Payabhut Chachani PAT Samagra Shiksha
Payabhut Chachani PAT Samagra Shiksha
Regarding the Foundation Test 2025-26 under Periodic Assessment Test (PAT) under Samagra Shiksha
जा.क्र. राशैसंप्रपम/ मूल्यमापन/पा.चा.-VSK/२०२४-२५/08369 प्रति,
दि. १२ ऑगस्ट २०२५ 20/08/025
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व)
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा, (सर्व)
३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम)
४) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प. (सर्व)विषय : पायाभूत चाचणी (PAT) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत…….
संदर्भ : १. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र.SCERT- ३८.०/२९/२०२५EVALUATION/१३१९४६९/२०२५दि.०८/०७/२०२५.
समग्र शिक्षा अंतर्गत QUALITY INTERVENTION (५.३.१ funds for Quality (LEP) Innovation Guidance अंतर्गत Competency Based Periodical Assessment (PAT) सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणीचे (PAT-१) आयोजन दि. ०६ ते ०८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते.
प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे पायाभूत चाचणी (PAT -१) घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणीच्या (PAT-१) चाचणीपत्रिका शिक्षकांनी तपासावेत याबबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरावयाचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत चाचणी (PAT) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पायाभूत चाचणी (PAT) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. २० ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
पायाभूत चाचणी (PAT) गुणांची नोंद करणेसाठी लिंक-
तथापि, उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर पायाभूत चाचणी (PAT) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी (PAT) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता दुसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर
https://forms.ole/9ssWv4bu5QPCq6XHA
प्रतिसाद नोंदवावा.
तरी आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. तसेच सदर पायाभूत चाचणीचे गुण नोंद दि.२० ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीतच चाटबॉटवर होणे अपेक्षित आहे. याकरिता वेळ वाढवून देण्यात येणार नाही. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के शाळांची गुणनोंदणी होईल याची दक्षता घ्यावी.
मूल टिपणी मा. संचालक यांनी मान्य केली आहे:
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादर:-
परिपत्रक पीडीएफ लिंक
(डॉ. कमलादेसी आवटे)
सहसंचालक
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
३. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.प्रत्त उचित कार्यवाहीस्तव :
१ मा. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).
२ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. (सर्व).
३ प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
Also Read 👇
जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन / पा.चा.शा.भेट /२०२५-२६/
दि.०५/०८/२०२५
Also Read 👇
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
पायाभूत चाचणी ऑगस्ट २०२५
👉माध्यमनिहाय, इयत्तानिहाय व विषयनिहाय स्वरूपात शिक्षकांसाठी सूचना खालील लिंकवर उपलब्ध आहे.
उत्तरसूची चाचणी नियोजनानुसार वेळापत्रकाप्रमाणे सायंकाळी 5.00 वा उपलब्ध करून देण्यात येईल
मूल्यमापन विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे
Also Read 👇
गुण नोंद तक्ते पायाभूत चाचणी २०२५ -२६ पीडीएफ व एक्सेल मध्ये उपलब्ध 👇
*पायाभूत चाचणी 2025 (PAT 1) उत्तरपत्रिका PDF*
पायाभूत चाचणी उत्तरपत्रिका PDF विषयनिहाय व माध्यम निहाय हव्या असतील तर फक्त या ओळीला स्पर्श करा
मूल्यमापन विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे.
Also Read 👇
जा.क्र. राशैसंप्रपम/ मूल्यमापन / पा.चा. जिल्हा पत्र/२०२५ -२६/
दि.०८/०७/२०२५
प्रति,
विषय : समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२५ -२६ आयोजनाबाबत….
संदर्भ : १. समग्र शिक्षा प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, ५ मे २०२५
२. मा. संचालक यांच्यासमवेत झालेली चर्चा दि. २४/०६/२०२५
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन २०२५२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी -२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दि. ६ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत करण्यात येत आहे.
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
पायाभूत चाचणी उद्देश/उपयोग/फायदे :-
१) अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्वाकडे वळणे.
२) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.
३) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे.
४) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.
५) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा देणे.
६) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होणे.
तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT) संभाव्य कालावधी
तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणी प्रकार
कालावधी
पायाभूत चाचणी
दि. ६ ते ८ ऑगस्ट २०२५
संकलित मूल्यमापन चाचणी, सत्र – १
माहे ऑक्टोबर २०२५ शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबर पहिला आठवडा २०२५
संकलित मूल्यमापन चाचणी, सत्र २
माहे एप्रिल २०२६
- पायाभूत चाचण्यांचे माध्यम व विषय :
सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
चाचणीचा अभ्यासक्रम :
मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मूलभूत क्षमता यावर आधारित असेल.
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
पायाभूत चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :
१. पायाभूत चाचणी ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.
२. पायाभूत चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.
३. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.
४. पायाभूत चाचणीच्या चाचणी पत्रिका अंदाजित दि. १४ जुलै २०२५ ते २८ जुलै २०२५ या कालावधीत वितरीत करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येणार आहेत.
५. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात. तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.
६. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर पोहचवाव्यात.
७. प्रश्नपत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.
अ. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकांनी यांनी इयत्ता २ री ते ८ वी च्या UDISE + च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच पोहोच द्यावी.
आ. तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणीपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
इ. शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.
८. चाचणीपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. चाचणीपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी.
९. तालुका स्तरावर चाचणीपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.
१०. जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची चाचणी आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.
११. सन २०२४-२५ च्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या जिल्हानिहाय, तालुकानिहाय, माध्यमनिहाय व इयत्तानिहाय UDISE + मधील संख्या पुढील इयत्ता ग्राह्य धरून (PROJECTED FIGURE) तसेच शिक्षणाधिकारी यांचेकडून दि. ०७ जुलै २०२५ पर्यंत सेमी / नॉन सेमी (गणित) प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे चाचणीपत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. याप्रमाणे शाळांना प्रत्यक्ष वितरण करण्यात यावे. त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या चाचणी पत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) / शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची वैयक्तिकरित्या राहील.
१२. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.
१३. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
१४. प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac in या वेबसाईटवर चाचणीपूर्वी उपलब्ध असतील. उत्तरसूची चाचणी दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.
१५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्याना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त चाचणीपत्रिका देण्यात याव्यात.
१६. पायाभूत चाचणीची गुण नोंद चाचणी पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.
१७. पायाभूत चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.
चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत –
१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.
२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.
३) चाचणी कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.
४) तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची यादृच्छिक पद्धतीने तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.
उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही तारखांमध्ये बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेवूनच बदल करावा.
वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत पायाभूत चाचणीच्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात.
पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील.
सर्व शिक्षकांना हे आवर्जून कळविण्यात यावे की, सदर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नाही. सबब सर्व चाचण्या प्रामाणिकपणे घेवून विद्यार्थ्यांचे गुणदानही त्याच पद्धतीने करून त्याची माहिती विद्या समीक्षा केंद्र (VSK) Chatboat वर भरावी. या माहितीचा उपयोग केवळ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अध्ययनविषयक गरजा शोधून प्रभावी उपाययोजना करण्यासाठीच होईल याची प्रकर्षाने सर्वांनी नोंद घ्यावी.
परिपत्रक पीडीएफ प्रत हवी असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर:-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
३. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत उचित कार्यवाहीस्तव :
१. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. (सर्व).
२. मा. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).
प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव :
१. शिक्षण संचालक, (प्राथमिक, माध्यमिक, योजना) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. आपल्या स्तरावरून संबंधित यंत्रणेस आवश्यक सूचना निर्गमित करण्यात याव्यात.
प्रति,१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),२) विभागीय विद्याप्राधिकरण (सर्व),३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),४) शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य. व योजना) जि.प. (सर्व),५) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,६) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),७) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),