Apology For Delay In Applying For A Job On Compassionate Grounds

Apology For Delay In Applying For A Job On Compassionate Grounds

image 21
Apology For Delay In Applying For A Job On Compassionate Grounds

Apology For Delay In Applying For A Job On Compassionate Grounds

Regarding the apology for the delay in applying for a job on compassionate grounds.

क्र. अकपा-२०२५/प्र.क्र. ११७/आस्था-७
दिनांक :- १० मार्च, २०२५


विषय :- अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज करण्यास झालेला विलंब क्षमापित करणेबाबत.


संदर्भ
१. आपले पत्र क्र. जिपजा/साप्रवि/प्रशा-२/कावि १४०२/२०२४/२८५५. दि.१४.११.२०२४
२. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.अकंपा-१०९५/प्र.क्र.३४-अ आठ, दि. ११ सप्टेंबर, १९९६
३. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क. अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ, दि. २० मे, २०१५
४. सा.प्र.वि. शासन निर्णय क्र. अकंपा-१२१७/प्र.क्र.१०२/आठ, दि. २१ सप्टेंबर, २०१७

महोदय,
आपल्या संदर्भाधीन क्र.१ येथील पत्रान्वये श्री. सतिश उत्तम जाधव यांना अनुकंपा तत्वाअंतर्गत अर्ज सादर करण्यास झालेला विलंब क्षमापित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. संदर्भाधीन क्र.३ व ४ येथील शासन निर्णयातील तरतुदी पाहता श्री. सतिश उत्तम जाधव यांना अनुकंपा तत्वाअंतर्गत अर्ज सादर करण्यास झालेला ०६ वर्षापेक्षा जास्त विलंब क्षमापित करता येणार नाही.

image 22
Apology For Delay In Applying For A Job On Compassionate Grounds


२ तसेच या अनुषंगान असेही नमूद करण्यात येते की, अनुकंपा नियुक्तीबाबत संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” अ.क्र.३ (२५) नुसार केवळ गट-ड मधील पदावर नियुक्ती करावयाची असल्यास शैक्षणिक अर्हता शिथिल करण्याबाबतची तरतुद आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणतीही अट शिथिल करण्यास शासन सक्षम नाही. अनुकंपा नियुक्तीबाबतच्या तरतुदी सुत्त्पष्ट असताना देखिल बऱ्याच जिल्हा परिषदांकडून अनुकंपा नियुक्तीकरिता अटी शिथील करण्याकरीता सातत्याने प्रस्ताव शासनस्तरावर प्राप्त होत असतात. अटी व शर्ती शिथील करण्याचे अधिकार नसतांना देखिल अशा स्वरुपाचे प्रस्ताव विचारात घेण्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होते आणि अनुकंपाच्या अटी शिथीलक्षम आहेत असा गैरसमज पसरतो. तरी यापुढे नियमांना धरुन नसलेली प्रकरणे शासनास सादर न करण्याची दक्षता घ्याची, ही विनंती.

image 23
Apology For Delay In Applying For A Job On Compassionate Grounds


आपला,

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग,फोर्ट, मुंबई

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना

Leave a Comment

error: Content is protected !!