NMMS EXAM INFORMATION

NMMS EXAMINATION INFORMATION एन एम एम एस परीक्षे बाबत संपूर्ण माहिती

NMMS
महाराष्ट्र शासन
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना
NATIONAL MEANS CUM MERIT SCHOLARSHIP SCHEME Information
शिक्षण कार्यमंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, १७. डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे- ४११ ००१.
प्रस्तावना :-
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना सन २००७-०८ या वर्षापासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित (आई-वडिलांचे) रु.३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
परीक्षेचे आयोजन – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत केले जाते. इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या शिष्यवृत्ती निकषानुसार पात्र विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. सदर विद्याथ्यांना इयत्ता ७ वी मध्ये किमान ५५ टक्के गुण असावे. (SC, ST, VJ, NTB, NTC, NTD OBC, DBC यांना गुणामध्ये ५ टक्के सवलत). सदर परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराथी, तेलगु, सिंधी व कन्नड या माध्यमातून घेतली जाते. सदर परीक्षेचे शुल्क १०० रु व शाळा संलग्नता शुल्क २०० रु आकारले जाते.
परीक्षेचा अभ्यासक्रम – परीक्षेचा अभ्यासक्रम हा इ. ८ वी पर्यंतचा राज्यशासनाचा आहे.  
पेपर १ बौध्दिक क्षमता चाचणी (MAT)
पेपर २ शालेय विषयक क्षमता चाचणी (SAT) (सामान्य ज्ञान – ३५ गुण + सामाजिक शास्त्र ३५ गुण गणित २० गुण) दोन्ही पेपर साठी प्रत्येकी ९० गुण व वेळ ९० मिनीटे.
एन एम एम एस परीक्षेमधून राज्याला ठरवून दिलेल्या (११६८२) कोटयानुसार निवडलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत तयार केली जाते. शासन निर्णय क्र.२० ऑगस्ट, २०१८ पासून परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इ. ९ ते इ. १२ वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १०००/- प्रमाणे (वार्षिक रु.१२०००/-) शिष्यवृत्ती मिळते. सन २०१७-१८ पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्याने नवीन व नुतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने भरलेल्या अजांची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहीत मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर करणे आवश्यक आहे. www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या आहे. तसेच पात्र लाभाथ्र्यांना शिष्यवृत्तीचा लाभ Public Finance Management System PFMS मार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर परस्पर Direct Benefit Transfer (DBT) द्वारे जमा केली जाते.
उद्दिष्टे :
१. इयत्ता ८ वी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दीमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे.
२. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी.
३. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्याची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
शिष्यवृत्तीचे दर :-
इ. ९वी ते इ. १२वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १०००/- प्रमाणे (वार्षिक रु.१२०००/-) शिष्यवृत्ती
अर्ज करण्याची पध्दत :- आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या
www.mscepune.in व http://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
पात्रतेचे निकष / Eligibility Criteria:-
१. पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. २. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे.
३. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
४. इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.
५. इयत्ता १०वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास ०५ टक्के सुट.) इयत्ता ९वी मधून १०वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११वी मधून १२वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.  
६. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे. ७. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे.
८. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
९. विद्यार्थ्याकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.
१०. जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल.
११. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही.
१२. विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्यानंतर शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्यांचा दावा विचारात घेतला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे :-
१. सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
२. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे एन.एम.एम.एस. परीक्षेचे गुणपत्रक.
३. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गतवर्षाचे (इयत्ता ९वी, १०वी, ११वी) गुणपत्रक.
४. सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा रु. ३,५०,०००/- आतील उत्तपन्नाचा दाखला.
५. ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा (जातीचा) सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा दाखला
६. आधार कार्ड प्रत.
७. बैंक पासबुकची प्रत.
संपर्क :-
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना ) जिल्हा परिषद
२. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक
खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.
• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
•केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
विद्यार्थ्यांची निवड (Selection) :- विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
परीक्षेचे वेळापत्रक (EXAMINATION TIME TABLE) :- महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक
बृहन्मुंबई यांचे मार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेण्यात येते
एन एम एम एस परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असते
अ.क्र.विषयाचे नावएकूण गुणएकूण प्रश्नकालावधी  वेळ  पात्रता गुण (एकत्रित)  
०१बौध्दिक क्षमता चाचणी Mental Abilily Test (MAT)९०९०दीड तास (फक्त दृष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ)१०.३० ते १२.०० ४०%*
विश्रांती १२.३० ते १३.३०
०२शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test (SAT)९०९०दीड तास (फक्त दृष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ)१३.३० ते १५.००  
* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
परीक्षेसाठी विषय :- सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.
a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) : ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यतः इयत्ता ८ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण- ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण – ३५) ३. गणित (एकूण गुण – २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
> उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
a. सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
b. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण c. गणित २० गुण.
माध्यम :- प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वुर्तळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/ अपुरी / अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वुर्तळात नोंदविलेली/उत्तरे / चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/ व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

Leave a Comment

error: Content is protected !!