१० ऑक्टोबर मानसिक आरोग्य दिन साजरा करणे बाबत Manasik Aarogya Din

Manasik Aarogya Din

Manasik Aarogya Din

Mental Health Day

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद (सर्व)
५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व)

    राज्यातील  मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील  सर्व अधिकारी यांच्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी १० ऑक्टोबर मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येत आहे .त्यानुषंगाने  मानसशास्त्रातील तज्ञांमार्फत शनिवार दि.१०.१०.२०२६ रोजी ऑनलाईन सत्राचे आयोजन  करण्यात  येत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे याकार्यालयाच्या *You Tube Channel* वरुन सदर ऑनलाईन सत्र प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्यात  येत आहे.

         मार्गदर्शक
१) साक्षी उमाळे, एम.ए.(अप्लाइड सायकॉलॉजी तज्ञ)
२) केतकी वेंगसरकर, सायकॉलाजीस्ट
३) पूजा आर्या, एम.ए. (काउन्सिलिंग तज्ञ)

विषय- १० ऑक्टोबर मानसिक आरोग्य दिन साजरा करणे बाबत.

दि: १०  ऑक्टोबर २०२६

सकाळी ११ :००  ते दुपारी ०१:००

राज्यातील सर्व  शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व  शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी यांनी सदर ऑनलाईन सत्राचा लाभ घ्यावा. व सत्रातील  उपस्थिती खाली  देण्यात आलेल्या लिंकमध्ये नोंदवावी.        

https://forms.gle/s9o87rii8JswoNPbA

(मंगेश जोशी भा.प्र.से.)
        संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

Leave a Comment

error: Content is protected !!