आदेश राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी प्रतिज्ञा मोहिमेबाबत दि ०२ ऑगस्ट २०२६ रोजी “विकसित भारत २०४७ साठी नशामुक्त युवा” कार्यक्रम आयोजित करण्याबाबत Nashamukt Yuva Karyakram नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत विशेष अभियान

Nashamukt Yuva Karyakram

Nashamukt Yuva Karyakram

Vikasit Bharat 2047 Sathi Nashamukt Yuva Karyakram

Drug-Free Youth for a Developed India 2047

Drug-Free Youth for a Developed India a special campaign

nasha mukta yuva for vikasit bharat he vishesh abhiyan

नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत हे विशेष अभियान

Dinank 02 august 2026 roji “vikasit bharat 2047 sathi nashamukt yuva” karyakram aayojit karnyababat

Date Regarding organizing the program “Drug-Free Youth for a Developed India 2047” on 02 August 2026

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

जा.क्र. प्राशिसं/संकीर्ण/स्वा.दि/तां.मु.श./

दि. दिनांकित स्वाक्षरी

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) विभाग
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा, सर्व
३. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका (उ/द/प)
४. प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप सर्व

विषय :- - राज्यभरात राष्ट्रीय स्वतंत्रता दिना निमित्त "तंबाखू मुक्त शपथ" घेणेबाबत..

संदर्भ:- आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांचे पत्र जा.क्र. NQAS/आआसे/तंबाखू मुक्त शपथ घेणेबाबत /१५५-२३८/२६, दि. १३/०८/२०२६

उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये कळविलेनुसार, राज्यभरात स्वतंत्रता दिनानिमित्त सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींमध्ये “तंबाखू मुक्त शपथ” घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने आपल्यास्तरावरुन खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी :

१. सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये स्वतंत्रता दिन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत माहिती देऊन “तंबाखू मुक्त शपथ” घ्यावी. (प्रत संलग्न)

२. ग्रामपंचायत व ग्रामसभांमध्ये ASHA/ANM/MO यांच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीबाबत व्याख्याने आयोजित करून ग्रामस्थांना शपथ घ्यायला प्रवृत्त करावे.

३. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाने आपला परिसर धूम्रपान मुक्त (तंबाखू मुक्त) घोषित करून त्याबाबतचे घोषणापत्र जाहीर करावे.

४. “धूरमुक्त किंवा तंबाखूमुक्त गाव” ही मोहीम राबविण्यासाठी स्थानिक संस्थांशी समन्वय साधावा.

५. नियमित शाळा भेटीमध्ये याचा आढावा घेण्यात यावा.

आपल्या अधिनस्त सर्व शाळांना याबाबत आपल्या स्तरावरुन आवश्यक अतिरिक्त सूचना देऊन शाळांना देऊन सदर उपक्रममाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.

(पुष्पावती 14.8.226. पाटील)

शिक्षण उपसंचालक
प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर

१. मा. आयुक्त, आरोग्य सेवा व अभियोन संचालक, राष्ट्रीय अभियान, मुंबई
२. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.

“तंबाखू मुक्तीची शपथ “

   "शपथ"

तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परीणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर, या व्यसनांपासून. दूर राहण्याचा संकल्प करीत आहे.

माझे कार्यालय, माझे घर, आणि माझा परिसर तंबाखूमुक्त रहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा, यासाठी मी प्रयत्न करेन.

भारत सरकारच्या, २००३ च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त तसेच ई सिगारेटमुक्त करेन.

मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि, माझा महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याचा प्रयत्न करेन

द्या तंबाखू व ई-सिगारेटला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्विकार

__________ ALSO READ _______

राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी प्रतिज्ञा मोहिमेबाबत…

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकिर्ण-२०२६/प्र.क्र.१७१/एस.डी.-४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२

दिनांक :-०४ ऑगस्ट, २०२६.

संदर्भ :- सचिव, मेडिकल विंग (RERF) ब्रह्मा कुमारीज यांचे दिनांक ३०.०७.२०२६ रोजीचे प्राप्त पत्र.

शासन परिपत्रक:-

भारत सरकारसोबत नशा मुक्त भारत अभियानांतर्गत झालेल्या सामंजस्य कराराच्या (MoU) अनुषंगाने, मेडिकल विंग (Rajayoga Education & Research Foundation) यांच्यामार्फत दिनांक ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये देशव्यापी “नशा मुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा” आयोजित करत आहे, ज्याचा उद्देश ४ कोटी नागरिकांना – विशेषतः युवक/युवती आणि विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विरोधात प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करणे असा आहे.

विद्यार्थी आणि युवकांना ही प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करून, आपण एकत्रितपणे व्यसने, तणाव आणि जीवनशैलीतील आजारांपासून मुक्त समाज घडवू शकतो. एकत्रितपणे “Say No to Drugs, Say Yes to Life” (व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा) या संदेशासह राज्यातील या मोहीम कालावधीत प्रतिज्ञा आणि जनजागृती उपक्रमांमध्ये सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभागी होण्याकरिता आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात.

२. सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी शासनास सादर करावा.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०८०४१५२१०५७२४९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, ANIRUDDHA AVINASH

KULKARNI

(अनिरूद्ध कुलकर्णी) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

परिपत्रक पीडीएफ लींक

आदेश राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी प्रतिज्ञा मोहिमेबाबत दि ०२ ऑगस्ट २०२६ रोजी "विकसित भारत २०४७ साठी नशामुक्त युवा" कार्यक्रम आयोजित करण्याबाबत Nashamukt Yuva Karyakram नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत विशेष अभियान
आदेश राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी प्रतिज्ञा मोहिमेबाबत दि ०२ ऑगस्ट २०२६ रोजी “विकसित भारत २०४७ साठी नशामुक्त युवा” कार्यक्रम आयोजित करण्याबाबत Nashamukt Yuva Karyakram नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत विशेष अभियान

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, मा. मंत्री, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली व मा. केंद्रीय सचिव युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दि. ०२ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरात “नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.० ” कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दि. ०२ ऑगस्ट २०२६ रोजी मा. पंतप्रधान हे देशभरातील युवकांशी दूरदृश्यप्रणाली द्वारे संवाद साधणार आहेत.

शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य सोपवण्याबाबत शासन निर्णयः-दिनांक :- २८ जुलै, २०२६. वाचा या ओळीला स्पर्श करून

भारत सरकारद्वारे देशव्यापी “नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत” हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुण पिढीला व्यसनमुक्त करणे आणि त्यांना या अभियानात सक्रिय सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माय भारत पोर्टलवर जाऊन व्यसनमुक्ती अभियानांतर्गत नाव नोंदणी करावी. तसेच संकेतस्थळावर दिलेली प्रतिज्ञा घ्यावी. प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर ई प्रमाणपत्र डाऊनलोड करावे. अभियानांतर्गत नाव नोंदणी, प्रतिज्ञा घेणे व प्रमाणपत्र डाऊनलोड करणाऱ्या पायऱ्या खालील प्रमाणे :

Steps to take the pledge:

  1. Open the MY Bharat Portal.
  2. Click on the Nasha Mukt Yuva Bharat pop

🙌 One Pledge. One Mission. A Drug-Free India. 🇮🇳

Take the Nasha Mukt Pledge and join millions of youth committed to building a Nasha Mukt & Viksit Bharat.

🏆 Get your Pledge Certificate after taking the pledge.

Click below and take the pledge today!Together, every pledge brings us one step closer to a healthier and stronger India.

Together, every pledge brings us one step closer to a healthier and stronger India.

or the Nasha Mukt Bharat banner on the home page. You will be redirected to the Nasha Mukt Pledge page.

  1. Fill in the following details:
    Name
    Mobile Number / Email ID
    Date of Birth
    State
    District
  2. Click on “I Pledge” to take the pledge and download the certificate दि.०२ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना घेण्यास सांगावी व त्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करून घ्यावे.

डॉ. महेश पालकर,
संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे
प्रति,
प्राचार्य / मुख्याध्यापक,(सर्व)
सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाराष्ट्र राज्य.

जागतिक तंबाखू विरोधी दिन प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

10 thoughts on “आदेश राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी प्रतिज्ञा मोहिमेबाबत दि ०२ ऑगस्ट २०२६ रोजी “विकसित भारत २०४७ साठी नशामुक्त युवा” कार्यक्रम आयोजित करण्याबाबत Nashamukt Yuva Karyakram नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत विशेष अभियान”

  1. 𝗧𝗵𝗮𝗻𝗸𝘀 𝗳𝗼𝗿 𝘆𝗼𝘂𝗿 𝗴𝗼𝗼𝗱 𝗰𝗼𝗺𝗲𝗻𝘁
    👍👍

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!