Gratuity Limit Increased From 14 lakhs To 20 lakhs ग्रॅच्युइटीची मर्यादा १४ लाखांवरून २० लाखांवर

Gratuity Limit Increased From 14 lakhs To 20 lakhs

image 49
Gratuity Limit Increased From 14 lakhs To 20 lakhs

Gratuity Limit Increased From 14 lakhs To 20 lakhs

ग्रॅच्युइटीची मर्यादा १४ लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढवली
Gratuity limit increased from 14 lakhs to 20 lakhs

Gratuity limit increased from Rs 14 lakh to Rs 20 lakh
ग्रॅच्युइटीची मर्यादा १४ लाखांवरून २० लाखांवर

जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा १४ लक्ष वरुन २० लक्ष करण्याबाबत.


Regarding increasing the maximum limit of retirement gratuity/death gratuity from 14 lakhs to 20 lakhs for teachers and non-teaching employees holding 100% aided posts in Zilla Parishads, recognized private 100% aided primary, secondary, higher secondary and teacher training colleges.

दिनांक: ११ मार्च, २०२५
वाचा:-
१. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांकः सेनिवे-२०१९/प्र.क्र.५८/सेवा-४, दि.०१/०३/२०१९
२. शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांकः रानियो-२०२२/प्र.क्र.३४/टिएनटी-६, दि. ३१/०३/२०२३
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. अंनियो-२०२३/प्र.क्र.२८/टीएनटी-६, दि.१४/०६/२०२३
४. वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांकः सेनिवे-२०२२/प्र.क्र.८५/सेवा-४. दि.१०/१०/२०२४
५. शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. अंनियो-२०२३/प्र.क्र.२८/टीएनटी-६, दिनांक २४/०२/२०२५

प्रस्तावना:-
संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लाखावरुन रु.२० लाख करण्यााबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद क्र.२ मध्ये “ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदाप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषि विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील.” असे स्पष्ट केले आहे. वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा १४ लक्ष वरुन २० लक्ष करण्याची बाब शासन विचाराधीन होती.

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत…. परिपत्रक शासन निर्णय वाचाल या ओळीला स्पर्श करून

            शासन परिपत्रकः-

वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक १०/१०/२०२४ अन्वये केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लाखावरुन रु.२० लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतूदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दि.०१/०९/२०२४ पासून सेवानिवृत्ती उपदान /मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा १४ लक्ष वरुन २० लक्ष अशी वाढविण्यात येत असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.
यानुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील. सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उचित कार्यवाही करावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३१११५३१५५६८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन परिपत्रक पीडीएफमध्ये उपलब्ध या ओळीला स्पर्श करा


उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः अंनियो-२०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६ , मंत्रालय, मुंबई

Leave a Comment

error: Content is protected !!