National Science Seminar
National Science Seminar
akhil bharatiya vidyarthi vidnyan melava 2026
All India Student Science Fair 2026
All India Student Science Conference 2026
National Science Seminar 2026
क्रमांक :- राविशिसं/प्राविप्रा/नाग./NSS/283/2026
दिनांक :-20.07.2026
प्रति,
१. मा. विभागिय शिक्षण उपसंचालक, (सर्व विभाग)
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
३. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, (पश्चिम / उत्तर / दक्षिण)
४., शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका
विषयः- अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2026 (National Science Seminar 2026)
संदर्भः – शिक्षणाधिकारी तथा प्रादेशिक समन्वयक रामन विज्ञान केंद्र नागपूर यांचे पत्र क्रमांकNO.RSCN/11014/ राविस 2026/07- दिनांक 11/07/2026.
उपरोक्त विषयांकित संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना व विषय प्राप्त झालेला आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील शासनमान्य सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांना व संबंधित शिक्षकांना सदर विषय व मार्गदर्शक सूचना कळवून प्रत्येक शासनमान्य शाळेतील इयत्ता ८वी ते १०वी पर्यंतचे विद्यार्थी या विज्ञान विषयक उपक्रमात सहभाग घेतील या बाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. प्रत्येक तालुक्यातून प्रथम-शाळास्तरावर नंतर तालुकास्तरावर सदर स्पर्धेचे आयोजन करणे बाबत आवश्यक पाठपुरावा करावा. जिल्हास्तरावरील स्पर्धा संपन्न झाल्यानंतर विहित काल मर्यादेत विभाग स्तरावर आयोजन करण्यात यावे. या उपक्रमास प्राधान्य देऊन आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्वरित या कार्यालयास सादर करावा.
मार्गदर्शक सूचना-
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कार्यकारणभाव समजून विश्लेषणात्मक विचारांची जागृती करणे, स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करून भावी वैज्ञानिकांना विचारांच्या आदान प्रधानाची संधी उपलब्ध करून देणे, देशात विखुरलेल्या प्रज्ञावान युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद कोलकत्ता दरवर्षी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे (National Science ‘Seminar) आयोजन करीत असते.
यावर्षी विज्ञान मेळाव्याचा विषय पुढील प्रमाणे आहे:-(National Science Seminar -2026)
अ) इंग्रजी:-Indian energy basket 2047: Prospects and challenges
ब) हिंदीः भारतीय ऊर्जा परिदृश्य 2047: संभावनाएं एवं चुनौतियां
क) मराठीः-भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047: भवितव्य (संधी) आणि आव्हाने स्पर्धेचे नियम व अटी पत्रात नमूद केलेल्या आहेत.
यावर्षी राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन 30 ऑक्टोबर 2026 संभावित
स्थळ नॅशनल सायन्स सेंटर दिल्ली येथे करण्यात आलेले असून आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात यावे.
अ.क्र. उपक्रमाचा स्तर संभाव्य कालावधी स्तरनिहाय निवड पात्र विद्यार्थी संख्या
अ.क्र. १ उपक्रमाचा स्तर तालुकास्तर
संभाव्य कालावधी १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
स्तरनिहाय निवड पात्र विद्यार्थी संख्या प्रत्येकी ०२ (जिल्ह्य करिता)
२ उपक्रमाचा स्तर जिल्हास्तर
संभाव्य कालावधी १६ ऑगस्ट ते ३१ऑगस्ट
स्तरनिहाय निवड पात्र विद्यार्थी संख्या प्रत्येकी ०२ (विभागाकरिता)
३ उपक्रमाचा स्तर विभागस्तर
संभाव्य कालावधी १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर
स्तरनिहाय निवड पात्र विद्यार्थी संख्या प्रत्येकी ०२ (राज्याकरिता)
४ उपक्रमाचा स्तर राज्यस्तर
संभाव्य कालावधी २० सप्टेंबर ते २४ सप्टेंबर
स्तरनिहाय निवड पात्र विद्यार्थी संख्या केवळ प्रथम क्रमांक विजेता-०१ (राष्ट्रीय स्तर करिता)
1 1. प्रथम प्रत्येक शाळा स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. एक उत्कृष्ट विद्यार्थी तालुकास्तरावर पाठवावा.
- तालुकास्तरावर दिनांक १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान एक दिवसाची स्पर्धा आयोजित करून प्रत्येक तालुका पातळीवरील गुणानुक्रमे येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात यावी. जिल्हास्तरावरील एक दिवसीय स्पर्धेचे आयोजन प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक- मुंबई यांनी दिनांक १६ ऑगस्ट ते ३१ऑगस्ट या दरम्यान करावे.
- प्रत्येक तालुक्यातून गुणानुक्रमे दोन (2) विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात यावी. तालुका व जिल्हास्तरावरील विहित नमुन्यात सांख्यिकीय माहितीसह अहवाल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना तसेच या कार्यालयास दिनांक ०१/०९/२०२६ पर्यंत सादर करावा.
- प्रत्येक शैक्षणिक विभागात दिनांक १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन शिक्षण उपसंचालक यांनी करून गुणानुक्रमे फक्त दोन (२) विद्यार्थ्यांची निवड करावी. संबंधित दोन विजेत्यांना राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात सहभागी राहण्याच्या सूचना संबंधित शाळांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक- मुंबई यांनी द्याव्यात. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड प्राप्त विद्यार्थ्यांची / विद्यार्थिनींची यादी पूर्ण नाव, शाळेचे नाव व भाषणाचे माध्यमासह या कार्यालयाकडे दिनांक १७/०९/२०२६पर्यंत मिळेल या बेताने ई-मेलने तात्काळ पाठवावी.
- विभागस्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थी / विद्यार्थिनींचे प्रत्येकी दोन पासपोर्ट साईज फोटो व भाषणाच्या तीन प्रती तसेच भाषण मराठी / हिंदीतून असल्यास त्यांची अंग्रेजी अनुवाद केलेल्या तीन प्रती राज्यस्तरावरील स्पर्धेचे वेळी सादर करण्याच्या सूचना संबंधी शाळेचे मार्गदर्शक शिक्षक व स्पर्धकाला द्याव्यात.
- राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये प्रत्येक विभागातून प्रथम व द्वितीय असे निवड झालेले दोन प्रमाणे आठ विभागातून एकूण 16 विद्यार्थी सहभागी करून घेतल्या जातील, यामधून राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी राज्यस्तरावरून गुणांनुक्रमे प्रथम येणाऱ्या एका विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
- राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी विज्ञान मेळावा 2026 चे आयोजन ३० ऑक्टोबर २०२६रोजी संभावित स्थळ नॅशनल सायन्स सेंटर, दिल्ली येथे करण्यात आली असून राज्यस्तरावरील एका विद्यार्थ्याला या संस्थेकडून तसे पत्र घेऊन त्या स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल. याबाबत लेखी सूचना राज्यस्तरीय स्पर्धेचे दिवशी देण्यात येईल.
- अधिक माहितीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी पुढील नमूद वेबसाईटवर संपर्क साधावा.
स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची मूल्यांकन खालील प्रमाणे करण्यात येईल. अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विज्ञान मेळावा 2026 नियम व अटी (तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विभागस्तरावरील स्पर्धेसाठी नियम व अटी खालील प्रमाणेच राहतील)
Website: www.vismuseum.gov.in
1) संयोजक :- राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर नागपूर.
2) मुख्य विषयः-
अ) इंग्रजी:- Indian energy basket 2047: Prospects and challenges
ब) हिंदी :- भारतीय ऊर्जा परिदृश्य 2047: संभावनाएं एवं चुनौतियां
क) मराठी :- भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047: भवितव्य (संधी) आणि आव्हाने
3) भाग कोण घेऊ शकतो?:-इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिकणारे विद्यार्थी (एका शाळेतून फक्त एक)
4) भाषा व भाषणात दिला जाणारा कालावधी व पद्धतीः विद्यार्थी स्वतः भाषण इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा इतर शासनमान्य भाषेतून देऊ शकतो. विद्यार्थ्याला भाषणासाठी केवळ सहा (6) मिनिटे वेळ देण्यात येईल. भाषण संपताच परीक्षक भाषणाचे विषयावर दोन मिनिटे पर्यंत तीन प्रश्न विचारतील. विद्यार्थ्यांनी त्यापैकी कमीत कमी दोन प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. स्पर्धकांसाठी भाषणापूर्वी लेखी आशय क्षमता चाचणी परीक्षेचे आयोजन केले जाईल. ही परीक्षा दहा गुणांची असून एकूण 20 प्रश्न दिलेले असतील.
5) श्रेणी पद्धतीः-
1) सादरीकरणातील वैज्ञानिक माहिती- 40 गुण
2) नाविन्यपूर्ण दृक साहित्य वापरासाठी – 15 गुण
‘3) भाषणाचा ओघ- 25 गुण
4) प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता
अ) लेखी आशय क्षमता चाचणी (20 प्रश्नांसाठी)- 10 गुण
ब) भाषणानंतर तोंडी विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरासाठी (तीन प्रश्न) – 10 गुण
एकूण – 100 गुण
6) चार्ट्स आणि पोस्टर्सः-
i) भाषणासाठी आवश्यक असलेले चार्ट्स व पोस्टर्स विद्यार्थ्यांनीच तयार केलेले असावेत. एका भागावरील चार्टस, पोस्टर्स हा एक चार्ट किंवा पोस्टर म्हणून गणण्यात येईल. भाषणाच्या वेळी विद्यार्थ्यास त्याचा स्वतः वापर करावा लागेल. सादरीकरणाच्या वेळी इतर कोणीही (पालक, शिक्षक आणि इतर मदतनीस) संबंधित स्पर्धकास मदत करणार नाही.
ii) सर्व चार्ट्स व पोस्टर्स एकाच आकाराचे 850 मिलिमीटर (रुंद) व 600 मिलिमीटर (उंच) असावेत ते दर्शनी ठिकाणी चिकटवलेले / टांगलेले असावेत. त्याचा दिनदर्शिकेप्रमाणे वापर करावा. किंवा
iii) स्लाईड 35 मिलिमीटर आकाराची असून प्लास्टिक फ्रेम मध्ये असावी किंवा
iv) ओव्हरहेड प्रोजेक्टर स्लाईड ए ४ आकाराच्या साईजची असावी. जेणेकरून त्याचे पूर्णतः प्रोजेक्शन होईल किंवा
v) संगणक स्लाईड ही अॅनिमेशन पॉप ऍप्स रोल ओव्हर इत्यादी गुणधर्म असलेली नसावी. एका वेळी एकच स्लाईड विचारात घेतली जाईल.
vi) दृकसाहित्य, स्लाईड, पोस्टर किंवा चार्टस जास्तीत जास्त पाच असावे त्यापेक्षा जास्त साहित्याचा विचार केला जाणार नाही.
7) त्रिमितीय प्रतिकृती. ऑडिओ. फिल्म्स याचा वापर सादरीकरणासाठी मान्य केला जाणार नाही.
8) पंच (Judges):-श्रेणीपद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी स्पर्धेच्या वेळी तीन पंच असावे. महाविद्यालयीन विभाग, विद्यापीठ, संशोधन विभाग, पर्यावरण संस्था यासारख्या शैक्षणिक संस्था मधील विषयाशी संबंधित मान्यवर व्यक्तींना शक्यतो पंचाचे काम सोपवावे. सहभागी शाळेतील /कनिष्ठ महाविद्यालयातील / संस्थेतील शिक्षकांची पंच म्हणून निवड करू नये.
9) मेळ्याव्यातील भाषणेः एका दिवशीच्या कालावधीत 40 विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची भाषण असू नये.
10) गुणवत्ताक्रमः-नियम क्र. 4,5,6 मध्ये दिलेल्या गुणविभाजन व निकषानुसार गुणवत्ता यादी तयार करावी. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. गुणवत्ता यादीत प्रत्येक क्रमांकावर एक आणि फक्त एकच स्पर्धक विद्यार्थी असावा.
11) राज्यस्तरीय पारितोषिके प्रथम पारितोषिक (फक्त एक) रुपये 5000/-उत्तेजनार्थ पारितोषिक (फक्त सहा) रुपये 3000/-
12) राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके-
1) गुणानुक्रमे फक्त एक दरमहा रुपये 2000/- दोन वर्षाकरिता एन.सी.एस.एम शिष्यवृत्ती.
2) विशेष पारितोषिके एकूण गुणानुक्रमे 9 दरमहा रुपये 1000/- 2 वर्षाकरिता एन.सी.एस.एम शिष्यवृत्ती.
3) सहभागी विद्यार्थ्यांना विज्ञान पुस्तके व साहित्य दिले जाईल.
13) राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी विज्ञान मेळावा दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजीसंभावित स्थळ नॅशनल सायन्स सेंटर दिल्ली येथे आयोजित करण्यात येईल.
‘
14) विशेष सूचनाः-विषय सादरीकरणाच्या वेळी कोणत्याही शाळेतील शिक्षक, मदतनीस यांना सहभागी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी व्यासपीठावर परवानगी देण्यात येणार नाही. यात दिव्यांग विद्यार्थी बाबत अपवाद असेल.
राष्ट्रीय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेतून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या एका विद्यार्थ्यास भाग घेता येईल. वरील ठिकाणी फक्त संबंधित एका शिक्षकाला स्पर्धकासोबत जाता येईल. राष्ट्रीय स्पर्धाकरिता निवड प्राप्त विद्यार्थी व शिक्षकाचा येण्या-जाण्याचा फक्त प्रवास खर्च (बस किंवा द्वितीय श्रेणी रेल्वे भाडे) आयोजकाकडून संबंधित ठिकाणी देण्यात येईल.
राज्यस्तरावर सहभागी विद्यार्थी (बस किंवा द्वितीय श्रेणी रेल्वे भाडे प्रवास भाडे) राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर कडून देण्यात येईल तथापि शिक्षकांचा प्रवास व दैनिक भत्ता खर्च संबंधित शाळांनी त्यांच्या आस्थापने वरून करावा टीप:-राज्यस्तरीय सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांचे सोबत शाळेच्या मुख्याध्यापकांची प्रमाणित केलेली जन्मतारीख पुरावा व एसटी बस किंवा रेल्वे द्वितीय श्रेणी प्रवास भाड्याचे तिकिटे सोबत आणावे.
सोबतः-अधिक माहितीसाठी नॅशनल सायन्स सेमिनार 2026 माहिती पत्र.
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रवी नगर नागपूर

