Old Vehicles Require HSRP जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक

Old Vehicles Require HSRP

IMG 20250109 105522
Old Vehicles Require HSRP

Old Vehicles Require HSRP

Older vehicles require a high security registration number plate

महाराष्ट्र शासन परिवहन आयुक्त कार्यालय ५ वा मजला, टेलिकॉम बिल्डींग नं २, महात्मा गांधी रोड, फाऊंटन, मुंबई ४०० ००१.

दुरध्वनी क्रमांक: ०२२-२०८२६४९८

ई-मेल आयडी: dytccomp.tpt-mh@gov.in

क्रमांकः पआका/का-११/HSRP/२०२४/जा.क्र. 14879

दिनांक:- 213 DEC 2024

परिपत्रक क्र. 69/२०२४

विषय :- दि. ०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांस HSRP बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. ११६२ (E) दि.०४/१२/२०१८ व S.O. ६०५२ (E) दि ०६/१२/२०१८ नुसार दि.०१/०४/२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर (मागे बसलेला) दोघांनाही आवश्यक अन्यथा होईल कार्यवाही वाचा या ओळीला स्पर्श करून

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP बसविणे अत्यावश्यक असून मा. सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिले आहेत. सदर निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना HSRP बसविण्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि.०१/०४/२०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने HSRP बसविण्याकरिता विभागामार्फत निविदा (RFP) प्रक्रिया राबवून एकुण ३ संस्था/उत्पादकांची निवड करण्यात आली राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे ३ झोन मध्ये विभागणी करुन प्रत्येक झोनसाठी खालील दिल्याप्रमाणे उत्पादक/संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे.

रस्ते सुरक्षा अभियान जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

Zone

Implementing Agency Name

HSRP Booking Portal Link

Zone – 1

M/s Rosmerta Safety Systems Ltd

Zone-2

M/s Real Mazon India Ltd.

वर नमूद झोननुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय / उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांची यादी Annexure – A मध्ये जोडली आहे. (प्रत संलग्न)

तसेच प्रत्येक निवडलेल्या HSRP बसविणाऱ्या एजन्सीची झोननिहाय अधिकृत फिटमेंट सेंटर्सची (FC) यादी महाराष्ट्र मोटार वाहन विभाग

या वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.

सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दि.०१.०४.२०१९ पुर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसविण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. परिवहन विभागाने निविदेतील तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालयामध्ये आवश्यक असणाऱ्या किमान HSRP बसविणाऱ्या केंद्राची संख्या सोबत जोडली आहे. याशिवाय आणखी HSRP बसविणाऱ्या केंद्राची आवश्यकता असल्यास संबंधीत प्रादेशिक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आणखी HSRP बसविणाऱ्या केंद्राना मान्यता देऊन त्यांची यादी प्रसिध्द करावी.

२. सदर फिटमेंट केंद्रांची आपण स्वतः तपासणी करुन संपूर्ण जिल्हयातील वाहन धारकांसाठी सदर केंद्र सोयीचे असल्याची खात्री करुन त्यांना मान्यता दयावी. यापेक्षा अधिक फिटमेंट केंद्राची आवश्यकता असल्यास संबंधित अंमलबजावणी एजन्सीला कळवावे.

३. महाराष्ट्र राज्यात दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP व तिसऱ्या नोंदणी चिन्हांचे स्टिकर लावणे बंधनकारक झाल्याबाबत वृत्तपत्र व प्रसार माध्यमाद्वारे प्रसिध्दी देण्यात यावी व प्रकल्पाची विहीत कालावधीमध्ये अंमलबजावणी करावी.

४. आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अवजड वाहने, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस इत्यादी संघटनांची बैठक घेऊन सभासदांना दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे.

५. आपल्या जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, बँका, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था इत्यादींची बैठक घेऊन सर्वांना याविषयी अवगत करावे.

६. आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हयातील पोलीस अधिकाऱ्यांना बनावट HSRP, विक्री व विक्रीत गुंतलेल्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात याव्या.

७. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (RC) पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट, इत्यादी वाहन संदर्भातील कामे HSRP बसविल्याचे प्रमाणीकरण केल्यानंतरच करण्यात यावी.

८. दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या कोणत्याही जुन्या वाहनांवर परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेश जारी केल्याशिवाय वायुवेग पथकाद्वारे अथवा अंमलबजावणी प्राधिकरणांद्वारे कोणतेही ई-चलान/ चलान जारी केले जाणार नाहीत आणि तडजोड शुल्क वसुल केला जाणार नाही किंवा कोणतेही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. परिवहन आयुक्त कार्यालयाने अंमलबजावणीचे आदेश जारी केल्यानंतर अंमलबजावणी अधिकारी पुढील कायदेशीर कारवाई करतील आणि मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १७७ अंतर्गत चलान जारी करुन HSRP उल्लघंनाचा गुन्हा नोंदवतील. तथापि वाहन मालकांनी परिवहन विभागाने जारी केलेल्या SOP नुसार दि.३१.०३.२०२५ पर्यन्त HSRP पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक राहील.

९. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार सर्व मोटार वाहनांना विहित केलेल्या HSRP लावणे अनिवार्य आहे. जुन्या मोटार वाहनांवर नक्कल केलेली किंवा तत्सम दिसणारी नंबर प्लेट बसविली असल्यास अशा नंबर प्लेट बदलणे आवश्यक राहील.

१०. दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणीकृत मोटार वाहनांसाठी वर नमूद केलेल्या अधिकृत HSRP उत्पादकांकडून वाहनांवर बसविण्यात आलेले HSRP हेच केवळ वैध मानले जाईल आणि वाहन पोर्टलवर अद्ययावत केले जाईल. इतर कोणत्याही HSRP निर्मात्याकडून/पुरवठादाराकडून बसविलेल्या HSRP मोटार वाहन कायदा आणि नियमांच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईसाठी पात्र असतील.

११. वाहन मालक / अर्जदार त्यांच्या वाहनांवर HSRP बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठादाराच्या पोर्टलवर वआपल्या कार्यालयातही तक्रार दाखल करु शकतात. सदर तक्रारीची खातरजमा करुन आवश्यक असल्यास पुढील कार्यवाहीकरिता प्रस्ताव परिवहन आयुक्त कार्यालयाकडे सादर करावा.

१२. दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या मोटार वाहनांवर HSRP बसविण्याची पक्रिया विना अडथळा आणि वेळेत होईल याची खात्री करण्यासाठी सर्व नोंदणी प्राधिकारी आणि तपासणी अधिकाऱ्यांना वरील आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

वाहनांवर HSRP बसविण्यासाठी नेमलेल्या सेवापुरवठादार एजन्सीने खालील नमूद केलेल्या वेळापत्रकाचे (Timeline) काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील. याबाबत सर्व प्रादेशिक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सदर वेळापत्रकानुसार कार्यवाही होत असल्याची खातरजमा करावी.

Event

HSRP Appointment Booked by Applicant

Blank HSRP to be embossed

Applicant to be able to reschedule appointment, if HSRP not affixed in the first appointment

Embossed HSRP to be maintained at Affixation Centre

Embossed HSRP to be destroyed

Timeline

Day 0

2 days prior to Appointment Date

Any date, up to 90 days after first appointment date

Up to 90 days after first appointment

After 90 days from first appointment date (if not fitted to respective vehicle)

नमूद केलेले दर हे HSRP संचासह बसविण्याचे शुल्क (fitment charges) GST वगळून खालीलप्रमाणे आहेत.

Sr. No.

Vehicle Category

HSRP Set Rates including fitment charges and excluding GST (in INR)

1 Two-Wheelers and Tractors

450.00

2 Three-Wheelers

3 Light Motor Vehicles/

500.00

4 Passenger Cars/ Medium Commercial Vehicles/ Heavy Commercial Vehicles

745.00

and Trailer/Combination

HSRP उत्पादक वाहन मालकाला निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर HSRP बसविण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटना (RWA) / सोसायटी येथे शिबिरे आयोजित करु शकतात. पण अशी सुविधा ही वाहन मालकाच्या इच्छेनुसार ऐच्छिक राहील. तथापि, कोणत्याही परिस्थितीत, नियुक्त केलेले अधिकृत HSRP फिटमेंट केंद्रावर वाहन मालकांना HSRP बसविण्याची सेवा नाकारता येणार नाही.

वरील सर्व नमूद सुचनाचे सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी/ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काटेकोरपणे पालन करावे.

परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई.

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आवश्यक

Older vehicles require a high security registration number plate

Leave a Comment

error: Content is protected !!