Std 4th 7th Scholarship Final Result Merit List

Std 4th 7th Scholarship Final Result Merit List
Std 4th 7th Scholarship Antim Nikal Guvatta Yadi Link
शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व 7 वी परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या जाहीर
इयत्ता चवथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल गुणवत्ता यादी पीडीएफ लिंक बाबत
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महत्त्वाचे
जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2026/3358
दिनांक :- 10/08/2026.
प्रसिध्दीपत्रक
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी), दि. 26 एप्रिल, 2026 अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. 26 एप्रिल, 2026 रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या सोमवार दि. 10 ऑगस्ट, 2026 रोजी सा.05.00 वाजता परिषदेच्या
निकाल लिंक
व
या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेची सांख्यिकीय माहिती खालीलप्रमाणे आहे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
अंतिम निकाल कधी लागेल व गुणवत्ता यादी कधी घोषित होईल प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी / उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ७ वी – २०२६
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी / उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ७ वी – २०२६
Primary Scholarship Examination Std. 4ᵗʰ (PSE)
Upper Primary Scholarship Examination Std. 7ᵗʰ (UPS) – 2026
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत
(दुसरा व चौथा मजला) सर्व्हे नं. 832 ए, शिवाजीनगर, पुणे – 411 004.
प्रसिद्धीपत्रक
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)
दि. २६ एप्रिल, २०२६
अंतरिम निकाल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवार, दि. २५ जुलै, २०२६ रोजी
व
या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २५/०७/२०२६ ते ०२/०८/२०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. ०२/०८/२०२६ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. ०२/०८/२०२६ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे उब प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ७ वी व ७ वी – २०२६
गुणवत्ता यादी 4th Standard
राज्यस्तरीय / Statewise
जिल्हास्तरीय / Districtwise
तालुकास्तरीय / Talukawise
गुणवत्ता यादी 7th Standard
राज्यस्तरीय / Statewise
जिल्हास्तरीय / Districtwise
तालुकास्तरीय / Talukawise
Upper Primary Scholarship Examination Std. 7th (UPS) – 2026
TALUKAWISE MERIT LIST
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी तालुका नुसार गुणवत्ता यादी पीडीएफ लींक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी – २०२६
Primary Scholarship Examination Std. 4th (PSE)-2026
TALUKAWISE MERIT LIST
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी तालुका नुसार गुणवत्ता यादी पीडीएफ लींक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 7 वी) दि. 26 एप्रिल, 2026 राज्यस्तरीय गुणवत्ता यादी ★
इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ता यादी पीडीएफ लीक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 4 थी) दि. 26 एप्रिल, 2026 राज्यस्तरीय गुणवत्ता यादी ★
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ता यादी पीडीएफ लिंक
📌गुणपडताळणीची विहित मुदत संपल्यानंतर राज्य परीक्षा परिषद पुणे कडून अधिकृत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर होईल
📢 सर्वात अगोदर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यासाठीच तयार करण्यात आलेल्या आपल्या समाज माध्यमांमध्ये खालील लिंकला स्पर्श करून सामील व्हा
(महेश चोथे)
आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४.
दिनांक :- २५/०७/२०२६.
ठिकाण :- पुणे.
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2026/3162
महत्त्वाचे / कालमर्यादित
दिनांक :- 27/07/2026.
प्रति,
- शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका.
- शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
- शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (दक्षिण पश्चिम / उत्तर)
- प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व.
- गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व.
विषय :- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दि. 26 एप्रिल, 2026 मधील शाळांच्या अभ्यासक्रम व क्षेत्रात तफावत असलेबाबत…
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, सोबत जोडलेल्या यादीतील आपल्या अधिनस्त शाळांनी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) एप्रिल 2026 साठी शाळा नोंदणी करताना नोंदविलेले अभ्यासक्रम व क्षेत्र आणि शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी व इ. 8 वी फेब्रुवारी 2026 साठी नोंदणी करताना नोंदविलेले क्षेत्र (ग्रामीण शहरी) व अभ्यासक्रम (MSCERT / CBSE) यात तफावत आढळून येत आहे. सदर तफावतीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी एप्रिल 2026 च्या गुणवत्ता याद्या तयार करताना अडचणी निर्माण होत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी एप्रिल 2026 च्या अंतिम निकालाच्या अनुषंगाने गुणवत्ता याद्यांचे काम सुरू असून सदर सर्व शाळांच्या क्षेत्र (ग्रामीण शहरी) व अभ्यासक्रम (MSCERT / CBSE /ICSE) बाबत आपल्या स्तरावर संबंधित शाळेशी संपर्क करून खात्री करावी व त्याबाबतचा अहवाल PSE UPS EO / BEO REMARK FOR 2026 या रकान्यात नोंदवून दि. 02/08/2026 रोजीपर्यंत mscescholarship@gmail.com या ईमेलवर परीक्षा परिषदेस सादर करावा.
सदर प्रकरणी आपला अहवाल विहीत वेळेत प्राप्त झाल्यास शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी एप्रिल 2026 साठी शाळा नोंदणी करताना नोंदविलेली माहिती योग्य असल्याचे ग्राह्य धरून अंतिम निकाल व गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तसेच यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहून त्याबाबत भविष्यात काही प्रकरण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जाबाबदारी आपली राहील याची गांभिर्याने नोंद घ्यावी.
(डॉ. नंदकुमार बेडसे, भा.प्र.से.) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04.
Final result and merit list published
Primary Scholarship Examination (4th standard) and Upper Primary Scholarship Examination (7th standard)
prathamik shishyavrutti pariksha (Iytta 4 thi) v uccha prathamik shishyavrutti pariksha (Iytta 7 vi)
Shishyavrutti Pariksha Iytta 4 thi v Iytta 7 vi antim nikal v gunavatta yadi
Scholarship Examination (4th) and 7th Final Result and Merit List
Scholarship Exam 4th 7th Final Result Merit List
Std 4th 7th Scholarship Final Result Link Merit List Pdf
Iytta Chavthi Satvi shishyavrutti pariksha 7th Antim Nikal Link Gunvatta Yadi Pdf
Website: www.mscepune.in
Email: mscescholarship@gmail.com
दूरध्वनी क्र. 020-29709617
सर्वसाधारण गुणवत्ता यादी सामान्य गुणवत्ता यादी पीडीएफ लिंक
इयत्ता चौथी सातवी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी सर्वसाधारण गुणवत्ता यादी पीडीएफ अंतिम निकाल घोषित लिंक
सामान्य गुणवत्ता यादी पीडीएफ
Scholarship Exam General Merit List PDF Link
shishyavrutti pariksha sarvsadharan gunavatta yadi pdf link
shishyavrutti pariksha samanya gunavatta yadi pdflink
