सन २०२६-२०२७ सत्रातील कब-बुलबुल, स्काऊट गाईड युनिट नोंदणी करण्याबाबत Kab Bulbul Scout Guide

Kab Bulbul Scout Guide

Kab Bulbul Scout Guide

Kab bulbul Scout Guide Pathak Nondani Link

san 2026-2027 satratil kab-bulbul, scout guide unit nondani karanyababat.

registration of Cub-Bulbul, Scout Guide squad

Regarding registration of Cub-Bulbul, Scout Guide units for the year 2026-2027 session.

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

विषय :- सन २०२६-२०२७ सत्रातील कब-बुलबुल, स्काऊट गाईड युनिट नोंदणी करण्याबाबत.

संदर्भ :- १. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस्, मुंबई भा. स्का. गा./प्रशासन/का-०१/२०२६-२०२७/५५० / दि.०९/०६/२०२६.

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः एसएसए-१२२०/ प्र.क्र.१५४/एस.डी.-३/दि.२९ मे २०२६

उपरोक्त संदर्भिय पत्र क्रमांक १ अन्वये, सन २०२६-२०२७ या सत्रात कब बुलबुल व स्काऊट गाईड पथक नोंदणी करणेबाबत कळविलेले आहे. तसेच संदर्भिय पत्र क्रमांक २ अन्वये, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय
क्रमांकः एसएसए-१२२०/प्र.क्र.१५४/एस.डी.-३/ दि.२९ मे २०२६ नुसार मोफत गणवेश अंतर्गत मुद्दा क्रमांक १२. नुसार एक गणवेश प्राधान्यक्रमाने स्काऊट गाईड विषयास अनुरुप असावा असे नमूद आहे. त्याच अनुषंगाने आपल्या शाळेमध्ये कब- बुलबुल, स्काऊट गाईड या पथकांची नोंदणी करणे आवश्यक आहे.

तरी सोबत दिलेल्या नमुन्यात सदर नोंदणी फॉर्म तीन प्रतीत भरुन दि. १५ ऑगस्ट, २०२६ पूर्वी नोंदणी शुल्कासह स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालयामध्ये सादर करुन नोंदणी केल्याची पावती घ्यावी.

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस्, राज्य कार्यालयाने ऑनलाईन पध्दतीने युनिट नोंदणी करणे अनिवार्य केलेले आहे. ऑफलाईन नोंदणी नंतर जिल्हा कार्यालयामार्फत शाळेला व शिक्षकांना युनिट नोंदणीचा युजर आय. डीं. व पासवर्ड दिला जाईल. त्यानंतर आपण
🌐👇

या वेबसाईट वर लॉगइन करून आपली ऑनलाईन युनिट नोंदणी पूर्ण करावयाचे आहे. ऑनलाईन वैयक्तिक नोंदणी पूर्ण होऊन युनिक आय. डी. प्राप्त होत नाही तोपर्यत सदर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तथा आंतराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही याची नोंद घ्यावी.

वरील संदर्भीय पत्रानुसार खालीलप्रमाणे नोंदणी शुल्क आकारलेली आहे.

  नोंदणी व प्रमाणपत्राबाबत माहिती.

अ.क्र पथक नोंदणी तपशिल नोंदणी शुल्क

१. (कब- मुले) (बुलबुल- मुली) वर्ग १ ते ४ प्रत्येकी विद्यार्थ्यांमागे – १३/- रुपये

२. (स्काऊट-मुल) (गाईड-मुली) वर्ग ५ ते १० प्रत्येकी विद्यार्थ्यांमागे – २०/- रुपये

३. शिक्षक / शिक्षिका प्रत्येकी (युनिट लीडर) – ७०/- रुपये

४. शाळा सभासद शुल्क – १५१/- रुपये

५. महाराष्ट्र राज्य स्का. गा. नियतकालिक (मासिक) वार्षिक शुल्क – १००/- रुपये

इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळांनी इयत्ता १ ली मध्ये कब / बुलबुल यांची नोंदणी करावी. इयत्ता २ री व ३ री मध्ये त्या पथकांची पुननोंदणी करावी. एका पथकाची सलग ३ वर्षे नोंदणी असणे आवश्यक आहे कारण ३ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा कार्यालयाकडून तृतीय चरण / सुवर्ण पंख हे प्रमाणपत्र देण्यात येतात. तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर राज्यस्तरीय चतुर्थ चरण/ हिरकपंख या परीक्षेरीता कब / बुलबुल पात्र ठरतात या परीक्षेला बसविण्याकरीता सदर युनिट लीडर यांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.

इयत्ता ५ ते १० वी पर्यंतच्या शाळांनी इयत्ता ५ वी व ८ वी मध्ये स्काऊट गाईड यांची नोंदणी करावी. इयत्ता ६, वी ७ वी व ९ वी, १० वी मध्ये त्या पथकांची पुननोंदणी करावी. एका पथकाची सलग ३ वर्षे नोंदणी असणे आवश्यक आहे कारण ३ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन प्रगतीपट भरल्यानंतर जिल्हा कार्यालयाकडून तृतीय सोपान व १० वी मध्ये श्रेणी प्रमाणपत्र देण्यात येतात. तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर राज्यस्तरीय राज्यपुरस्कार परीक्षेकरीता स्काऊट / गाईड पात्र ठरतात या परीक्षेला बसविण्याकरीता सदर युनिट लीडर यांचे प्रगत प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.

वार्षिक नियोजन : सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी स्काऊट गाईड कब-बुलबुल यांना द्यावयाच्या शिक्षणाचे वार्षिक नियोजन युनिट लीडर यांनी करावे. त्यामध्ये अभ्यासक्रम, खरी कमाई, वृक्षारोपण, राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत कुष्ठरोग-निर्मुलन, साक्षरता अभियान, पल्स पोलिओ, एडस् विषयी जनजागृती, अंधश्रध्दा निर्मुलन, शिबिरे, दि.२२ फेब्रुवारी चिंतनदिन, महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी इत्यादी कार्यक्रमाचे शिस्तबध्द नियोजन करावे. कार्यक्रमाचा अहवाल छायाचित्रासह जिल्हा कार्यालयाकडे पाठवावे. नियतकालीकात प्रसिध्दी देता येईल.

समुदाय विकास कार्यक्रम: सन २०२६-२०२७ या सत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन, कुष्ठरोग दूरीकरण, व्यसन मुक्त जीवन, सुरक्षित रस्ता वाहतूक जाणीव जागृती, एड्स जनजागृती रॅली, सॅनिटेशन प्रमोटर, माता-बालक आरोग्य संतुलीत आहार जनजागृती, पाणी अडवा पाणी जिरवा, नेत्रदान जाणीव जागृती, पॉलीथीन बॅग थर्माकोल प्लास्टिक वस्तुंचा वापर न करणे, बेटी पढाव (लेक वाचवा अभियान) आपत्कालिन व्यवस्थापनमध्ये सहभागी होण्याची जाणीव, पल्स पोलिओ अभियान, वन्यजीव संरक्षण, ओ.आर.टी., रक्तदान करणे, एक दिवसीय निसर्गनिवास शिबिर घेणे, अवयवदान काळाची गरज, रुग्णालयात फळ वाटप करणे, गरजूंना अन्नदान करणे, रक्षाबंधन कार्यक्रम, जागतिक योगा दिन साजरा करणे, वृक्षारोपण करणे आदि उपक्रम शाळास्तरावर राबविणे व त्याचा अहवाल भंडारा जिल्हा कार्यालय येथे पाठविणे.

स्वच्छ भारत व ग्राम स्वच्छता अभियान: शाळानिहाय बसस्थानक, रस्ता, दवाखाना, धार्मिकं स्थळ, उद्यान, नदी स्वच्छता माहीम राबवावी तसेच छोटेसे गाव दत्तक घेऊन ग्रामस्वच्छता अभियान राबविणे व त्याचा अहवाल भंडारा जिल्हा कार्यालय येथे पाठविणे.

स्काऊट गाईड गीतमंच: प्रत्येक शाळेमध्ये स्काऊट गाईड गीतमंचाची स्थापना करून देशभक्तीपर गीत गायन करून जनजागृती करावी.

युनिट नोंदणी करुन पावती व नाहरकत प्रमाणपत्र माहे सप्टेंबर, २०२६ च्या पगार बिलाला झेरॉक्स प्रत जोडून अधीक्षक, वेतन पथक येथे सादर करावे.

अधिक माहिती करीता आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा संघटक (स्का) व जिल्हा संघटक (गा.) भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय यांच्याशी संपर्क करावा.

प्रति,
मुख्याध्यापक, सर्व खाजगी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक / उच्च माध्यमिक / जि.प./ न.प./ आश्रम शाळा अनुदानित व विना अनुदानित / मराठी, उर्दु, इंग्रजी माध्यम शाळा व सर्व सी. बी. एस. ई संलग्नीत शाळा,
सर्व जिल्हा

Leave a Comment

error: Content is protected !!