NCTE Reestablish One Year B Ed M Ed Courses बी एड एम एड अभ्यासक्रम आता एक वर्षाचा

NCTE Reestablish One Year B Ed M Ed Courses

image 35
NCTE Reestablish One Year B Ed M Ed Courses

NCTE Reestablish One Year B Ed M Ed Courses

NCTE Reestablish One Year B Ed M Ed Programmes

National Council for Teacher Education is set to reintroduce the one year Bachelor of Education (B.Ed.) and Master of Education (M.Ed.) programmes, beginning with the 2026-27 Academic Year

नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन 2026-27 शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या एक वर्षाच्या बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी.एड.) आणि मास्टर ऑफ एज्युकेशन (एम.एड.) कार्यक्रम पुन्हा सुरू करणार आहे.

बी.एड. एम. एड अभ्यासक्रम आता एक वर्षाचा
२०२६-२७ पासून बदल लागू

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एन सी टी ई चा निर्णय ) इ एक वर्षाचे बी. एड आणि एम. एड कार्यक्रम पुनःसंचवित करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळजवळ एक दशकानंतर या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षांपर्यंत वाढवला जाणार आहे. हा बदल पुढील वर्षी माणजेच २०२६-२७ पासून लागू होईल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे विद्यार्थी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतील, त्यांनाच एक वर्षाच्या बी.एड. अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो.

अनेक दशकांपासून एक वर्ष चालणाऱ्या बी.एड. आणि एम.एड. कार्यक्रमांना २०१४ मध्ये एनसीटीईने नियमावलीअंतर्गत दोन वर्षांपर्यंत वाढविले होते. मात्र, आत्ता त्यानंतर बदललेल्या नव्या अभ्यासक्रमा बाबत मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षाचा बी.एड. आणि एम.एड. अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येत्त असला तरी, दोन वर्षांचा अभ्यासक्रम रह केला जात आहे. एक वर्षाचा एम. एड. अभ्यासक्रम पूर्णवेळ असेल, तर शिक्षक आणि शिक्षण प्रशासकांसारख्या काम करणाऱ्यांना दोन वर्षांचा अर्धवेळ अभ्यासक्रम दिला जाईल. मसुद्याच्या नियमांनुसार, एक वर्षाच्या बी.एड कार्यक्रमासाठी, ज्यांनी चार वर्षांचा पदवी किंवा पदव्युत्तर कार्यक्रम पूर्ण केला आहे. तेच पात्र असतील.

तीन वर्षांचा पदवी कार्यक्रम पूर्ण केलेल्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध राहणार नाही, अशा विद्याथ्यांसाठी दोन वर्षांचा बी.एड कार्यक्रम सुरू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आयटीईपी हा चार वर्षांचा कार्यक्रम (बीए बी.एड. बी.एस्सी. बी.एड./बी.कॉम. बी.एड.) २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून ५७ संस्थांमध्ये पायलट पद्धतीने सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम १२ वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. २०२५-२६ सत्रापासून आयटीईपी आता पायलट पद्धतीने सुरू राहणार नाही आणि शिक्षक शिक्षणाचा नियमित कार्यक्रम असेल. म्हणजेच या वर्षापासून संस्था हा अभ्यासक्रम देण्यासाठी मान्यता मिळवू शकतात. २०२५-२६ सत्रापासून आयटीईपी योग, शारीरिक शिक्षण, संस्कृत शिक्षण आणि कला शिक्षण हे चार विशेष आयटीईपी कार्यक्रम देखील सुरू केले जातील, असे सांगितले जात आहे. २०१४ च्या नियमावलीत चार वर्षांच्या बीए, बी. एस्सी. बी.एड.ची तरतूद होती, ती आता आयटीईपीमध्ये रूपांतरित झाली आहे.

तीन प्रकारचे बी.एड.
बारावीनंतर जे अॅडमिशन घेणार आहेत, त्यांनी एकत्मिक शिक्षण शिक्षक कार्यक्रम (आयटीईपी) साठी प्रवेश घेतला त्तर त्यांची चार वर्षांची पदवी आणि बी. एड. एकत्रित होईल, जर एखाद्याने चार वर्षांचा पदवी कोर्स पूर्ण केला, तर त्याला एक वर्षाचे बी. एड. करता येईल. तसेच, तीन वर्षांचा पदवी कोर्स करणाऱ्यास दोन वर्षांचे बी. एड. करावा लागेल. हे तिन्ही कार्यक्रम वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!