Permission Granted For Conference Workshop For Physical Education Teachers

Permission Granted For Conference Workshop For Physical Education Teachers

IMG 20250407 160913
Permission Granted For Conference Workshop For Physical Education Teachers

Permission Granted For Conference Workshop For Physical Education Teachers शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या तीन दिवसीय अधिवेशनास कार्यशाळेस परवानगी

Permission granted for three-day conference/workshop for physical education teachers

क्र. शिसं/संकीर्ण-२०२५/अधिवेशन/ए-२/विद्या शाखा / 01870
07 APR 2025

विषय :- शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या तीन दिवसीय अधिवेशनास / कार्यशाळेस परवानगी मिळणेबाबत..

संदर्भ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ, अमरावती यांचे दि. ०२/०३/२०२५ रोजीचे पत्र.

उपरोक्त विषयाबाबत आपल्या संदर्भिय पत्रान्वये महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ, अमरावती तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातील विविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२, १३ व १४ एप्रिल २०२५ या सुट्टीच्या कालावधीत शिर्डी येथे शारीरिक शिक्षण शिक्षकांचे २ रे महाअधिवेशन/कार्यशाळा आयोजित करण्यात येत असल्याबाबत संचालनालयास कळविण्यात आले आहे.

सदर अधिवेशन/कार्यशाळा दरम्यान शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम, मूल्यमापन, परीक्षा पॅटर्न, शालेय क्रीडा स्पर्धा, संचमान्यता, पदनिश्चिती, शासकीय धोरण, विषयाच्या अडीअडचणी व नवीन शैक्षणिक धोरणातील शारीरिक शिक्षण याबाबत प्रशासन अधिकारी व विषयतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत या अधिवेशन/कार्यशाळेस अंदाजे सात ते आठ हजार शारीरिक शिक्षण शिक्षकांची उपस्थिती असणार आहे.

त्याअनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, सदर अधिवेशनासाठी दि. १३ व १४ एप्रिल २०२५ या सुट्टीच्या दोन दिवशीय कालावधीसाठी शारारिक शिक्षण शिक्षकांच्या अधिवेशन/कार्यशाळेला शाळांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या निकषावर तसेच शासन पत्र दिनांक ०१ एप्रिल २०११ नुसार तसेच शासन निर्णय दिनांक १५ सप्टेंबर, २०१४ नुसार सदर अधिवेशनास आपणांस परवानगी देण्यात येत आहे.

circular PDF copy link

(मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने)

(दिपक चवणे)
शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रति,
अध्यक्ष/सचिव,
शारीरिक शिक्षण व क्रीडा
शिक्षक महासंघ, पुणे.

IMG 20250407 160923
Permission Granted For Conference Workshop For Physical Education Teachers

Leave a Comment

error: Content is protected !!