मुदत वाढ राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी DIKSHA Portal वरील “AI Saathi for Educators” (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत DIKSHA Portal AI Saathi For Educators

DIKSHA Portal AI Saathi For Educators

rajyatil iyatta 1 li te 12 vi paryant adhyapan karnarya sarv shikshakanni DIKSHA Portal varil “AI Saathi for Educators” (shikshakansathi AI sathi) ha online course purna karanyababat

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

All teachers teaching from class 1 to 12 in the state are required to complete the online course “AI Saathi for Educators” on the DIKSHA Portal.

300

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

७०८, आरबी कुमठेकर मार्ग, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०.

ईमेल: itdept@maa.ac.in

संपर्क क्रमांक (०२०) २४४७८१२२

प्रति,

१. विभागीय उपसंचालक (सर्व)

२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

४. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)

५. प्रशासन अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा., मुंबई

६. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) (सर्व)

७. शिक्षण निरीक्षक, दक्षिण, उत्तर, पश्चिम मुंबई

विषय : दीक्षा पोर्टल वरील “शिक्षकांसाठी AI साथी” या ऑनलाईन कोर्सला मुदतवाढ देणेबाबत…

संदर्भ

: १. या कार्यालयाचे पत्र क्र. IT/BROADCAST MEDIA १/२०२२४६७/२०२६, दि. १५/०७/२०२६.

२. CIET-NCERT यांचे पत्र दिनांक ०६/०७/२०२६.

संदर्भ क्र. १ नुसार राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी; “शिक्षकांसाठी AI साथी” हा ऑनलाईन कोर्स दीक्षा पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार सदर कोर्समध्ये प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली होती आणि हा कोर्स पूर्ण करण्यासाठी दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत कालावधी देण्यात आला होता.

सदर कोर्सद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मशीन लर्निंग (Machine Learning) यांच्या मूलभूत संकल्पना, शिक्षण क्षेत्रामधील AI चे विविध उपयोग, AI आधारित उपयुक्त साधनांचा प्रभावी वापर, AI चा जबाबदार, सुरक्षित व नैतिक (Responsible Al) वापर तसेच दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजामध्ये AI चा प्रभावी समावेश करण्याच्या पद्धती यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी ५० तासांचे सतत व्यावसायिक विकास (CPD) प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने या ऑनलाईन कोर्ससाठी ४ तासांचे CPD प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे.

संदर्भ क्रमांक २ नुसार या कोर्सला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी अंतिम दिनांक:

३० सप्टेंबर २०२६

कोर्स पूर्ण करण्यासाठी अंतिम दिनांक :

३१ ऑक्टोबर २०२६

त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना आवश्यक सूचना देऊन राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विहित कालावधीत कोर्समध्ये प्रवेश घेऊन अंतिम मुदतीपूर्वी कोर्स पूर्ण करतील, याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
कोर्स सुरू करण्यासाठी पूर्वतयारी

१. स्मार्टफोनवरून कोर्स पूर्ण करण्यासाठी

(3) DIKSHA App डाउनलोड करणे: Google Play Store वरून DIKSHA App डाउनलोड करून त्यामध्ये नोंदणी करावी व संपूर्ण प्रोफाईल भरावी.

प्रोफाईल भरताना आपल्या पदनामाशी तंतोतंत जुळणारे पदनाम उपलब्ध नसल्यास त्यास सर्वाधिक जवळचे पदनाम निवडावे. तसेच संबंधित पदनाम उपलब्ध नसल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या निदर्शनास आणून द्यावी, जेणेकरून पुढील अद्ययावतीकरणामध्ये आवश्यक पदनामांचा समावेश करता येईल.

(आ) DIKSHA Courses App डाउनलोड करणे :

प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर Google Play Store वरून DIKSHA Courses हे App डाउनलोड करावे. त्यानंतर खालील लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये Enrol करावे.

कोर्स लिंक :

https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=१२५२&section=२८१४&modeActive=८२०२

२. Laptop / Desktop (Browser) द्वारे कोर्स पूर्ण करण्यासाठी

Browser द्वारे कोर्स पूर्ण करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी www.diksha.gov.in या संकेतस्थळावर Login अथवा नोंदणी करावी.

DIKSHA App मध्ये यापूर्वीच त्याच ई-मेल आयडीद्वारे नोंदणी केलेली असल्यास त्याच Login द्वारे प्रवेश करता येईल. अशा वेळी पुन्हा प्रोफाईल भरण्याची आवश्यकता नाही. प्रथमच Login करत असल्यास आवश्यक ती प्रोफाईल माहिती पूर्ण भरावी.

Login केल्यानंतर मुख्य पृष्ठावरील “DIKSHA Courses” या Tab वर क्लिक करावे. त्यानंतर Search पर्यायामध्ये Al Saathi for Educators / शिक्षकांसाठी AI साथी हा कोर्स शोधून अथवा उपरोक्त लिंकवर क्लिक करून अथवा Explore Courses Tab वर क्लिक करून Filter courses वरून By Board मधील Maharashtra हा फिल्टर apply केल्यावर शिक्षकांसाठी AI साथी हा कोर्स दिसेल त्यामध्ये प्रवेश घ्यावा.

कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करण्यास कळवावे.

सदर बाबीस प्राधान्य देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील शिक्षकांकडून विहित कालावधीत सदर कोर्स पूर्ण करून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

Digitally signed by
Jyoti Balasaheb Shinde

Date: 02-09-2026

17:53:45

(ज्योती शिंदे)

उपसंचालक

आयटी व प्रसार मध्यम विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. मा. संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. मा. संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

४. मा. संचालक, योजना, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रति,

  1. विभागीय उपसंचालक (सर्व)
  2. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
  3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
  4. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
  5. प्रशासन अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा., मुंबई
  6. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) (सर्व)
  7. शिक्षण निरीक्षक, दक्षिण, उत्तर, पश्चिम मुंबई

विषय : राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी DIKSHA Portal वरील “AI Saathi for Educators” (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत..

संदर्भ : या कार्यालयाचे पत्र क्र. SCERT-28.0/32/2025-IT/BROADCAST MEDIA I/2022467/2026, दिनांक १५/०७/२०२६

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना “AI Saathi for Educators” हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. सदर कोर्ससाठी दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार असून, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे.

या कोर्स ची दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी पर्यंतचीची सद्यस्थिती :

कोर्ससाठी एकूण नोंदणी २,३९,१४९; त्यापैकी १,४३,०५६ शिक्षकांनी कोर्स पूर्ण केला आहे.

तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या शिक्षकांनी अद्याप कोर्ससाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी नोंदणी करावी. तसेच, नोंदणी केलेल्या सर्व शिक्षकांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी आपल्या सोयीच्या वेळेनुसार सदर कोर्स पूर्ण करावा. सदर कोर्ससाठी ४ तासांचे CPD प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे.

तरी, आपल्या अधिनस्त सर्व संबंधित शाळांना आवश्यक सूचना देऊन सर्व शिक्षकांची कोर्ससाठी नोंदणी व कोर्स पूर्णत्वाची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण होईल, याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

Digitally signed by KAMALADEVI SHRIDHAR AWATE Date: 17-08-2026 18:15:05

(डॉ. कमलादेवी आवटे)

सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

  1. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
  2. संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
  3. संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
  4. संचालक, योजना, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
पुणे

विषय : राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी DIKSHA Portal वरील “AI Saathi for Educators” (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकायनि “AI Saathi for Educators” (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स विकसित केला असून तो DIKSHA Portal वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर ऑनलाईन कोर्सचे उद्घाटन मा. शालेय शिक्षण मंत्री, श्री. दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते दिनांक १४ जुले २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे संपन्न झाले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence Al) हे तंत्रज्ञान आज शैक्षणिक तसेच प्रशासकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनत आहे. AI चा योग्य, सुरक्षित व जबाबदार वापर केल्यास अध्यापन-अध्ययन प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्याबरोबरच दैनंदिन कामकाजाची गती, गुणवत्ता, अचूकता व कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होते. अध्यापन नियोजन, अध्ययन साहित्य निर्मिती, मूल्यमापन, अहवाल लेखन, माहितीचे विश्लेषण, सादरीकरणे तयार करणे तसेब विविध प्रशासकीय कामांमध्ये AI आधारित साधनांचा प्रभावी वापर करता येतो, त्यामुळे शिक्षकांनी AI विषयक मूलभूत ज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.

सदर कोर्सद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मशीन लर्निंग (Machine Learning) यांच्या मूलभूत संकल्पना, शिक्षण क्षेत्रामधील AI चे विविध उपयोग, AI आधारित उपयुक्त साधनांचा प्रभावी वापर, AI चा जबाबदार, सुरक्षित व नैतिक (Responsible Al) वापर तसेच दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजामध्ये AI चा प्रभावी समावेश करण्याच्या पद्धती यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शिक्षण घोरण (NEP) २०२० नुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी ५० तासांचे सतत व्यावसायिक विकास (Continuous Professional Development CPD) प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने सदर “AI Saathi for Educators” या ऑनलाईन कोर्ससाठी ४ तासांचे CPD प्रशिक्षण श्रेय (Weightage) निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी सदर कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.
या कोर्ससाठी दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्वन्त प्रवेश घेता वेणार असून कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिनांक ३० सप्टेंबर २०२६ आहे.

त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना आवश्यक सूचना देऊन राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विहित कालावधीत कोर्समध्ये प्रवेश घेऊन अंतिम मुदतीपूर्वी कोर्स पूर्ण करतील, याबावत आवश्यक कार्यवाही करावी.

कोर्स सुरू करण्यापूर्वीची पूर्वतयारी

१. स्मार्टफोनवरून कोर्स पूर्ण करण्यासाठी

(अ) DIKSHA App डाउनलोड करणेः
Google Play Store वरून DIKSHA App डाउनलोड करून त्यामध्ये नोंदणी करावी व संपूर्ण प्रोफाईल भरावी. प्रोफाईल भरताना आपल्या पदनामाशी तंतोतंत जुळणारे पदनाम उपलब्ध नसल्यास त्यास सर्वाधिक जवळचे पदनाम निवडावे. तसेच संबंधित पदनाम उपलब्ध नसल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या निदर्शनास आणून द्यावी, जेणेकरून पुढील अद्ययावतीकरणामध्ये आवश्यक पदनामांचा समावेश करता येईल.

(आ) DIKSHA Courses App डाउनलोड करणे :
प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर Google Play Store वरून DIKSHA Courses हे App डाउनलोड करावे.
त्यानंतर खालील लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये प्रवेश (Enroll) घ्यावा,
कोर्स लिंक :

https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=1252&section=2814&modeActive-8202

२. Laptop / Desktop (Browser) द्वारे कोर्स पूर्ण करण्यासाठी
करावी. Browser द्वारे कोर्स पूर्ण करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी www.diksha.gov.in या संकेतस्थळावर Login अथवा नोंदणी DIKSHA App मध्ये यापूर्वीच त्याच ई-मेल आयडीद्वारे नोंदणी केलेली असल्यास त्याच Login द्वारे प्रवेश करता येईल. अशा वेळी पुन्हा प्रोफाईल भरण्याची आवश्यकता नाही, प्रथमच Login करत असल्यास आवश्यक ती प्रोफाईल माहिती पूर्ण भरावी.

Login केल्यानंतर मुख्य पृष्ठावरील “DIKSHA Courses” या Tab वर क्लिक करावे. त्यानंतर Search पर्यायामध्ये “AI Saathi for Educators” (शिक्षकांसाठी AI साथी) शोधून अथवा उपरोक्त लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये प्रवेश (Enroll) घ्यावा.

कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करावे,

सदर बाबीस प्राधान्य देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील शिक्षकांकडून विहित कालावधीत सदर कोर्स पूर्ण करून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
Digitally signed by HEMANT VASEKAR
Date: 15-07-2026

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

प्रत माहितीस्तव सविनय सादर :
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई.
मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रतिलिपी :

  1. संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
  2. संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे,

प्रति,

  1. विभागीय उपसंचालक (सर्व)
  2. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
  3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
  4. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
  5. प्रशासन अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा., मुंबई
  6. शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक) (सर्व)
  7. शिक्षण निरीक्षक, दक्षिण, उत्तर, पश्चिम मुंबई

राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी DIKSHA Portal वरील "AI Saathi for Educators" (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत  DIKSHA Portal AI Saathi For Educators
राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी DIKSHA Portal वरील “AI Saathi for Educators” (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत DIKSHA Portal AI Saathi For Educators

🤖 AI Saathi Course प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची पद्धत+

📱 DIKSHA App वरून Certificate Download करण्यासाठी 10 सोप्या स्टेप्स

स्टेप 1️⃣ – DIKSHA App उघडा

मोबाईलमध्ये DIKSHA App उघडा.

स्टेप 2️⃣ – Login करा
आपल्या DIKSHA खात्याच्या मोबाईल नंबर / Email / Username द्वारे Login करा.

स्टेप 3️⃣ – Profile वर क्लिक करा
DIKSHA App मध्ये आपल्या Profile 👤 वर क्लिक करा.

स्टेप 4️⃣ – My Learning / Courses Attended निवडा
आपण पूर्ण केलेले कोर्स पाहण्यासाठी My Learning / Courses Attended या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 5️⃣ – AI Saathi Course शोधा
यादीमध्ये
“AI Saathi for Educators”
हा कोर्स शोधा आणि त्यावर क्लिक करा.

स्टेप 6️⃣ – Course Completion तपासा
कोर्सची 100% Completion झालेली आहे का ते तपासा.
सर्व Modules/Lessons आणि आवश्यक Assessment पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

स्टेप 7️⃣ – Certificate पर्याय निवडा
कोर्स पूर्ण झाल्यानंतर Certificate / View Certificate असा पर्याय दिसल्यास त्यावर क्लिक करा.

स्टेप 8️⃣ – Certificate उघडा
आपले प्रमाणपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रमाणपत्रावरील आपले नाव, कोर्सचे नाव आणि इतर माहिती तपासा.

स्टेप 9️⃣ – Download करा
प्रमाणपत्राच्या स्क्रीनवरील Download ⬇️ पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 🔟 – PDF सेव्ह करा
प्रमाणपत्र मोबाईलमध्ये PDF स्वरूपात Save/Download करा.
त्यानंतर ते WhatsApp, Email किंवा Print करण्यासाठी वापरता येईल.

❗ Certificate दिसत नसेल तर काय करावे?

✅ कोर्स 100% पूर्ण झाला आहे का तपासा.
✅ सर्व Modules पूर्ण झाले आहेत का तपासा.
✅ आवश्यक Quiz/Assessment पूर्ण करा.
✅ DIKSHA App मधून Logout → Login करून पुन्हा तपासा.
✅ Profile → Courses Attended / My Learning मध्ये Certificate तपासा.
✅ प्रमाणपत्र तयार होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

📌 महत्त्वाची सूचना
प्रमाणपत्र उपलब्ध असलेल्या DIKSHA कोर्समध्ये कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र Profile मधून पाहता आणि डाउनलोड करता येते.
DIKSHA Portal:

https://diksha.gov.in

AI Saathi Course पूर्ण करा → Certificate मिळवा → Download करा → PDF जतन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!