Retirement Gratuity To Ashram School Employees

Retirement Gratuity To Ashram School Employees

IMG 20250326 165835
Retirement Gratuity To Ashram School Employees

Retirement Gratuity To Ashram School Employees

Approval Of Retirement Gratuity To Ashram School Employees

Regarding the sanction of family pension and death gratuity to the family of an employee under the Defined Contribution Pension Scheme/National Pension System in case of death during the service period and sickness pension and retirement gratuity to the employees who have retired on sickness and retirement gratuity to the employees who retire from Government service.

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. अआशा.२०२४/प्र.क्र.२५३/का.११, मंत्रालय, मुंबई

दिनांकः २५ मार्च, २०२५

वाचा:-
१) वित्त विभाग शासन निर्णय क्र. अंनियो. १००५/१२६/सेवा-४, दि. ३१.१०.२००५.
२) वित्त विभाग शासन निर्णय क्र. अंनियो. १००७/१८/सेवा-४, दि. ०७.०७.२००७.
३) केंद्र शासनाचे कार्यालयीन ज्ञापन क्र.३८/४१/०६/P&PW(A), दि. ०५,०५,२००९.
४) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. अंनियो-२०१२/प्र.क्र.१३/का.११, दि.२२.११.२०१२.
५) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. अंनियो.२०१२/प्र.क्र.९६/सेवा-४, दि. २७.०८.२०१४.
६) वित्त विभाग शासन निर्णय क्र. अंनियो. २०१५/NPS/प्र.क्र.३२/सेवा-४. दि. ०६.०४.२०१५.
७) केंद्र शासनाची अधिसूचना क्र.G.S.R.२२७(E), दि. ३०.०३.२०२१.
८) केंद्र शासनाची अधिसूचना क्र. G.S.R.६५८ (E), दि. २३.०९.२०२१.
९) वित्त विभाग शासन निर्णय क्र. रानियो. २०२२/प्र.क्र.३४/सेवा-४, दि. ३१.०३.२०२३.
१०) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. रानिप्र-२०२३/प्र.क्र.५७/सेवा-४, दि. २४.०८.२०२३.

प्रस्तावना:-
दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये अंमलात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णयान्वये ठरविण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती संदर्भाधीन क्र. ४ येथील दि.२२.११.२०१२ रोजीच्या शासन निर्णयान्वये ठरविण्यात आली आहे. सदर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना केंद्राच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत संदर्भाधीन क्र. ६ येथील शासन निर्णयान्वये समाविष्ट केलेली आहे. परिभाषित
शासन निर्णय क्रमांका अआशा.२०२४/प्र.क्र.२५३/का.११

अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाहीत.

जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा १४ लक्ष वरुन २० लक्ष करण्याबाबत वाचण्यासाठी या ओळींना स्पर्श करा

तद्नंतर केंद्र शासनाच्या दिनांक ३०.०३.२०२१ रोजीच्या अधिसूचनेन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतन अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय केले आहे. तसेच केंद्र शासनाच्या दिनांक २३.०९.२०२१ रोजीच्या अधिसूचनेअन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यास सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय केले आहे.

केंद्र शासनाच्या वरील निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान संदर्भाधीन क्र.९ येथील वित्त विभागाच्या दि.३१.०३.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना सदर निर्णय योग्य त्या फेरबदलासह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबत सूचना सदर शासन निर्णयान्वये वित्त विभागाकडून करण्यात आली आहे. या सूचनेस अनुलक्षून आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

       शासन निर्णय

दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचा सदस्य आहे अशा-

अ) शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान.

आ) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्या रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत….दिनांक :- २४ फेब्रुवारी, २०२५ वाचण्यासाठी या ओळींना स्पर्श करा

त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतनाधारकास व रुग्णता निवृत्तीवेतनाधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील तरतूदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन/रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल.

इ) तसेच अनुदानित आश्रमशाळेतील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती
उपदान लागू करण्यात येत आहे.

वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यः स्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील तरतूदी लागू राहतील.

२. आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात येत नाही. सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नयेत.

३. दिनांक ०१.११.२००५ ते या निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना-३ मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागेल. त्यानुसार कुटुंब निवृत्तीवेतनधारकास त्याला मिळालेल्या परिभाषित निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज/लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल. सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहील.

४. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे सेवेत नियुक्त होणारा शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन किवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीअंतर्गत त्याची कायम निवृत्तीवेतन लेखा क्र. (PRAN) मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तीवेतन निधी विनियमक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबतचा सोबतचा नमुना-२ मध्ये विकल्प कार्यालय प्रमुखास सादर करावा.

५. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे सेवेत नियुक्त होणारे जे शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा विकल्प सादर करील, त्यांनी नमुना-१ प्रमाणे कुटुंबाचा तपशिल सादर करणे अनिवार्य आहे.

६. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत वरील परिच्छेद क्र.४ प्रमाणे विकल्प देणे बंधनकारक राहील. तसेच यापुढे अनुदानित आश्रमशाळेतील कायम पदावर नियुक्त होणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपरोक्त प्रमाणे विकल्प नियुक्त झाल्यावर ८ दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील.

७. वित्त विभागाकडून दि.२४.०८.२०२३ रोजीच्या परिपत्रकाद्वारे विहीत करण्यात आलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याची कार्यपध्दतीच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यपध्दती निर्धारीत करण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.

८ यानुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील. सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उचित कार्यवाही करावी.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२५१३३६२८८३२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ मध्ये प्राप्त करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

Regarding approval of retirement gratuity to Ashram School employees

Leave a Comment

error: Content is protected !!