STARS Project Foundation Test 2024-25 School Visits under Periodic Assessment Test
STARS Project Foundation Test 2024-25 School Visits under Periodic Assessment Test
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/PAT-१/शाळाभेट /२०२४-२५/०३३०४ प्रति,
दि. ८/०७/२०२४
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२) विभागीय विद्याप्राधिकरण (सर्व),
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४) शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य. व योजना) जि.प. (सर्व),
५) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,
६) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),
७) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),
विषयः – STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ शाळा भेटीबाबत
संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.
२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learnig And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.
३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४ ४. मा. संचालक, रा.शै.सं.प्र.प.म.पुणे, यांचे पत्र जा.क्र. राशैसंवप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र २०२४-२५/०२९२६ दि.३१-०५-२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित, व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता ३ री ते ९ वीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित सर्व शाळातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी होणार आहे.
पायाभूत चाचणी वेळापत्रक कालावधी – दि. १० ते १२ जुलै २०२४
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तरी सदर कालावधीत आपण व आपल्या अधिनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दि.१० ते १२ जुलै या कालावधीत शाळाभेटी कराव्यात व सदर भेटी संदर्भातील माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये त्याच दिवशी भरण्यात यावी.
- चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत –
१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.
२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.
३) चाचणी कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.
४) चाचणी नंतर तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची रॅडमली तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.
पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.
सोबत – शाळाभेट लिंक 👇
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
⭐ STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ आयोजनाबाबत…. इयत्ता निहाय प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता निहाय उत्तर सूची
🇬 🔘🔘 🇬 🇱 🇪 —-सर्च करा— eshala