इतरत्र कुठे हि प्रवेशित नाहीत याचे पुरावे आपल्या केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयास देऊन असे विद्यार्थी संच मान्यतेस गृहीत धरण्याची प्रक्रिया त्यांच्या लॉगिन मधील संच मान्यता approval 2022-23 टॅब मधून 7 जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्यास आपल्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यास सूचित करावे संबंधित सुविधेचा लाभ 7 जुलै 2023 पर्यंतच असणार आहे त्यामूळे आपल्या विभागातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून संबंधित कामकाज करून घ्यावे सोबत गतवर्षीची संच मान्यता प्रत पाहून कामकाज करण्यास सांगावे पद कमी होत असलेल्या शाळेसाठीच सदर सुविधेचा वापर करण्यास सूचित करावे |
| डॉ. वंदना वाहूळ शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे |
| Sanch Manyata संच मान्यता दिनांक १५/०५/२०२३ पर्यंत अंतीम करणे बाबत १५ मे २०२३ ला संचमान्यता होणार अंतीम |
| महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवती इमारत, पुणे |
| दि. 07 JUN 2023 प्रति, जिल्हा परिषदा (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (सर्व) (पश्चिम / उत्तर / दक्षिण ) |
| विषय :- शाळेतील दिनांक ३०/११/२०२२ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत. |
| संदर्भ :- १. शासन निर्णय दिनांक ०६/०२/२०२३ व शासन पत्र दिनांक २३/११/२०२२ २. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या समवेत दिनांक २६/०५/२०२३ रोजी झालेली बैठक https://eshala.in |
| सरल प्रणालीतर्गत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पध्दतीने एनआयसी, पुणे यांच्या मार्फत करण्यात येतात. त्यानुसार संदर्भाधिन शासन निर्णय दिनांक ०६/०२ / २०२३ शासन पत्र दिनांक २३ / ११ / २०२२ मधील तरतुदीनुसार दिनांक ३० / ११ / २०२२ रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यापैकी दिनांक १५/०६/२०२३ अखेर आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२२-२३ ची संच मान्यता अंतिम करण्यात येणार आहे. |
| सध्यस्थितीत किमान ८० टकके विद्यार्थी वैध विचारात घेवून अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत, शाळांकडून विद्यार्थी वैध करण्याची कार्यवाही योग्य प्रकारे सुरु आहे. परंतु विद्यार्थ्याच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा कांही विद्यार्थ्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यामुळे शाळेतील सन २०२२-२३ च्या मंजुर पदावर विपरित परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्याच्या नावाच्या यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबंधित गटशिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यापैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्याची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील. विद्यार्थ्यांची पडताळणी करताना खालील बाबीची खात्री करावी. (प्रमाणपत्र पडताळणी प्रपत्र १ ते ३ सोबत जोडले आहे.) |
| महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवती इमारत, पुणे |
| क्र. प्राशिसं/ सुमोटो याचिका / टे ५०२ / शिक्षक भरती / २०२३ / ३४२५ दिनांक २७.०४.२०२३ |
| प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, बालय, मुंबई-३२ |
| विषय :- सुमोटो जनहित याचिका क्र ०२ / २०२२ या याचिकेमध्ये मा. न्यायालयाचे अंतरिम निर्देशानुसार कार्यवाही करण्याबाबत. |
| संदर्भ- १. सुमोटो याचिका क्रमांक ०२ / २०२२ मधील मा. न्यायालयाचे आदेश दि. १७/४/२०२३. २. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२२/प्रक्र. १०६ / टीएनटी-१ दि. १०/११/२०२२ |
| महोदय मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे सुमोटो याचिका क्रमांक ०२ / २०२२ दि रजिस्ट्रार ज्युडीसियल बेंच औरंगाबाद विरुध्द महाराष्ट्र शासन दाखल आहे. सदर याचिकेमध्ये दि. १७/०४/२०२३ रोजी मा. न्यायालयाने खालील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत. |
| As such, we are listing this PIL on 28/4/2023 at 04.00 pm, to enable to learned AGP to make a statement considering that the next academic year of schools would commence from the second week of june.2023. |
| मा. न्यायालयाचे उपरोक्त निर्देश पाहता दिनांक २४ / ०३ / २०२३ रोजी शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ रोजीच्या निकालानंतरची शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे. याबाबतची सध्यस्थिती खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. |
| १. संदर्भीय क्रमांक २ चा शासन निर्णय दिनांक १० / ११ / २०२२ अन्वये सन २०२३ मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड- १९ च्या पार्श्वभुमीवर २ वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात आलेले आहे. |
| २. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ रोजीच्या निकालानंतर होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातुन एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर रिक्त पदांसाठीच्या जाहिराती घेण्यात येतील. या कालावधीमध्ये प्राप्त जाहिरातीमधुन पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी नियुक्तीच्या शिफारसीसाठी यादी प्रसिध्द करण्यात येईल. |
| ३. कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर सन २०१९-२० पासून शाळांच्या संच मान्यता जैसे थे ठेवण्यात आलेल्या होत्या. आता कोविड- १९ नंतर झालेले विद्यार्थ्याचे स्थलांतर परिस्थितीतील बदल इत्यादी बाबी विचारात घेवून तसेच जनहित याचिका क्रमांक १०२ / २०२१ मध्ये दिनांक ०१/०८/२०२२ रोजीच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आलेली होती, सदर समितीच्या शिफारशीच्या आधारे उपाय योजना करण्याच्या अनुषंगाने शासनाने शासन निर्णय दिनांक ०६ / ०२ / २०२३ अन्वये प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थी संख्या निश्चित करण्यासाठी “आधार” वैध विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२२-२३ ची शिक्षक निश्चितीसाठी संच मान्यता करण्यात येत आहे. सद्यस्थितीत आधार वैध विद्यार्थी संख्येवर आधारित अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. आधार वैधतेची कार्यवाही पूर्ण झालेली नाही अशी विद्यार्थी वैधतेची कार्यवाही शाळास्तरावर सुरु आहे. ही कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेल्या संच मान्यता दिनांक १५/०५/२०२३ पर्यंत अंतीम करण्याचे नियोजन आहे. |
| या अंतीम झालेल्या संच मान्यतांतील मंजूर पदांनुसार पदभरतीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. ज्या ज्या व्यवस्थापनांकडून संच मान्यता २०२२-२३ ची कार्यवाही अंतीम होईल त्या त्या व्यवस्थापनांनी त्यांचेकडील शिक्षक पदांची बिंदुनामावली प्रमाणित करुन पवित्र पोर्टलवर रिक्त पदांचे जाहिरात देण्याबाबतचे निर्देश देणे आवश्यक आहे. याकरीताचे संभाव्य नियोजन पुढीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. |
| अ) संच मान्यता अंतीम करुन संच मान्यतेचे शाळानिहाय वितरण करण्यासाठी लागणारा एकुण संभाव्य कालावधी दि. २०/०५/२०२३ पर्यंत. |
| ब) संच मान्यता अंतीम झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून बिंदु नामावली इत्यादी प्रमाणित करण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी दिनांक ३०/०६/ २०२३ पर्यत. |
| क) शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नोंद करणे (पहिल्या तिमाहीकरिता)- सुमारे १५/०७/२०२३ पर्यंत. |
| ड) पहिल्या तिमाहीकरिता प्राप्त जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे इत्यादी बाबी पोर्टलमार्फत करणे- दिनांक २०/०८/२०२३ पर्यंत. दरम्यानच्या कालात दुसऱ्या तिमाहीकरीता शिक्षकांच्या रिक्त पदांची नोंद करणे. |
| तथापि, मागील शिक्षक पदभरतीतील जाहिरातीतील १२०७० पैकी मुलाखतीशिवाय पदभरतीमध्ये ५९७० उमेदवारांची शिफारस झालेली आहे व मुलाखतीसह पदभरतीमध्ये १९३३ रिक्त पदांसाठी शिफारस झालेली असून एकुण ७९०३ रिक्त पदभरतीची कार्यवाही झालेली आहे. सध्यस्थितीत १९६ व्यवस्थापनांना एसईबीसी आरक्षणामुळे निवड प्रक्रिया पुर्ण न झालेल्या व्यवस्थापनाची निवड प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून व्यवस्थापनांना मुलाखतीसाठी माहे मे २०२३ मध्ये उमेदवार उपलब्ध होणार आहेत यातुन ७६९ रिक्त पदे भरली जातील. तसेच याचिका क्र ११०८१ / २०१९ मधील समांतर आरक्षणातील उमेदवारांना संधी देण्यासाठी शासन पत्र दिनांक १९/०४/२०२३ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्यांमुळे रिक्त राहिलेल्या पदांसाठी उमेदवारांना शिफारस करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थातील अंदाजे ७५० रिक्त पदे भरली जाणार आहेत. |
| वर नमुद केल्याप्रमाणे शिक्षक पदभरतीचे मागील पदभरतीतील शिल्लक असलेले साधारणपणे १५०० रिक्त जागा तसेच शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी- २०२२ नुसार होणाऱ्या पदभरतीचे नियोजनाची वस्तुस्थिती मा. न्यायालयाच्या अवलोकनी आणण्यासाठी वस्तुस्थिती सादर करण्यात येत आहे. |
| शिक्षण संचालक (शरद गोसावी) प्राथमिक शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे-१ |








Ok