Post Mapping In Shalarth Pranali According To Sanchmanyta
Post Mapping In Shalarth Pranali According To Sanchmanyta
क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/पोस्ट मॅपींग/एपीआय / 2400
दिनांक :- ९/०५/२०२५
विषय – संच मान्यता पोस्ट मॅपींग पश्चात उच्चतम मंजूर पदाच्या मर्यादेत वेतन आहरित करणेबाबत.
संदर्भ – १. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/शिक्षक शिक्षकेतर/संचमान्यता पोस्ट मॅपींग/२०२५/टि-७/१३७८ दि. २०.३.२०२५
२. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२०२५ (टि-७/)/ शालार्थ/पोस्ट मॅर्पीग/१७९७ दि. २.४.२०२५
३. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२०२५ (टि-७/)/ शालार्थ/पोस्ट मॅपींग/१९४७ दि. १५.४.२०२५
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, राज्यातील माध्यमिक शाळांच्या (अनुदानित/अंशतः अनुदानित) सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यता आधारे पोस्ट मॅपींग प्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यानुसार NIC कडील संचमान्यता API चा वापर करून संचमान्यता व शालार्थ प्रणाली यांचे Interpetition करून शालार्थ प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे. जेणेकरून संचमान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन आहरित होणार नाही.
यासंदर्भात माध्यमिक शाळांमधील पोस्ट मॅपींग कामकाज माहे जून वेतन पेड ईन जूलै २०२५ पूर्वी पूर्ण करावे. तसेच उच्च माध्यमिक (अनुदानित/अंशतः अनुदानित) शाळांच्या संचमान्यतेची शालार्थ प्रणालीवर नोंद करण्याची व या संचमान्यता PDF स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उच्च माध्यमिक शाळांच्या संचमान्यता आधारे शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेमध्ये उच्चतम मान्य पदापेक्षा अधिक पदांचे वेतन आहरित होणार नाही यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. करीता उच्च माध्यमिक शाळांचे जूलै वेतन पेड ईन ऑगस्ट २०२५ पूर्वी संचमान्यता पोस्ट मॅपींग व संचमान्यता PDF स्वरूपात अपलोड करणे ही कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा उपरोक्त प्रमाणे नमूद महिन्याचे वेतन शालार्थ प्रणालीवरून अदा करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
शिक्षण सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व
३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई.
४) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व
Also Read 👇
Post Mapping In Shalarth Pranali According To Sanchmanyta
Post Mapping In Shalarth Pranali According To Sanchmanyta
क्र. शिसंमा/२०२५/टि-७/ शालार्थ/पोस्ट मॅपींग / 1947
दिनांक: १५/०४/२०२५.
विषय- संचमान्यता-पोस्ट मॅपींगची कार्यवाही पूर्ण करणेबाबत.
संदर्भ-
१. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/शिक्षक शिक्षकेतर / संचमान्यता पोस्ट मॅपींग/२०२५/टि-७/१३७८ दि. २०.३.२०२५
२. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२०२५ (टि-७/)/ शालार्थ/पोस्ट मॅपीग/१७९७ दि. २.४.२०२५
संचमान्यता पोस्ट मॅपींगची कार्यवाही दिनांक ३१.३.२०२५ पर्यंत पूर्ण करणेबाबत संदर्भीय पत्रान्वये तसेच व्हाटसअॅप ग्रुप आणि व्हीसीद्वारे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही राज्यातील एकही जिल्हयाचे पोस्ट मॅपीगचे कामकाज १०० टक्के पूर्ण झालेले नाही. सदरील बाब प्रशासकीयदृष्ट्या गंभीर असून पोस्ट मॅपीगचे काम वारंवार सूचित करूनही विहित कालमर्यादेत पूर्ण होत नाही याबाबत आपले जिल्हयाच्या वेतन पथकाद्वारे मान्य पदापेक्षा जास्त पदाचे वेतन आहरीत केले जात असावे अशी शक्यता वाटते.
या पत्राद्वारे पुनःश्च कळविण्यात येते की, संचमान्यता पोस्ट मॅपींगची कार्यवाही दिनांक १९/४/२०२५ पर्यंत पूर्ण करावी. धुळे, रायगड, बीड, हिंगोली, जळगांव या जिल्यामधील मॅपींगची कार्यवाही अत्यंत मंद गतीने सुरू असून याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) पुरेस गंभीर नसल्याचे दिसून येते.
पोस्ट मॅपींग कामकाजात मुख्याध्यापक स्तरावरून कामकाज होत नसल्यास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संबंधित मुख्याध्यापक यांची त्वरीत व्हीसीद्वारे बैठक घेऊन दिनांक १९/४/२०२५ पूर्वी मुख्याध्यापक व अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) स्तरावर पोस्ट मॅपींगचे काम पूर्ण होईल याबाबत सूचना देण्यात याव्यात.
दिनांक १९/४/२०२५ पर्यंत पोस्ट मॅपीग न झालेल्या जिल्हयातील अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) यांनी दिनांक २१/४/२०२५ रोजी व्यक्तीशः संचालनालयात उपस्थित राहावे,
मा. शिक्षण सहसंचालक यांचे मान्यतेने.
सोबत परिपत्रक पीडीएफ व जिल्हा निहाय प्रगती अहवाल जोडला आहे
प्रशासन अधिकारी (अंदाज व नियोजन)
प्रत्ति,
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. सर्व
२. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)
३. अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) सर्व.
Also Read –
Post Mapping In Shalarth Pranali According To Sanchmanyta
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे
शिसंमा-२०२५-(टि-७)/शालार्थ/पोस्ट मॅपींग | 1797
दि.-२.०४.२०२५
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प.सर्व.
२. शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)
३. अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्य), सर्व.
विषयः- संचमान्यता-पोस्ट मॅपींगची कार्यवाही पूर्ण करणेबाबत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या दिनांक १/०४/२०२५ रोजीच्या पोस्ट मॅपींग अहवालाचे अवलोकन व्हावे.
प्रस्तुत प्रकरणी वारंवार सूचना देऊनही मुंबई, रायगड, बीड, हिंगोली, जळगाव व धुळे या जिल्हयांची पोस्ट मॅपींग कार्यवाही ४० टक्के पेक्षा कमी असून छत्रपती संभाजीनगर, ठाणे व अकोला या जिल्हयांची कार्यवाही ५० टक्के पेक्षा कमी आहे. यासंदर्भात लेखी सूचना तसेच व्हि.सी.द्वारे वारंवार कळवूनही या कामाकडे दूर्लक्ष केले जात असून सदरील बाब प्रशासकीयदृष्टया गंभीर आहे. राज्यातील पोस्ट मॅपींग कार्यवाही ३१ मार्च, २०२५ पूर्वी होणे अपेक्षित असतांना अद्यापही राज्यातील बहुतांश जिल्हयात पोस्ट मॅपींग कार्यवाही अपूर्ण आहे.
करीता आपल्या जिल्हयातील पोस्ट मॅपींग कार्यवाही दिनांक ९/०४/२०२५ पूर्ण करावी, अन्यथा संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) यांचेवर जबाबदारी निश्चित का करण्यात येवू नये ?
सोबत परिपत्रक पीडीएफ व जिल्हा निहाय प्रगती अहवाल जोडला आहे
शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक
प्रतः-
१. मा.आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांना माहितीस्तव सविनय सादर.
२. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांना आवश्यक कार्यवाहीस्तव.
Also Read 👇
Post Mapping In Shalarth Pranali According To Sanchmanyta
Regarding the immediate completion of Post Mapping in
संचमान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping तात्काळ पूर्ण करणेबाबत.
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ / संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/ 617 प्रति,
दिनांक : ४/०२/२०२५
10 FEB 2025
विषय :- संचमान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping तात्काळ पूर्ण करणेबाबत.
संदर्भ-
१) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/४२४ दि. १९/०१/२०२३.
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/४३७१ दि. २५/०८/२०२३.
३) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/४९१८ दि. २०/०९/२०२३.
४) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/५२६७दि. १३/१०/२०२३.
उपरोक्त विषयी संदर्भिय पत्राचे अवलोकन करावे.
उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रान्वये संचमान्यतेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या शेवटच्या वर्षाच्या संचमान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे Post Mapping करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती सदर सुविधेनुसार Post Mapping चो कार्यवाही शालार्थ मध्ये तातडीने पूर्ण करणेबाबत आपणास संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतू अद्यापही शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेनुसार सर्व कर्मचा-यांचे Post Mapping पूर्ण झालेले नाही.
शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping पुर्ण केल्याशिवाय सप्टेंबर २०२३ चे वेतन देयक (बिल) शालार्थ प्रणालीमध्ये जनरेट होणार नाही असे संदर्भ क्र. २ अन्वये कळविण्यात आले होते. परंतू मा. आमदार व विविध संघटना यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्र. ३ अन्वये माहे सप्टेंबर २०२३ चे वेतन आहरित करण्यास मान्यता देण्यात आलेली होती. व Post Mapping पूर्ण करण्यसाठी १ महिना मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये पुनश्च १ महिना मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि अद्यापही बहुतांश कर्मचा-यांचे Post Mapping पुर्ण झालेले नाही. त्यामुळे सदर बाबतीत Post Mapping पुर्ण करण्यासाठी दि. २३/२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. अद्यापही प्रलंबित असलेल्या Post Mapping चा तपशिल सोबत डिडिओ-१ शाळानिहाय Excel Sheet आणि डिडिओ-२ अधीक्षक, वेतन पथक Excel Sheet सोबत जोडला आहे.
तरी आपल्या जिल्हयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे संचमान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार Post Mapping करणे आवश्यक असल्याने शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping दिनांक २२/०२/२०२५ पर्यंत पुर्ण करण्यात यावे. याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी आपलेस्तरावरून संबंधित कार्यालयास सूचित करावे.
(प्रफुल शहा) प्र. शिक्षण उपसंचालक
(प्राथमिक, शिक्षण संचालनालय): महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर.
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत- श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट (शालार्थ सिस्टिम), महाआयटी, मुंबई, यांना माहितीस्तव.
(अनंत प्र. शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन)
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)