New Update List of SC ST VJ NT OBC SBC of Maharashtra State
New Update List of SC ST VJ NT OBC SBC of Maharashtra State
List of Scheduled Castes, Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Classes of Maharashtra State
महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची यादी.
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन परिपत्रक क्रमांक- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३०८/मावक मंत्रालय, मुंबई
दिनांक :- ०९ जानेवारी, २०२५.
शासन परिपत्रक :-
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची अद्ययावत यादी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक-१, दि.२६ सप्टेंबर २००८ च्या शासन पत्रान्वये प्रसिद्ध केली आहे.
२. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जाती जमाती संदर्भातील नियमन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात येते. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाचे जाती प्रमाणपत्र देणाऱ्या व त्यांची पडताळणी करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांना तसेच मागासवर्गीयांचे लाभ लागू करताना सदरहू यादीचा उपयोग व्हावा याकरीता सुलभ संदर्भासाठी एकत्रित संकलन स्वरूपाची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
३. सदर यादी ही संकलन स्वरूपाची असून, मागासवर्गीय जाती जमातीच्या निश्चितीसाठी तसेच त्या त्या मागासप्रवर्गाचे लाभ लागू करताना, सदर जाती जमातींचा ज्या शासन निर्णय वा आदेशान्वये समावेश केलेला आहे ते शासन निर्णय व आदेश ग्राह्य धरण्यात यावेत.
४. सदरहू शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असून, त्याचा संकेताक २०२५०१०९११२९०५५६३४ असा आहे. सदर शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सहपत्रः- वरीलप्रमाणे
सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास ओळीला स्पर्श करा
संपूर्ण जातीनिहाय पीडीएफ यादीसाठी या ओळीला स्पर्श करा
(र. रा. पेटकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३०८/मावक
शासन परिपत्रक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांकः संकीर्ण-२०२४/प.क्र.३०८/मावक, दि.०९.०१.२०२५ सोबतचे सहपत्र
विमुक्त जाती -अ (V.J.-A)- आरक्षण (३%)
भटक्या जमाती ब NTB Reservation 2.5