Samagra Shiksha Composite School Grant सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान दुसरा टप्पा ५०% टक्के करणेबाबत

Samagra Shiksha Composite School Grant

IMG 20250326 095925
Samagra Shiksha Composite School Grant

Samagra Shiksha Composite School Grant

समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान दुसरा टप्पा ५० % करणेबाबत

Regarding the second phase of 50% increase in joint school grant for government primary and secondary schools under Samagara ShikshaTappa Second 50% Fund Release Composite School Grant-2024-25 (Elementry)- (without PM SHRI)Samagra Shiksha Composite School Grant

जा.क्र. मप्राशिप/सशि/सं.शा.अ./२०२४-२५ / १15

दि. 25 MAR 2025

विषय :- सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान दुसरा टप्पा ५०% टक्के करणेबाबत.

संदर्भ :
१) भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या दि.०५/०३/२०२४ रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मंजूरीनुसार.

२) जा.क्र. मप्राशिप/सशि/सं.शा.अ./२०२४-२५/२६५९, दि. ०५ सप्टेंबर, २०२४ रोजीचे पत्र.

३) जा.क्र.मप्राशिप/सशि/लेखा/Compo. SchoolGrant/ELE..& SEC. Rec. (GEN,SC,ST)/२०२४-२५/२६५१, दि. ०५ सप्टेंबर, २०२४ रोजीचे पत्र.

उपरोक्त विषयान्वये, समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२४-२५ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या दि. ०५/०३/२०२४ रोजीच्या बैठकीत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजूरी मिळाली आहे. सन २०२४-२५ मध्ये सर्वात वरची इयत्ता ८वी पर्यंतचे वर्ग असलेल्या एकूण ६३०१० शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकूण रु. १६३०७.२५ लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तसेच सर्वात वरची इयत्ता १०वी किंवा १२वीचा वर्ग असलेल्या एकूण १७७१ शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांसाठी एकूण रु. १०३१.४० लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

संदर्भिय पत्र क्र. ३ अन्वये या कार्यालयाकडून PM SHRI (३११) शाळा वगळून मंजूर निधीपैकी उपलब्ध तरतूदीतून तुर्तास प्राथमिक ६२७६१ शाळांसाठी ५०% निधी म्हणजे रु. ८०७४.७५ लक्ष व माध्यमिक १७०७ शाळांकरीता ५०% निधी म्हणजे रु.४९१.२० लक्ष इतका निधी संबंधित जिल्हा परिषद / महानगरपालिका यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

उपरोक्त नमूद PM SHRI (३११) शाळा वगळून मंजूर निधीपैकी उपलब्ध तरतूदीतून तुर्तास प्राथमिक ६२७६१ शाळांसाठी ५०% निधी म्हणजे रु. ८०७४.७५ लक्ष व माध्यमिक १७०७शाळांकरीता ५०% निधी म्हणजे रु.४९१.२० लक्ष इतका निधी संबंधित जिल्हा परिषद /महानगरपालिका यांना उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.

IMG 20250326 100253
Samagra Shiksha Composite School Grant

अ) इयत्ता ८वी पर्यंत वर्ग असलेल्या प्राथमिक शाळांसाठी मंजूर निधी व ५०% वितरीत करावयाच्या निधीचा तक्ता खालीलप्रमाणे:-

संयुक्त शाळा अनुदान (प्राथमिक)

उपरोक्त निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरीता (PM SHRI ३११ शाळा वगळून) संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरीत करण्यात यावा. जिल्हा परिषद / महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतूदीबाबतचा तक्ता (अ) व (ब) सोबत जोडण्यात आलेला आहे. जिल्ह्यांना /महानगरपालिकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी हा ज्या शाळाचा खर्च होईल अशाच शाळांना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात यावा. तथापि, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या एकूण मंजूर तरतूदीच्या मर्यादेत आणि शाळांना मंजूर असलेल्या तरतूदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी. समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व जिल्हा व महानगरपालिका यांनी सदरचा निधी प्राप्त होताच तात्काळ खर्च करुन प्रबंध पोर्टलवर माहिती अद्यावत करण्यात यावी.

मूळ प्रत मा. राज्य प्रकल्प संचालक यांच्या मान्यतेने

परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा

मा. राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रति,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षामहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

१. मा.आयुक्त, महानगरपालिका (सर्व)२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व जिल्हे)

Leave a Comment

error: Content is protected !!