Know Important Things for NMMS Exam

Know Important Things for NMMS Exam

image 28
Know Important Things for NMMS Exam

Know Important Things for NMMS Exam

NMMS ANSWER KEY SAT

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
दिनांक :- १४/०१/२०२५

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ अंतिम उत्तरसूची

IMG 20250114 213023

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
दिनांक :- ०१/०१/२०२४

NMMS Exam Does And Donts

💐 प्रथमतः सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ! 💐

विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला दिड तासात ९० प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाच्या  ९० मोत्यांची व्यवस्थित गुंफण करा.

एम एम एम एस परीक्षेला जात आहात तर खालील महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच.
Important Ten things to remember before appearing for NMMS Exam

.NMMS परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना

०१) विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी प्रवेश पत्र सोबत आणावे व निकाल घोषित होईपर्यंत जतन करून ठेवावे.

०२) दिव्यांग, दृष्टीदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र सोबत आणावे.

०३) विद्यार्थ्याने परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान १ तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे.

०४) सर्व लेखन साहित्य (पेन, पेन्सिल, कंपास इत्यादी) व पिण्याच्या पाण्याची बाटली विद्यार्थ्यांनी सोबत आणावी. जेवणाचा डबा सोबत आणावा.

१६) चांगले चलणारे काळ्या किंवा निळ्या रंगाचे.४ ते ५ बॉल पेन एकाच रंगाचे घ्या शक्यतोवर त्या पेनाने तुम्ही परीक्षा पूर्व सराव केलेला असावा.

०५) तुमची पाण्याची बाटली बेंचवर चूकून पण ठेवू नका .तुम्हांला पाणी हवे असल्यास उत्तर व प्रश्न पत्रिका / पेपर बाजूला करून पेपर वर पाणी पडणार नाही या पद्धतीने पाणी प्या.

०५) परीक्षा हॉलमध्ये मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलकुलेटर, लॉग टेबल, रेडी रेकनर इत्यादी साहित्य आणू नये.

प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा.
१. उत्तरे नोंदविण्यासाठी स्वतंत्र कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली आहे. त्यावरच आपली उत्तरे नोंदवावीत. परीक्षेची वेळ संपल्यानंतर ही कार्बनलेस प्रत मूळ उत्तरपत्रिकेपासून वेगळी करून परीक्षेच्या निकालापर्यंत स्वतःकडे जतन करून ठेवावी.


२. तुमचा केंद्र संकेतांक आणि आसन क्रमांक प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर दिलेल्या विहित ठिकाणी सुस्पष्टपणे लिहावा. (एका चौकटीत एकच अंक याप्रमाणे) स्वतःचा आसन क्रमांक लिहिण्यापूर्वी प्रवेशपत्रानुसार तो बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. कोणताही रकाना रिक्त राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

image 27
Know Important Things for NMMS Exam

३. तुम्हाला उत्तरे नोंदविण्यासाठी पेपर एक बौध्दिक क्षमता चाचणी (Mental Ability Test) चीच उत्तरपत्रिका मिळाली आहे याची खात्री करावी.तसेच तुम्हाला उत्तरे नोंदविण्यासाठी पेपर दोन शालेय क्षमता चाचणी (Scholastic Ability Test) चीच उत्तरपत्रिका मिळाली आहे याची खात्री करावी.
४. सदर विषयासाठी ९० प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
५. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
६. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रश्नपुस्तिकेमध्ये चार पर्याय दिले आहेत. त्यापैकी तुम्हाला योग्य वाटेल त्या पर्यायाचा क्रमांक पहा व त्या क्रमांकाचे वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने रंगवून उत्तर नोंदवा. मात्र हे काम तुमच्या उत्तरपत्रिकेवर योग्य प्रश्नापुढे करावयाचे आहे प्रश्नपुस्तिकेवर नाही.
७. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करून एकामागून एक प्रश्न सोडवीत शेवटपर्यंत प्रश्न सोडवावेत.
८. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर त्यावर जास्त वेळ घालवू नका. पुढचे प्रश्न सोडविण्यास घ्या. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर उरलेल्या वेळात राहून गेलेल्या प्रश्नांवर तुम्हाला पुन्हा विचार करता येईल.
९. प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला मिळणारा वेळ विचारात घेऊन त्याचा जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे उपयोग करा. कच्चे काम प्रश्नपत्रिकेवरील प्रत्येक पृष्ठावर दिलेल्या रिकाम्या चौकटीतच करावे.
१०. या प्रश्नपुस्तिकेत केंद्र संकेतांक, आसन क्रमांक व कच्चे काम याखेरीज अन्य काहीही लिहू नका.

एन एम एम एस / NMMS परीक्षेला यासास्वीपणे सामोरे जाण्यापूर्वी सराव म्हणून खालील दिशादर्शक आदर्श उत्तरासह प्रश्नमंजुषा सोडवा

सराव परीक्षा लिंक

पेपर सोडविताना तुम्हांला पूर्ण दिड तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा.गडबड करून पेपर लवकर सोडवू नका.वेळेचे नियोजन करा. त्यासाठी परीक्षा पूर्व प्रश्न मंजुषा सोडवा

image 29
Know Important Things for NMMS Exam

परीक्षा पूर्व प्रश्न मंजुषा सोडवा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा आणि महत्वाचे म्हणजे उत्तरपत्रिकेत त्याच प्रश्नाचा क्रमांक पाहून नंतरच तुमचा अचूक पर्याय रंगवा.चूकून सुद्धा दुसऱ्या गोल मध्ये dot पण पडू देवू नका तुमचे ते उत्तर चूकीचे ठरू शकते.

०६) उत्तरपत्रिकेमध्ये (OMR Sheet) प्रश्नाचे उत्तर नोंदविताना चार वर्तुळ पैकी एक योग्य पर्याय असलेले वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बॉल पेन ने रंगवणे आवश्यक आहे. (पेन्सिलने रंगवू नये).

०७) जे प्रश्नपत्रिकेवर आपण प्रश्न वाचतो, त्याच प्रश्न क्रमांकाचे उत्तर, उत्तरपत्रिकेवर (OMR Sheet) वर्तुळ रंगवायचे. कारण बऱ्याच वेळा घाई घाई मध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवतो. याचे भान असू द्यावे.

०८) प्रश्नपत्रिकेचा प्रत्येक पानावर कच्च्या कामासाठी जागा दिलेली आहे. त्यावर आपण आकडेमोड करू शकता.

बुद्धिमत्ता मधील आकृत्याचे १० प्रकार तुम्हांला येतात पण over confidence अतिआत्मविश्वास करू नका.प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक पर्यायातील आकृती पाहूनच तुमचे उत्तर निवडा.गडबडीत उत्तरे निवडू नका ४० आकृत्या अचूक आल्याच पाहिजे हे लक्ष / target ठेवा तेव्हा ४५ % मुलांच्या सर्व आकृत्या येतातच.

आता गणितातील प्रश्नांना सुरूवात होते .सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा गणितातील प्रत्येक प्रश्न सोडविल्याशिवाय उत्तर अंदाजे करू नका.कितीही सोपा प्रश्न असू द्या तो सोडवाच.

कधी कधी सुरूवातीला ५ ते ६ प्रश्न खूपच सोपे येतात आणि आपण relax होतो आणि उत्तरे तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच खऱ्या चूका होत असतात हे लक्षात ठेवा.

एन एम एम एस परीक्षेचे खरे मेरीट हे गणितातील ४ ते ५ प्रश्नावरच फिरत असते हे लक्षात ठेवा .

स्पर्धा खूप आहे हे लक्षात ठेवा.प्रत्येक जिल्ह्यात दोन लक्ष पन्नास हजार मुले एन एम एम एस परीक्षेला बसलेले आहेत आणि महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय (MOE), नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्याथ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४% आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हयानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आसतो..तुम्ही पेपर सोडविताना हाच एक विचारा करा की कोटा कितीही असोत त्यात एक जागा तुमची नक्की / fix आहे आणि याच दिशेने व्यवस्थित पाऊल टाका.पेपर छान सोडवा.

NMMS Exam Focus Points

०९) जे प्रश्न आपल्याला सोपे वाटतात ते प्रथम सोडून घ्यावी व प्रश्नपत्रिकेवर पेनाने ✅अशी खून करावी व जे प्रश्न आपणाला कठीण वाटतात त्या प्रश्नाला प्रश्नपत्रिकेवर पेनाने ❎ अशी खूण करावी म्हणजे आपल्याला समजेल की ते प्रश्न राहिले. ते प्रश्न नंतर सोडवावी व जे प्रश्न आपणाला येतच नाही ते प्रश्न तर्क लावून सोडवावी. एकाच प्रश्नाचे, उत्तरपत्रिकेवर दोन वर्तुळ रंगवू नये.

१०) सर्व प्रश्न सोडवावे. एकही प्रश्न राहू देऊ नका कारण Negative Marking हा प्रकार नाही आहे.

११) पेपर सोडवत असताना वेळेचे भान असू द्यावे.

१२) उत्तर पत्रिका (OMR Sheet) चुरगळू किंवा दुमडू नये.

१३) ४०% पेक्षा जास्त दृष्टीदोष असल्यास विद्यार्थ्याने त्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र केंद्रसंचालकास सादर करावे. केंद्र संचालकाची खात्री पटल्यानंतरच त्यास ज्यादा वेळेची सवलत देण्यात येईल.

१४) परीक्षा हॉल सोडण्यापूर्वी आपली उत्तर पत्रिका(OMR Sheet ) संबंधित पर्यवेक्षकाकडे जमा करावी व प्रश्नपत्रिका व कार्बन लेस प्रत घरी आणावी. कार्बन लेस प्रत निकाल घोषित होईपर्यंत स्वतःकडे ठेवावी.

१५) तुमच्या सोबत दोन हात रूमाल असायलाच हवेत कारण तुमच्या तळ हाताला नेहमी घाम येत असतो घामामुळे उत्तरपत्रिका खराब व्हायला नको म्हणून थोड्या थोड्या वेळाने तळहात पुसा आठवणीने.

रविवार २२ डिसेंबर २०२४ ला होणाऱ्या एन एम एम एस / NMMS परीक्षेकरता सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.चांगला पेपर सोडवा .यश तुमचेच आहे.👍

शेवटी एकच म्हणेल तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला पेपर एकसाठी दिड तासात ९० प्रश्नात आणि पेपर दोनसाठी ९० प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाच्या ९० + ९० = १८० मोत्यांची व्यवस्थित गुंफण करा.
एन एम एम एस / NMMS परीक्षेला यासास्वीपणे सामोरे जाण्यापूर्वी सराव म्हणून खालील दिशादर्शक आदर्श उत्तरासह प्रश्नमंजुषा सोडवा

सराव परीक्षा लिंक

NMMS EXAM 22 Dec 2024 Tentative Answer Key SAT
NMMS EXAM 2024 Tentative Answer Key SAT
Que NoAnsQue NoAnsQue NoAns
1 241 181 1
2 342 282 3
3 443 483 3
4 144 184 4
5 445 385 2
6 346 486 2
7 347 287 3
8 248 188 4
9 349 389 1
10 450 290 1
11 151 3
12 352 3
13 353 2
14 454 4
15 255 3
16 456 1
17 357 3
18 358 1
19 159 3
20 260 4
21 461 3
22 362 2
23 463 3
24 264 3
25 165 2
26 266 3
27 267 2
28 468 3
29 169 4
30 370 1
31 371 4
32 372 2
33 273 4
34 174 3
35 475 1
36 376 4
37 477 2
38 178 3
39 479 1
40 280 2
NMMS EXAM 22 Dec 2024 Tentative Answer Key MAT LINK

Leave a Comment

error: Content is protected !!