Maratha Aarakshan Update

Maratha Aarakshan Update
Maratha Reservation Update
मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखालील गठीत समितीस मुदतवाढ देण्याबाबत…
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक : मआसु- २०२३/प्र.क्र.०३ (भाग-१)/आरक्षण-५, मंत्रालय, मुंबई
दिनांक : १२ फेब्रुवारी, २०२५
संदर्भ :
१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. मआसु-२०२३/प्र.क्र.३/आरक्षण-५ (१६-क), दि.०७.०९.२०२३
२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.मआसु-२०२३/प्र.क्र.३/आरक्षण-५ (१६-क), दि.०३.११.२०२३
३. समक्रमांकित दि. ३० जुलै, २०२४ रोजीचा शासन निर्णय
शासन निर्णय
मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी संदर्भ क्र.१ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. सदर समितीची कार्यकक्षा संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आली आहे. संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये सदर समितीस दि.३१ डिसेंबर, २०२४ पर्यत देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आली असल्याने सदर समितीस दि. ३० जून, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
२. हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट व बॉम्बे गॅझेट लागू करण्याबाबत मा. न्यायमूर्ती शिंदे (निवृत्त) समितीकडून अभ्यास करण्यात येईल.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०२१२१५४६३४६१०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
उप सचिव, महाराष्ट्र शासन
