Samuh Sadhan Kendra Samnvyak Kendra Pramukh Pariksha 2025
Samuh Sadhan Kendra Samnvyak Kendra Pramukh Pariksha 2025
Cluster head Exam Online Registration Application Link
Group Resource Center Coordinator (Center Head) Limited Departmental Competitive Examination-2025 online apply link
Samuh Sadhan Kendra Samnvyak Vibhagiy Pariksha 2025
Kendra Pramukh Pariksha December 2025 notification exam date schedule exam time table apply link
IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY APPELLATE SIDE CIVIL JURISDICTION
WRIT PETITION NO. 2993 OF 2026
Ajay Chokha Kate And Ors45
….PETITIONER
V/S
The State Of Maharashtra Thr The Sec. Of RuralRESPONDENT Dev. And Ors
WITH
INTERIM APPLICATION NO. 2221 OF 2026
In
Writ Petition 2993 OF 2026
Raju Kacharu Ghotekar
….PETITIONER
V/S
Ajay Chokha Kate And Ors
….RESPONDENT
Ms Preeti Walimbe a/w Ms Rutika Bhoir a/w Adv. Mayank Tripathi for Petitioner in WP Nos.3888/2026, 2993/2026, 4147/2026
Sr. Adv. Prashant Katneshwarkar a/w Adv. Shrirang Katneshwarkar a/w Adv. Sandeep Gupta for Applicant in IAno. 2490/2026,
Adv. Sujeet Karlekar a/w Shri Akshay Karlekar a/w Shri Sandeep Gupta i/b Adv. Shrirang Katneshwarkar for Applicant in IA/2489/2026 Adv.
Adv. Shri Shrirang Katneshwarkar a/w Shri Sandeep Gupta Adv for Applicant in IA/2221/2026
Sr Adv Shri Ram S Apte a/w Shri Harshal P Nahata and Shri Sandeep Gupta, Shri Saurabh B Mishra i/b Adv. Shri Shrirang Katneshwarkar Adv for Applicant in IA/2487/2026
Shri Saurabh Pakale a/w Shri Nilesh Desai i/b Ms Padmaja Malgaonkar, Adv for Petitioner in W P No.4011/2026
Shri Sumedh S Modak MSCE in all matters.
Shri B V Samant, Addl G P a/w Ms PMJ Deshpande, AGP in W P No.2993/2026 and W P No.4011/2026
Shri O. A. Chandurkar, Addl G P a/w Ms P N Diwan, AGP in W P No.3888/2026
Ms. M. P. Thakur, AGP in W P No.4147/2026
CORAM:
HON’BLE SHRI JUSTICE RAVINDRA V.
GHUGE & HON’BLE SHRI JUSTICE ABHAY J. MANTRI, JJ
DATE: 2nd April, 2026
P.C.:
Arguments are concluded. Judgment/ order is reserved.
(FOR REGISTRAR JUDICIAL – I)
ALSO READ 👇
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय,
मुंबई
क्रमांक : संकीर्ण २०२६/प्र.क्र. ४९/टीएनटी-१
दिनांक:- २० फेब्रुवारी २०२६.
प्रति,
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
विषय- समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय परीक्षा-२०२५ निकालाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळणेबाबत.
संदर्भ:
१. आपले पत्र क्र. मरापप/बापवि/२०२६/५१८, दि.०६.०२.२०२६.
२. सिव्होल अपील क्र. १३८५/२०२५ या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेला दिनांक ०१.०९.२०२५ रोजीचा न्यायनिर्णय.
३. शासन अधिसूचना, ग्राम विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२२१/आस्था-१४, दि.१८.०७.२०२५.
४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण
२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दि.२९.०८.२०२५.
५. शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण
२०२५/प्र.क्र.७९१/टिएनटी-१. दि.१९.०१.२०२६.
महोदय,
संदर्भीय क्र.१ येथील पत्रान्वये आपण समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय परीक्षा-२०२५ निकालाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळणेबाबत विनंती केली आहे. आपण उपस्थित केलेले मुद्दे व अन्य संभाव्य मुद्दे याअनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करुन विषयांकित परीक्षेचा निकाल अंतिम करण्यात यावा :-
(i) सन २०२३ मध्ये सदर पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यावेळी त्या परीक्षेसाठी अर्ज सादर करणा-या उमेदवारांनी सन २०२५ मधील नवीन परीक्षेसाठी नव्याने अर्ज करु नयेत व अशा उमेदवारांसाठी स्वप्रमाणिकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठीची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी तरतूद दिनांक २९.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयात करण्यात आली होती. वस्तुतः सन २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेली परीक्षा ही ग्राम विकास विभागाच्या दिनांक १०.०६.२०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार विहीत करण्यात आलेल्या समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या पदाच्या पदभरतीचे प्रमाण व अर्हता या आधारावर घेण्यात येणार होती. दिनांक १०.०६.२०१४ रोजीची अधिसूचना ग्राम विकास विभागाच्या दिनांक १८.०७.२०२५ रोजीच्या अधिसूचनेन्वये अधिक्रमित झाली आहे. नवीन अधिसूचनेनुसार सन २०२५ ची परीक्षा घेण्यात आली आहे. पदभरतीचे प्रमाण व अर्हता नव्याने निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जिल्ला परीषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश नियम) नियमात आवश्यक ती दुरुस्ती नवीन अधिसूचनेनुसार करण्यात आली आहे. सन २०२३ च्या परीक्षेच्या वेळी असणारी अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करणारी तत्कालीन अधिसूचना अधिक्रमित झाल्याने सन २०२३ च्या परीक्षेच्या वेळी उमेदवारांची अर्हता काय होती. ही बाब विचारात घेण्याची आवश्यकता नाही. केवळ प्रशासकीय सोय म्हणून सन २०२३ च्या परीक्षेस प्रविष्ठ उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तथापि, स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्याची मुभा असेल असा निर्णय सन २०२५ च्या परीक्षेच्या वेळी घेण्यात आला होता. थोडक्यात सन २०२३ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना त्या सर्व अटी व शर्तीचो पूर्तता करणे आवश्यक आहे, ज्या अटी व शर्ती सन २०२५ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी विहीत करण्यात आल्या आहेत.
(ii) मर्यादित विभागीय परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती आहे, ही बाब स्पष्ट आहे. त्याबाबतचा उल्लेख दिनांक २९.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयात करण्यात आलेला आहे. टिईटी अनिवार्यतेबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय दिनांक ०१.०९.२०२५ रोजी पारीत झाला आहे. समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय परीक्षेची प्रथम अधिसूचना दिनांक २९.०९.२०२५ रोजी निर्गमित झालेली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी मा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय लागू असणार आहे, ही बाब स्पष्ट आहे. ही बाब विचारात घेऊनच या अधिसूचनेतील परीच्छेद क्र. ४.५ अन्वये अशी तरतूद करण्यात आली होती की, वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार, वेळोवळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात आलेल्या या विभागाच्या दिनांक १९.०१.२०२६ रोजीच्या पत्रान्वये यापूर्वीच असे स्पष्ट करण्यात आले आहे की, टिईटी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता ज्यांनी धारण केली आहे, केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. त्यामुळे दोन वर्षाच्या कालावधीत उमेदवार टिईटी उत्तीर्ण होतील, या अटीच्या अधिन राहून त्यांचा समावेश अंतिम निवडसूचीत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
(iii) समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय परीक्षा-२०२५ या परीक्षेसाठी दिनांक ०१.०१.२०२६ रोजीची पात्रता विचारात घेण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिनांक ०४.११.२०२५ रोजीच्या सुधारित अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते. या तरतूदीचे प्रत्यक्ष अवलोकन केले असता, दिनांक ०१.०१.२०२६ रोजी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या संवर्गातील उमेदवारांची त्या त्या पदावर किमान ६ वर्ष अखंडित सेवा पूर्ण झाली आहे किंवा कसे, केवळ इतकीच बाब विचारात घ्यावयाची आहे. त्यामुळे माहे जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये टिईटी उत्तीर्ण उमेदवारांचा समावेश निवडसूचीत करण्यात यावा.
(iv) समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या पदावर नियुक्तीसाठी मर्यादित विभागीय परीक्षेस प्रविष्ठ होणारे उमेदवार खालील दोन संवर्गातील असतील असे, ग्राम विकास विभागाच्या दिनांक १८.०७.२०२५ च्या अधिसूचनेत नमूद आहे.
अ) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) असा संवर्ग ज्यांची नियुक्ती उच्च प्राथमिक शाळेत केली जाते. किमान शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व व्यावसायिक अर्हता डीएड/बीएड अशी आहे. त्याबरोबरच त्यांनी टिईटी परीक्षेचा पेपर क्र. २ उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
आ) प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक)- असा संवर्ग ज्यांची नियुक्ती प्राथमिक शाळेत केली जाते. किमान शैक्षणिक अर्हता एचएससी व व्यावसायिक अर्हता डीएड अशी आहे. त्याबरोबरच त्यांनी टिईटी परीक्षेचा पेपर क्र. १ उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या संवर्गापैकी ज्यांची शैक्षणिक अर्हता एचएससी ऐवजी पदवी आहे, अशा उमेदवारांना ग्राम विकास विभागाच्या अधिसूचनेन्वये परीक्षेस बसण्यासाठी पात्र करण्यात आले आहे. या अधिसूचनेन्वये केवळ शैक्षणिक अर्हतेबाबत भाष्य करण्यात आले असून, व्यावसायिक अर्हता अथवा टिईटी परीक्षेचा पेपर याबाबत भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे या संवर्गातील पदवीधर शिक्षक जे टिईटी परीक्षेचा पेपर क्र. १ उत्तीर्ण आहेत त्यांचा समावेश अंतिम निवडसूचीत करण्यात यावा.
तसेच उक्त नमूद मार्गदर्शनासह खालील बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहेत. त्यानुसार यथोचित कार्यवाही करण्यात यावीः-.
(i) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जिल्हा निहाय गुणवत्ता यादी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचेकडे सोपवावी
(ii) त्या त्या जिल्ह्यासाठी जाहीरातीत नमूद रिक्त पदे व दिव्यांग आरक्षण विचारात घेऊन जिल्हा निहाय निवड यादी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी त्यांच्या स्तरावर प्रसिध्द करावी. तसेच सदर निवड यादो संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे पाठवून या यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची शिफारस करावी.
(iii) दिव्यांग प्रवर्गासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या पदासाठी कोणत्याही उमेदवाराची शिफारस करण्यात येऊ नये. सदर पद तूर्तास रिक्त ठेवण्यात यावे.
(iv) दिव्यांगांसाठी आरक्षित असलेले व रिक्त राहीलेले पद सर्वसाधारण पात्र उमेदवारांमधून गुणानुक्रमे भरता येईल किंवा कसे, याबाबत सामान्य प्रशासन विभाग व दिव्यांग कल्याण विभागाच्या अभिप्रायानुसार यथोचित वेळी शासन स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात येतोल.
आपला (शरद माकणे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
त माहितीस्तव अग्रेषित
१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
२. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
३. निवडनस्ती-टिएनटी-१
ALSO READ 👇
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04
प्रसिद्धी निवेदन
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्यापैकी परीक्षेस एकूण ३८५५९ परीक्षार्थी उपस्थित होते.
सदर परीक्षेचा निकाल आज दि. १३/०३/२०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेच्या
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या परीक्षार्थी/उमेदवारांची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) /CTET या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्याची माहिती
https://mscepune.in/dtedola/KP२०२६Info.aspx
या लिंक मध्ये भरण्याकरीता दिनांक १६.०३.२०२६ ते २१.०३.२०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
तरी परीक्षार्थी/उमेदवारांमार्फत सदर माहिती भरण्याची मुदत वाढविणेबाबतची विनंती लक्षात घेता माहिती भरण्याकरीता दिनांक २२.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
डॉ. नंदकुमार बेडसे (भा.प्र.से.) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०४.
ठिकाण : पुणे
दिनांक : २०/०३/२०२६

लिंक दि. १६/०३/२०२६ ते ३१/०३/२०२६ पर्यंत उपलबध करून देण्यात आली आहे.
ALSO READ 👇
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४
“समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५”
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र क्र. संकीर्ण२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दिनांक १५.०९.२०२२ व शासननिर्णय दि. २९.०८.२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दि. ०३.०२.२०२६ व दि. ०४.०२.२०२६ या कालावधीत तीन सत्रात आयोजन करण्यात आले होते.
सदर परीक्षेचा निकाल दि.१३.०३.२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर परीक्षेत पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) / CTET या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती
https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx
या लिंकवर दि. १६.०३.२०२६ ते दि. २९.०३.२०२६ पर्यंत भरण्यात यावी. सदरची माहिती दिलेल्या लिकंमध्येच भरण्यात यावी. ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही. सदर मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
घेण्यासाठी तसेच, सदर परीक्षेची गुणपडताळणी/Response Sheet उपलब्ध करुन
https://mscepune.in/DTEDOLA/KP2026ResponseSheet.aspx
या लिंकवर दि. १६.०३.२०२६ ते दि. ३१.०३.२०२६ पर्यंत मुदत देण्यात येत आहे. गुणपडताळणीसाठीचे शुल्क प्रती पेपर रुपये ५००/- सदर लिंकद्वारे भरण्यात यावेत. शुल्क भरल्यानंतर १५ दिवसात उमेदवारांच्या ई-मेल वर Response Sheet उपलब्ध करुन देण्यात येईल. ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही. सदर मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
ठिकाणः पुणे
दिनांक: १६/०३/२०२६
डॉ. नंदकुमार बेडसे (भा.प्र.से)
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४,
ALSO READ 👇
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. प्रसिद्धी निवेदन
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/ टीएनटी ९., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्यापैकी परीक्षेस एकूण ३८५५८ परीक्षार्थी उपस्थित होते.
सदर परीक्षेचा निकाल आज दि.१३/०३/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या परीक्षार्थी उमेदवारांची गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेच्या
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तसेच TET/CTET या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्याची माहिती भरण्याची लिंक यथावकाश
या संकेतस्थळावर देण्यात येईल. सदर परीक्षेची माहिती भरताना जो प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल तेच नमूद करावे.
तरी संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांनी
या संकेतस्थळास भेट द्यावी.
(महेश चीथे) आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४,
ठिकाण : पुणे
दिनांक : १३/०३/२०२६
ALSO READ 👇
Samuh Sadhan Kendra Samnvyak Kendra Pramukh Pariksha 2025 RESULT UPDATE

ALSO READ –
राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागून असलेल्या केंद्रप्रमुख (समूह साधन केंद्र समन्वयक) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबत आज विधानसभेत एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षक बांधवांसाठी आता प्रतीक्षेची घटका संपली आहे.
विधानसभेत नक्की काय घडले?
आज विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केंद्रप्रमुख भरतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अधिकृतपणे माहिती दिली की, केंद्रप्रमुख परीक्षेची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन सकारात्मक पावले उचलत आहे.
शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेतील महत्त्वाचे मुद्दे:
निकालाची तारीख: केंद्रप्रमुख परीक्षेचा निकाल येत्या आठवड्याभरात जाहीर केला जाईल.
नियुक्ती प्रक्रिया: निकाल लागल्यानंतर पुढच्या एक महिन्याच्या आत पात्र उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
रिक्त पदे: राज्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी रिक्त असलेली केंद्रप्रमुखांची पदे तातडीने भरली जातील.
“केंद्रप्रमुख भरतीचा निकाल तांत्रिक प्रक्रियेमुळे प्रलंबित होता, मात्र आता सर्व मार्ग मोकळे झाले असून पुढील सात दिवसांत निकाल पोर्टलवर उपलब्ध होईल. त्यानंतर महिनाभरात शिक्षकांना नियुक्ती दिली जाईल.” — मा. दादा भुसे (विधानसभेत बोलताना)
शिक्षक बांधवांसाठी हे का महत्त्वाचे आहे?
१. प्रशासकीय पदोन्नती: अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळेल.
२. शैक्षणिक गुणवत्ता: केंद्रप्रमुख पद भरल्यामुळे शाळांचे पर्यवेक्षण आणि शैक्षणिक मार्गदर्शन अधिक प्रभावी होईल.
३. मानसिक समाधान: परीक्षेच्या निकालानंतर निर्माण झालेली अनिश्चितता आता दूर होणार आहे.
आता पुढे काय?
परीक्षार्थी शिक्षकांनी आता अधिकृत संकेतस्थळावर (MSCE Pune) लक्ष ठेवणे गरजेचे आहे. निकाल जाहीर होताच गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रांची पडताळणी आणि जिल्हास्तरावरील समुपदेशन प्रक्रिया (Counselling) सुरू होईल.
ALSO READ 👇
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ ऑनलाइन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका
उमेदवार देणार असलेल्या ऑन-लाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबीसंबंधात महत्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे.
खाली दर्शविल्याप्रमाणे ऑन-लाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील.
प्रश्नावली
प्रश्नांची संख्या
200
कमाल गुण
200
कालावधी
120 मिनिटे
पूरक वेळेसाठी पात्र असणाऱ्या दिव्यांग परीक्षार्थ्यांसाठी कालावधी
परीक्षेच्या प्रत्येक तासासाठी 20 मिनिटांचा अतिरिक्त वेळ
अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता व शालेय शिक्षणातील नियम, कायदे आणि शैक्षणिक नवकल्पना
कृपया लक्षात घ्याः परीक्षेचे स्वरूप सर्वग्राही (Omnibus) असेल. प्रश्नपत्रिकेत कोणतेही विभाग उपविभाग असणार नाहीत.
परीक्षेसाठी 120 मिनिटांचा अवधी आहे, तरीसुद्धा उमेदवारास परीक्षास्थानी साधारणतः 180 मिनिटे थांबावे लागेल ज्यामध्ये नोंद होणे (logging in), प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे इ. साठी लागणा-या कालावधीचासुद्धा समावेश आहे. 5. भाषिक क्षमता (इंग्रजी) आणि भाषिक क्षमता (मराठी) व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या द्विभाषी माध्यमात (मराठी आणि इंग्रजी भाषेत) उपलब्ध असतील. इंग्रजी आणि मराठी यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विसंगतीच्या प्रकरणात, मराठी भाषेला संदर्भमानले जाईल आणि इंग्रजीला प्रमाण मानले जाईल. दिलेल्या 120 मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणताही प्रश्न सोडवू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या चार उत्तरांपैकी, फक्त एकच अचूक उत्तर असेल. उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य/अचूक पर्यायावर माउस-क्लिक करावयाचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. उमेद्वाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही. तथापि उमेद्वारांना सल्ला दिला जातो की त्यांनी अंदाज लावून उत्तर देणे टाळावे.
कृपया लक्षात घ्या की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरणादाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारांचे अधिक काठीण्य पातळीचे प्रश्न आढळतील, शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या इतर प्रकारांवरही प्रश्न आढळतील.
काही नमुना प्रश्न खाली दिले आहेत.
नमुना प्रश्न अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता
निर्देश प्र.1-3: खालील प्रत्येक प्रश्नात एक संख्या दिलेली नाही, त्या न दिलेल्या संख्येच्या जागी प्रश्नचिन्ह (?) दर्शविले आहे. तुम्हाला (1), (2), (3) आणि (4) या उत्तरांपैकी कोणते उत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकते ते शोधावयाचे आहे.
प्र.1. 4273137? (1) 352
(2) 252
(3) 242
(4) 142
प्र.2. 20x 1 ? (1) 4
(2) 5
(3) 10
(4) 18
प्र.3. 0.7 x 0.52 (1) 35
(2) 0.35 (3) 0.0035
(4) 0.035
प्र.4. जर एका लिंबांची किमत 10 पैसे तर 6 लिंबांची किंमत किती पैसे ?
(1) 6
(2) 10
(3) 60
(4) 610
प्र.5. खालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने निःशेष भाग जातो ?
(1) 27114
(2) 58204
(3) 48402
(4) 32286.
प्र.6. खालीलपैकी डावीकडील पहिल्या स्तंभात नाव आणि पत्त्याचे एक संयोजन दिलेले असून, त्यानंतर 1, 2 आणि 3 या स्तंभाखाली प्रत्येकी एक अशी तीन संयोजने दिली आहेत. तुम्हाला पहिल्या स्तंभात असलेल्या संयोजनाच्या हुबेहूब सारखे संयोजन शोधायचे आहे. ते संयोजन असणाऱ्या स्तंभाचा क्रमांक हे उत्तर आहे. जर सर्वच संयोजने वेगवेगळी असतील, तर उत्तर ‘4’ आहे.
या ओळीला स्पर्श करून संपूर्ण माहिती पुस्तिका वाचा किंवा पीडीएफ मध्ये प्राप्त करा
ALSO READ 👇
परीक्षा प्राधान्य
जा. क्र. मरापप/बापवि/२०२६/२७०
दिनांक :२७/०१/२०२६
प्रति,
मा. जिल्हाधिकारी,
रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग/पुणे/सातारा/सांगली/सोलापूर, कोल्हापूर/छ. संभाजीनगर/परभणी/धाराशिव/लातूर
विषय :- जिल्हा परिषद निवडणुका दरम्यान केंद्रप्रमुख परीक्षा येत असल्याने निवडणूक प्रशिक्षणासाठी शिक्षक उमेदवारांना शिथिलता देण्याबाबत….
महोदय,
उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की, दि. ५ फेब्रुवारी, २०२६ रोजी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद साठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिक्षण विभागातील केंद्र समन्वयक/केंद्रप्रमुखांचे तब्बल २४१० पदे रिक्त असून समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या पदांच्या भरतीसाठी राज्यभरातील ४६०६८ शिक्षक उमेदवारांची मर्यादित विभागीय स्पर्धा ऑनलाइन परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दि. ३ व ४ फेब्रुवारी, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी ज्या १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका आहेत, त्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांचा देखील समावेश आहे. जून २०२३ पासून केंद्र समन्वयक / केंद्रप्रमुख भरतीची प्रक्रिया प्रलंबित असून, तब्बल अडीच वर्षांचा विलंब या परीक्षेसाठी विविध अपरिहार्य न्यायालयीन व प्रशासकीय कारणास्तव झालेला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने गोपनीय संगणक संस्थेमार्फत राज्यभरातील परीक्षा केंद्रांवरील संगणकांच्या उपलब्धतेनुसार ३ व ४ फेब्रुवारी, २०२६ या दोन तारखा निश्चित केलेल्या आहेत. ज्या १२ जिल्हयांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या जिल्ह्यांमधील कार्यरत असलेल्या शिक्षक उमेदवारांना निवडणूक कर्तव्यामध्ये कोणतीही अडचणी येऊ नये, म्हणून दि. ३ फेब्रुवारी, २०२६ रोजी या जिल्ह्यातील उमेदवारांच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या नियोजनामुळे निवडणूक कार्यामध्ये कोणतीही बाधा येणार नसून दि. ४ फेब्रुवारी, २०२६ रोजीचे अंतिम प्रशिक्षण घेऊन या शिक्षकांना मतदान केंद्रावर जाता येऊ शकेल.
तथापि आपल्या जिल्ह्यामध्ये जर काही कारणास्तव ३ फेब्रुवारी, २०२६ रोजी निवडणुकीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले असेल, तर केंद्रप्रमुख परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना यामध्ये शिथिलता देऊन त्यांचे निवडणूक प्रशिक्षण दि.१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात यावे अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. असे केल्याने आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या परीक्षार्थी शिक्षक उमेदवारांमुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही व त्याचबरोबर या शिक्षक उमेदवारांना परीक्षेला बसण्याची संधी मिळेल व पर्यायाने कोणतेही शिक्षक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत.
आदरपूर्वक….
डॉ. नंदकुमार बेडसे (भा.प्र.से.)
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
१ ) मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे – ०१
प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव :-
१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
२) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व जिल्हा परिषद यांनी आपले स्तरावरून आवश्यक कार्यवाही अग्रेषीत
ज्या १२ जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद /पंचायत समिती निवडणुका ५ फेब्रुवारी २०२६ रोजी आहेत, अशा बारा जिल्ह्यांमधील केंद्रप्रमुख परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवार शिक्षकांची परीक्षा ही ३ फेब्रुवारी,२०२६ रोजी होणार आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षक उमेदवारांना चार तारखेला निवडणूक कर्तव्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम पहा या ओळीला स्पर्श करून
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे संकेतस्थळावरील डॅशबोर्ड पहा
ALSO READ 👇
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
प्रसिद्धी निवेदन
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत प्रत्येकी तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने परीक्षार्थी/उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत
अधिकृत लिंक 🔗 👆🏼
👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उपलब्ध.
CLUSTER RESOURCE CENTER CO-ORDINATOR (CLUSTER HEAD) EXAMINATION – 2025
Online Exam Admit card Issued.
तरी परीक्षार्थी/उमेदवारांनी वेळोवेळी
या संकेतस्थळावर भेट द्यावी.
(अनुराधा ओक) आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४,.
ठिकाण : पुणे
दिनांक २३/०१/२०२६

ALSO READ 👇
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
सुधारीत प्रसिद्धी निवेदन
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) तर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१ टीएमटी १. वि. १५५/०५/२०२२ व शासन निर्णय दि. २१/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषरांगधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार असले बाबत दि.२९/०५/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते, परीक्षेबाबतची अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
तथापि काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षेचे आयोजन जानेवारी/ फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्याचे नियोजित असून सुधारीत परीक्षेच्या तारखा यथावकाश परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील,
सदर परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दि.१०/११/२०२५ होती. तरी राबर आबेदनपत्र भरणेची मुदत दि.०१/०१/२०१६ पर्यंत करण्यात येत आहे, त्यामुळे उमेदवारांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता ही दि.०५/०५/२०५६ रोजीची अंतिम समजण्यात येईल.
त्यानुसार सर्व पात्र उमेवारांगी परीक्षाचीनी विहीत मुदतीत आवेनपत्र भरण्याची कार्यवाही करावी
ठिकाण : पुणे
दिनांक : ४/११/२०२५
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे-०४
हे ही वाचाल –
सन २०२३ रोजीच्या समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेस आवेदनपत्र भरलेल्या ज्या उमेदवारांचा मोबाईल नंबर व ई-मेल बंद असल्यामुळे UserName व Password SMS किंवा ई-मेल द्वारे मिळाला नाही अशा उमेदवारांसाठी दि. २५/१०/२०२५ ते १०/११/२०२५ या कालावधीत नवीन आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांनी नवीन आवेदनपत्र भरताच जुने भरलेले आवेदनपत्र रद्द समजण्यात येईल त्यामुळे उपरोक्त सर्व उमेदवारांनी नवीन आवेदनपत्र मुदतीत भरणे अनिवार्य आहे. जर कोणी आवेदनपत्र भरले नाही आणि परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
नवीन केंद्रप्रमुख फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे......नवीन फॉर्म भरण्याची लिंक
👇
ALSO READ 👇
शुद्धीपत्रक
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे.
तरी या कार्यालयाच्या दिनांक २९/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमधील मुद्दा क्र. (४) पात्रतेमधील
४५ ४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. ४.३ दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.”
*ऐवजी असे वाचावे.
” ४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, ४.३ शासन निर्णय दिनांक २९/०८/२०२५ नुसार मुद्दा क्र. (३) मधील ब) ii) अन्वये दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. “
स्थळप्रतीवर मा. आयुक्त यांची स्वाक्षरी असे.
परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
उपायुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे -०४
ठिकाण : पुणे
दिनांक : १५/१०/२०२५
ALSO READ👇
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
प्रसिद्धी निवेदन
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी परीक्षार्थी/उमेदवारांनी वेळोवेळी
या संकेतस्थळावर भेट द्यावी.
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४,
ठिकाण : पुणे
दिनांक : २९/०९/२०२५
लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रमः पीडीएफ मध्ये हवा असल्यास या ओळीला स्पर्श करा
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना वाचा या ओळीला स्पर्श करून
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
जा.क्र.मरापप/बापवि/२०२५/४८८८७,
दिनांकः २९/०९/२०२५
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
अधिसूचना
१. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) यांची समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे डिसेंबर २०२५ मध्ये समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजन करण्यात येत आहे.
२. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे.
२.१ पदनाम : समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
२.२ वेतन श्रेणी :- एस १५: ४१८०० १३२३००
२.३ पदसंख्या :- २४१०







