Inclusion Exclusion Correction In Caste Register
Inclusion Exclusion Correction In Caste Register
Inclusion Exclusion Correction In Caste Register
Regarding inclusion/exclusion of castes/correction in the register of castes belonging to Other Backward Classes, De-settled Castes, Nomadic Tribes and Special Backward Classes
Regarding inclusion/exclusion of castes in the register of Other Backward Classes, De-Scheduled Castes, Nomadic Tribes and Special Backward Category Castes/amendment in the register of castes as per the recommendations in Report No. 55 submitted to the Government by the Maharashtra State Backward Classes Commission.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्रमांक-५५ मधील शिफारशींनुसार इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातींच्या नोंदीमध्ये जातींचा समावेश करणे/वगळणे/जातींच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत.
दिनांक : २६ मार्च, २०२५.
वाचा: १) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक: सीबीसी-१०/२००८/प्र.क्र.२३५/मावक५, दि.२५.०६.२००८.
२) शासन निर्णय, विमुक्त जाती, मटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, क्रमांक: सीबीसी-२०१९/प्र.क्र.७२/मावक, दि.०४.०६.२०१९.
३) शासन परिपत्रक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३०८/मावक, दि.०९.०१.२०२५
प्रस्तावना:-
महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार वाचा येथे नमूद क्र.१, २ व ३ च्या शासन निर्णय / परिपत्रकान्वये काही नवीन जातींचा अंतर्भाव करुन /वगळून यादी अद्ययावत केलेली आहे.
हेही वाचाल
List of Scheduled Castes, Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Classes of Maharashtra State
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी शासनास अहवाल क्रमांक-५५ सादर करुन त्याद्वारे गंणिगा, कची/कच्ची/कच्छी, कोइरी, कोईरी, कोयरी, व कुशवाह आणि धोबी/परीट/वरठी/तेलगु मडेलवार (परीट) या जातीच्या नोंदीमध्ये जातींचा समावेश करणे/वगळणे/जातींच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुषंगाने मा. मंत्रीमंडळाने सदर शिफारसी मान्य केल्या असून सदर मान्यता विचारात घेता, महाराष्ट्र राज्याच्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्रमांक-५५ मधील शिफारशीनुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या उपरोक्त वाचा येथे नमूद दि.२५.०६.२००८, दि.०४.०६.२०१९ व दि.०९.०१.२०२५ रोजीच्या शासन परिपत्रक/निर्णयांन्वये अंतिम करण्यात आलेल्या जाती/तत्सम जातीच्या यादीत बदल करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय क्रमांका आयोग-२०२३/प्र.क्र.३०६/मावक
०२. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल क्रमांक-५५ मध्ये प्र.क्र.१९/२०१४, प्र.क्र.२९/२०१४, प्र.क्र.१४६/२०२२ अन्वये गंणिगा, कची/कच्ची/कच्छी, कोइरी, कोईरी, कोयरी, व कुशवाह आणि धोबी/परीट/वरठी/तेलगु मडेलवार (परीट) या पोटजातीच्या नोंदीमध्ये जातींचा समावेश करणे/वगळणे/जातींच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत समावेश करण्याबाबत सखोल पडताळणीअंती शासनास अभिप्राय सादर केले आहेत. सदर प्रकरणांबाबतची वस्तुस्थिती व गुणवत्ता विचारात घेऊन खालील तक्त्यात नमूदप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे:-
अ.क्र. आयोगाचा प्र.क्र.
१ प्र.क्र. १९/२०१४ – जातीचे नाव
३ गंणिगा ऐवजी गणिगा अशी इतर मागासवर्ग यादीत अनुक्रमांक-३०० दर दुरुस्ती करणेबाबत.
शासनाचा निर्णय
४ इतर मागास वर्ग यादीत अनुक्रमांक-३०० वर गंणिगा ऐवजी “गाणिगा/गाणिग” अशी जातींच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे.
२ प्र.क्र. २९/२०१४
इतर मागास वर्ग यादीत अनुक्रमांक ८५ कची/कच्ची/कच्छी, कोइरी, कोईरी, कोयरी, व कुशवाह
इतर मागास वर्ग यादीत अनुक्रमांक-८५ मधील तत्सम जातीतील कोइरी, कोईरी, कोयरी, व कुशवाह मधील “कोयरी व कुशवाह” येथील “व” वगळण्यात येत आहे.
३ प्र.क्र. १४६/२०२२
धोबी, परीट, वरठी, तेलगु मडेलवार (परीट) या एकच जाती असल्यामुळे शासनाच्या इतर मागासवर्ग यादीत अनुक्रमांक-१२५ व अनुक्रमांक-१६६ वरील जाती एकाच अनुक्रमांकावर घेवुन शुध्दीपत्रक काढण्याबाबत.
इतर मागासवर्ग यादीतील अनुक्रमांक-१२५ चे समोर वरठी या जाती समुहाची नोंद घेण्यात येत आहे. तसेच इतर मागासवर्ग यादीतील अनुक्रमांक-१६६ वरील “बरठी” ही नोंद वगळण्यात येत आहे.
०३. सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेले बदल हे शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ०४. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन
लागू होतील.
देण्यात आला असून, त्याचा संकेताक २०२५०३२६१३०३१६७९३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित
करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
या ओळीला स्पर्श करून शासन निर्णय पीडीएफ मध्ये प्राप्त करा
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक- आयोग-२०२३/प्र.क्र.३०६/मावक
मंत्रालय, मुंबई