NMMS EXAM INFORMATION

NMMS EXAMINATION INFORMATION एन एम एम एस परीक्षे बाबत संपूर्ण माहिती

image
NMMS EXAM INFORMATION

NMMS EXAM INFORMATION

    माहितीपत्रक

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२५

१. योजनेची उद्दिष्टे :-
a) इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे.
b) विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे.
c) विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी.

२. परीक्षेचे स्वरुप :- केंद्रशासनामार्फत (शिक्षण मंत्रालय (MOE), भारत सरकार, नवी दिल्ली) २००७-०८
पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु. १०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

३. पात्रता :-
a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सन २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
c) विद्यार्थी/विद्यार्थीनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

४. ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत
दिनांक १२/०९/२०२५ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या
https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. विद्यार्थ्यांचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही. ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉगीनवरुन Edit करता येईल. प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल, याची नोंद घ्यावी. सविस्तर माहिती परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://mscenmms.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

५. शुल्क :- परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.

अ.क्र.ऑनलाईन आवेदनपत्र भरणे तपशीलदिनांकशुल्क रु.शाळा संलग्नता फी
नियमित शुल्कासह१२/०९/२०२५ ते ११/१०/२०२५१२०/-संलग्लता फी रु.२००/- प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी
विलंब शुल्कासह१२/१०/२०२५ ते २१/१०/२०२५२४०/
अतिविलंब शुल्कासह२२/१०/२०२५ ते ३०/१०/२०२५३६०/-
(शाळा/संस्था जबाबदार असेल तर)(४८०/-)

६. परीक्षेचे वेळापत्रक:- सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

अ.क्रविषयाचे नावगुण एकूणएकूण प्रश्नकालावधीवेळपात्रता गुण (एकत्रित)
१  बौध्दिक क्षमता चाचणी Mental Ability Test९०९०९० मिनिटे (दिव्यांगासाठी ३० मिनिटे जादा वेळ)१०.३० ते १२.००          ४०%*  
  विश्रांती १२.३० ते १३.३०
शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test९०९०९० मिनिटे (दिव्यांगासाठी ३० मिनिटे जादा वेळ)१३.३० ते १५.००

* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

परीक्षेसाठी विषय : सदर परीक्षेसाठी २ विषय असतील. प्रत्येक पेपरसाठी A,B,C,D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT):- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT):- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित
असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण ३५) ३. गणित (एकूण गुण – २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
a. सामान्य विज्ञान ३५ गुण भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
b. समाजशास्त्र ३५ गुण इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
c. गणित २० गुण.

८. माध्यम :- परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते.
(सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

९. प्रवेशपत्रे :-ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना शाळेच्या लॉगीनवर परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर उपलब्ध होतील. सदर प्रवेशपत्राची छापील प्रत विद्याथ्यर्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची तसेच सदर प्रवेशपत्रातील विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करण्याची सर्व जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

१०. परीक्षेचे मूल्यमापन :- विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पध्दतीने
करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पध्दतीचा अवलंब केला जात नाही. खबरदारीचे सर्व उपाय योजना यांचा विचार करुन बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयांसह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्रशासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हयानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

११. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्याः अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

१२. निकाल घोषित करणे सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

१३ . गुणपत्रक / प्रमाणपत्र: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना
गुणपत्रक व प्रमाणपत्राची डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शाळेने सदर गुणपत्रक व प्रमाणपत्राची रंगीत प्रिंट काढून विद्याथ्यांना वितरीत करण्यात यावी. तसेच डिजिटल प्रतीची सॉफ्ट कॉपी शाळेत जतन करुन ठेवण्यात यावी.

१४. शिष्यवृत्ती दर:- शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते इ. १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/-(वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्याध्यर्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वी व इ. ११ वी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)
सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचे मार्फत केले जाते.१५. अनधिकृततेबाबत इशारा –
शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही

आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०४.

NMMS
NMMS EXAM INFORMATION

NMMS EXAM INFORMATION

NMMS EXAMINATION Information Apply Eligibility Syllabus Scholarship Amount Paper Pattern MAT SAT Answer Key Result

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2024-2025


१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. ०७/०२/२०२५ रोजी परिषदेच्या

या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १८/०२/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष, अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही.
३) आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
४) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बानलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ४० % गुण मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ३२ % गुण मिळणे आवश्यक आहेत)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
दिनांक :- १४/०१/२०२५

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ अंतिम उत्तरसूची

MAT FINAL ANSWER KEY

IMG 20250114 212957

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
दिनांक :- ०१/०१/२०२४

NMMS ANSWER KEY PDF COPY LINK

महाराष्ट्र शासन
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना
NATIONAL MEANS CUM MERIT SCHOLARSHIP SCHEME Information
शिक्षण कार्यमंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, १७. डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे- ४११ ००१.
प्रस्तावना :-
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना सन २००७-०८ या वर्षापासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित (आई-वडिलांचे) रु.३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
परीक्षेचे आयोजन – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत केले जाते. इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या शिष्यवृत्ती निकषानुसार पात्र विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. सदर विद्याथ्यांना इयत्ता ७ वी मध्ये किमान ५५ टक्के गुण असावे. (SC, ST, VJ, NTB, NTC, NTD OBC, DBC यांना गुणामध्ये ५ टक्के सवलत). सदर परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराथी, तेलगु, सिंधी व कन्नड या माध्यमातून घेतली जाते. सदर परीक्षेचे शुल्क १०० रु व शाळा संलग्नता शुल्क २०० रु आकारले जाते.
परीक्षेचा अभ्यासक्रम – परीक्षेचा अभ्यासक्रम हा इ. ८ वी पर्यंतचा राज्यशासनाचा आहे.  
पेपर १ बौध्दिक क्षमता चाचणी (MAT)
पेपर २ शालेय विषयक क्षमता चाचणी (SAT) (सामान्य ज्ञान – ३५ गुण + सामाजिक शास्त्र ३५ गुण गणित २० गुण) दोन्ही पेपर साठी प्रत्येकी ९० गुण व वेळ ९० मिनीटे.
एन एम एम एस परीक्षेमधून राज्याला ठरवून दिलेल्या (११६८२) कोटयानुसार निवडलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत तयार केली जाते. शासन निर्णय क्र.२० ऑगस्ट, २०१८ पासून परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इ. ९ ते इ. १२ वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १०००/- प्रमाणे (वार्षिक रु.१२०००/-) शिष्यवृत्ती मिळते. सन २०१७-१८ पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्याने नवीन व नुतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने भरलेल्या अजांची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहीत मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर करणे आवश्यक आहे. www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या आहे. तसेच पात्र लाभाथ्र्यांना शिष्यवृत्तीचा लाभ Public Finance Management System PFMS मार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर परस्पर Direct Benefit Transfer (DBT) द्वारे जमा केली जाते.
उद्दिष्टे :
१. इयत्ता ८ वी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दीमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे.
२. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी.
३. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्याची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
शिष्यवृत्तीचे दर :-
इ. ९वी ते इ. १२वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १०००/- प्रमाणे (वार्षिक रु.१२०००/-) शिष्यवृत्ती
अर्ज करण्याची पध्दत :- आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या
www.mscepune.in व http://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
पात्रतेचे निकष / Eligibility Criteria:-
१. पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. २. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे.
३. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
४. इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.
५. इयत्ता १०वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास ०५ टक्के सुट.) इयत्ता ९वी मधून १०वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११वी मधून १२वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.  
६. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे. ७. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे.
८. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
९. विद्यार्थ्याकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.
१०. जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल.
११. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही.
१२. विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्यानंतर शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्यांचा दावा विचारात घेतला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे :-
१. सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
२. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे एन.एम.एम.एस. परीक्षेचे गुणपत्रक.
३. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गतवर्षाचे (इयत्ता ९वी, १०वी, ११वी) गुणपत्रक.
४. सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा रु. ३,५०,०००/- आतील उत्तपन्नाचा दाखला.
५. ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा (जातीचा) सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा दाखला
६. आधार कार्ड प्रत.
७. बैंक पासबुकची प्रत.
संपर्क :-
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना ) जिल्हा परिषद
२. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक
खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.
• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
•केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
विद्यार्थ्यांची निवड (Selection) :- विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
परीक्षेचे वेळापत्रक (EXAMINATION TIME TABLE) :- महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक
बृहन्मुंबई यांचे मार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेण्यात येते
एन एम एम एस परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असते
अ.क्र.विषयाचे नावएकूण गुणएकूण प्रश्नकालावधी  वेळ  पात्रता गुण (एकत्रित)  
०१बौध्दिक क्षमता चाचणी Mental Abilily Test (MAT)९०९०दीड तास (फक्त दृष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ)१०.३० ते १२.०० ४०%*
विश्रांती १२.३० ते १३.३०
०२शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test (SAT)९०९०दीड तास (फक्त दृष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ)१३.३० ते १५.००  
* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
परीक्षेसाठी विषय :- सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.
a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) : ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यतः इयत्ता ८ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण- ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण – ३५) ३. गणित (एकूण गुण – २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
> उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
a. सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
b. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण c. गणित २० गुण.
माध्यम :- प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वुर्तळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/ अपुरी / अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वुर्तळात नोंदविलेली/उत्तरे / चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/ व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
NMMS EXAM 22 Dec 2024 Answer Key
NMMS EXAM 2024 Tentative Answer Key MAT
Que NoAnsQue NoAnsQue NoAns
12413811
22421823
33434834
44443844
52452851
63464862
73474874
82483881
93492894
104504902
111513
123522
133533
144544
152553
164562
17357
183584
191592
202602
214614
223622
234634
242644
251654
262661
272671
284682
291694
303704
313714
323723
332732
341743
354751
362763
373772
383781
391792
404802
NMMS EXAM 2 Dec 2024 Tentative Answer Key SAT LINK

Leave a Comment

error: Content is protected !!