SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2024-25 OFFLINE IN DIET

SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2024-25 OFFLINE IN DIET

image 3
SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2024-25 OFFLINE IN DIET

SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2024-25 OFFLINE IN DIET

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र शासन
दरपत्रक सूचना क्र.१

वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी ऑनलाइन पोर्टल विकसित करणे सन २०२४-२०२५

वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी ऑफलाइन प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीची शिक्षकांचे प्रशिक्षण (नोंदणी, शुल्क, प्रमाणपत्र व इतर सहाय्य) करिता ऑनलाइन पोर्टल विकसित करावयाचे आहे. त्या अनुषंगाने अधिकृत संगणक एजन्सी कडून खालील नमूद बाबींच्या समावेशासह वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या संदर्भाने नवीन ऑनलाइन पोर्टल विकसित करणे करिता दरपत्रक मागवण्यात येत आहे.

अ. क्र

पोर्टलमध्ये समावेशित करावयाच्या आवश्यक बाबी मधील
प्रशिक्षणार्थीना / शिक्षकांना माहिती नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यात पोर्टल विकसित करणे.
प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन (payment gateway) जमा करून पावती देणे. व सर्व व्यवहारांचे विहित नमुन्यात अहवाल देणे
नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीना SMS किंवा E- MAIL द्वारे CONFIRMATION देणे. याविषयीची विहित प्रक्रिया करणे.
प्रशिक्षणार्थीना नोंदणी क्रमांक विकसन (password मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून देणे.)
जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांना Login ID देणे. व सूचनेप्रमाणे माहिती उपलब्ध करून देणे तसेच प्रशासकीय पद्धती राबवणे उदा. हजेरीचा फोटो अपलोड करणे इ.
६ जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (36 DIET) यांना नोंदणी (शिक्षक माहिती, बॅच, गट, प्रशिक्षण प्रकार, शुल्क परतावा इ.) मध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देणे.
७ निवडलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणादरम्यान आवश्यक मार्गदर्शक सूचना व जिल्हानिहाय जिल्हासमन्वयकांची नावे व संपर्क क्रमांक विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे.
८प्रशिक्षणाची Progress ची Day to Day माहिती उपलब्ध होणे. उदा. हजेरी, सुलभक । प्रशिक्षणार्थी online survey (feedback) इ.
९ तज्ञ प्रशिक्षकांची/ मार्गदर्शकांची ऑनलाइन नोंदणी करणे. (दैनिक भत्ता मानधन, प्रवास भत्ता इ.)
१० प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्हा स्तरावर online पद्धतीने अटी शर्तीना अधीन राहून प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे. (उदा. एकही सेशन गैरहजर असेल तर प्रमाणपत्र तयार होऊ नये इ.)

उपरोक्त विवरणामध्ये उल्लेखित कामे करण्यासाठी लागणारे साहित्य व सेवा याबाबतचे दर पत्रक वरील नमुन्यात या कार्यालयास उपलब्ध करून द्यावे.

अटी व शर्ती –

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणा बद्दल अधिक जाणून घ्या त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

  1. दरपत्रक (सर्व करांसहित) सीलबंद लखोट्यात संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३० या नावे दिनांक १०.१२.२०२४ अखेर सायंकाळी ०५ वाजेपर्यंत सादर करण्यात यावे. सादर करण्यात येणाऱ्या सीलबंद लखोट्यावर वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑफलाइन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करिता पोर्टल विकसित करण्यासाठी दरपत्रक असा स्पष्ट उल्लेख असावा.
  2. कोणत्याही परिस्थितीत अग्रीम स्वरूपात रक्कम दिली जाणार नाही.
  3. विहित मुदतीनंतर आलेली दरपत्रके विचारात घेतली जाणार नाहीत.
  4. दर अक्षरी व अंकी बाबनिहाय नमूद करावेत, त्यामध्ये खाडाखोड असू नये.
  5. नमूद केलेले दर हे सर्व करासहित आकारलेले असावेत. याव्यतिरिक्त कोणतीही रक्कम कोणत्याही परिस्थितीत दिली जाणार नाही.
  6. एकूण रकमेवर नियमानुसार टी.डी. एस. आकारला जाईल.
  7. दर पत्रकासोबत शॉप अॅक्ट रजिस्ट्रेशन, पॅन कार्ड व जी.एस.टी. एजन्सी चे तत्सम प्राधिकरणाकडील नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करावी.
  8. निवड झालेल्या संगणक एजन्सी धारकास उपरोक्त अटी व शर्ती मान्य असल्याचे लेखी हमीपत्र रुपये 500/- च्या स्टॅम्पपेपर वर द्यावे लागेल..
  9. या कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी उपस्थित राहून तांत्रिक बाबींचे सर्व अहवाल या कार्यालयास वेळेत व त्या वेळेच्या आवश्यकतेनुसार तात्काळ सादर करावे लागतील.
  10. आपले देयक आपण पुरवलेल्या सेवा। वस्तू यांचे या कार्यालयाकडून गुणवत्तापूर्ण असल्याबाबत खात्री केल्यानंतरच अदा केले जाईल.
  11. या कामासाठी योग्य संगणक प्रणाली विकसित करणे एजन्सीकडे सर्व data online ठेवण्यासाठी आवश्यक क्षमतेचे servers उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  12. SMS द्वारे प्रशिक्षणार्थ्यांना सूचना देण्यासाठी येणारा खर्च; सेवा पुरवण्यासाठी पात्र होणाऱ्या संस्थेने करावा.
  13. उपरोक्त्यानुसार वेळोवेळी आवश्यक सेवा, दुरुस्त्या, सुधारणा व इतर तांत्रिक बाबी अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची असेल.
  14. या कार्यालयास आपणाकडून प्राप्त होणाऱ्या उपरोक्तानुसार अपेक्षित सेवेत तत्परता व आवश्यक गुणवत्ता आढळून न आल्यास, काम असमाधानकारक आढळल्यास प्रस्तुत सेवा करार आदेश रद्द करण्यात येईल.
  15. उपरोक्त कामातील अटी व शर्ती शिथिल करण्याचा तसेच कोणतेही दर पत्रक कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, परिषद, महाराष्ट्र यांनी राखून ठेवलेला आहे.
  16. या संदर्भात यापूर्वी निर्गमित झालेले किंवा होणारे शासन आदेश परिपत्रक इत्यादी मधील तरतुदी व अटी / शर्ती बंधनकारक राहतील.
  17. प्रस्तुत कामाची मुदत आदेश दिल्यापासून एक वर्ष असेल.
  18. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑफलाईन प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवर संपूर्ण मालकी हक्क राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचा राहील.

27/11/24
राहूल रेखाबार (भा.प्र.से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रतः – प्रसिद्धीसाठी सूचनाफलकावर तातडीने लावण्यासाठी सादर

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,

पुणे

क्र. राशेसंप्रषम/सेवापूर्व शिक्षण एम. बी. टी.ई/२०२४/२७०५ दिनांक ०३/०६/२०२४.

प्रति.

सर्व प्राचार्य जिल्ला शिक्षण व प्रशिक्षण संस्था

संदर्भ:

१) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२३/१०/२०१७.

२) शासन निर्णय क्र. शिप्रथो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२०/०७/२०२१.

३) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचे दि.२१/०२/२०२४ चे निवेदन

४) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) जळगांव यांचे पत्र क्र. जिशिप्रसं/जळगाव/ व.नि.श्रेणी प्र./२०२३-२४/६६.दि.२३/०२/२०२४.

५) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) धुळे यांचे पत्र क्र. जिशिवप्प्रसंधू/वनिश्रेप/२०८, दि.२३/०२/२०२४.

६) विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांचे पत्र क्र.जा.क्र.जिशिपर्स/अम/ ववेश्रेवनिश्रे प्रशिक्षण/१५३/२४, दि.०१/०३/२०२४.

उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्र.१ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सोपविण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार किमान १० दिवसांचे किंवा ५० घडयाळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले. यापूर्वी कोचिड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत संदर्भ पत्र क्र.३ अन्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचेकडून तसेच संदर्भ पत्र क्र.४ ते ६ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेचाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून विनंती करण्यात आली आहे.

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणा बद्दल अधिक जाणून घ्या त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन, प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाथीचे परस्परामधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाण-घेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक संवत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने बरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सन २०२४-२५ पासून ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये) घेण्याचे नियोजित आहे. याकरिता सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी ५ तज्ञ अभ्यासक/तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दि.५ जून २०२४ पर्यंत Email- LINK या ई-मेल आयडीवर सादर करावी. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतोल वरिष्ठ आंधव्याख्याता/अधिव्याख्याता इत्यादी ३ तसेच याव्यतिरिक्त आपल्या जिल्हयातील इतर २ तज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावेश असावा.

(डॉ. माधुरी सावरकर)

उपसंचालक

(सेवापूर्व शिक्षण)

राज्य शैक्षणिक संशाधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,

पुणे

Circular Pdf Copy Link

Circular Pdf Copy Link

1 thought on “SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2024-25 OFFLINE IN DIET”

Leave a Comment

error: Content is protected !!