विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम योग व निसर्गोपचार पदवी या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ देणेबाबत तसेच सदर अभ्यासक्रम महाडीबीटी प्रणालीवर मॅपींग करणेबाबत शासन निर्णय OBC VJNT SBC Students Scholarships for Bachelor of Naturopathy And Yogic Science courses

OBC VJNT SBC Students Scholarships for Bachelor of Naturopathy And Yogic Science courses

OBC VJNT SBC Students Scholarships for Bachelor of Naturopathy And Yogic Science courses

Regarding the provision of scholarships to students from Denotified Tribes, Nomadic Tribes, Other Backward Classes, and Special Backward Classes under the Post-Matric Scholarship Scheme for the professional course of Bachelor of Naturopathy & Yogic Science, and also regarding the mapping of this course on the MahaDBT system.

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम योग व निसर्गोपचार पदवी (Bachelor of Naturopathy & Yogic Science) या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ देणेबाबत तसेच सदर अभ्यासक्रम महाडीबीटी प्रणालीवर मॅपींग करणेबाबत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्रमांकः- शिवृत्ती-२०२५/प्र.क्र.१३२/शिक्षण-१, मुंबई

दिनांक:- ०५ फेब्रुवारी २०२६.

संदर्भः-१. शासन निर्णय क्रमांकः इबीसी-२०१७/प्र.क्र.१३/शिक्षण, दिनांक. २१.०८.२०१७.

२. उच्च तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१७/प्र.क्र.१३२/तांशि-४ दि.०७.१०.२०१७

३. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाची दि. ३०.०५.२०२५ रोजीची अधिसूचना.

४. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग पत्र क्र. एमईडी-१०२४/प्र.क्र.४४२/२४/शिक्षण-२ दिनांक १३.०६.२०२५

प्रस्तावना:-

केंद्र शासनाच्या सन १९९८ मधील मार्गदर्शक सूचनेनुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतंर्गत, केंद्र शासनाने सन १९९८ च्या पत्रकान्वये विहित केलेल्या अभ्यासक्रमाच्या गटानुसार एकूण ६०५ अभ्यासक्रम विहित करण्यास संदर्भ क्र.१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सं.क्र.०२ येथील दि.०७.१०.२०१७ च्या शासन निर्णयान्वये (अ.क्र.५०) नव्याने एखादया अभ्यासक्रमाचा समावेश करण्याकरिता अपर मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण यांच्या अध्यक्षतेखालील सचिव स्तरीय समितीला अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

संदर्भ क्र.०४ च्या पत्रान्वये दि.०९.०५.२०२५ रोजी अपर मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त विभागास पाठविण्यात आले असून “योग व निसर्गोपचार पदवी” (Bachelor of Naturopathy & Yogic Science) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना विभागाच्या प्रचलित मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्याकरीता सदर योजना महाडिबीटी प्रणालीवर मॅपिंग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

      शासन निर्णयः-

१. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग यांनी संदर्भ क्र.०४ येथील पत्रान्वये शिफारस केल्याप्रमाणे “योग व निसर्गोपचार पदवी” (Bachelor of Naturopathy & Yogic Science) या व्यावसायिक अभ्यासक्रमास इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ सन २०२५-२६ पासुन लागु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर अभ्यासक्रमांचे महाडीबीटी पोर्टलवर मॅपींग करण्याची कार्यवाही महाआयटी यांनी करावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२६०२०५१५०६३०७१३४ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नांवाने,

शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक 

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

OBC VJNT SBC Students Scholarships for Bachelor of Naturopathy And Yogic Science courses
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम योग व निसर्गोपचार पदवी (Bachelor of Naturopathy & Yogic Science) या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ देणेबाबत तसेच सदर अभ्यासक्रम महाडीबीटी प्रणालीवर मॅपींग करणेबाबत शासन निर्णय

Leave a Comment

error: Content is protected !!