Iyatta 11 Vi Tukadimanyata
Iyatta 11 Vi Tukadimanyata
Iyatta Akravi Vi Tukadimanyata v shakha manyatechya prastanvababat
Regarding proposals for Class 11 division approval and stream approval
Regarding proposals for Standard 11th division approval and stream approval Online portal link
क्र.शाळा व्यव.एस-३/तु.शा./२०२६/
(जावक क्र. वर उजव्या बाजूस असून दिनांक स्वाक्षरीखाली नमूद प्रमाणे)
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक,
सर्व विभाग.
विषयः इ.११ वी तुकडीमान्यता व शाखा मान्यतेच्या प्रस्तांवाबाबत.
संदर्भ: १) शासन परिपत्रक क्रमांक-MSC-२१/१/२०२६-MSC-(SM-५) दि. ३०/०९/२०२६.
२) शासन पत्र क्रमांक १०४६३२१५/२०२६/एसएम-५ दि. २२/०६/२०२६
उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रे कृपया पहावित. मा. आयुक्त (शिक्षण) यांना उद्देशून लिहिलेले संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शाळांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नव्याने तुकडी मान्यता देणे / शाखांना मान्यता देणेबाबतचे अधिकार मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्याकडे होते परंतु, शासन परिपत्रक दि. ०३.०९.२०२६ रोजी च्या आदेशान्वये सदर अधिकार हे आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रत्यायोजित करण्यात आले आहेत.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांतील इ. ११ वी प्रवेश प्रक्रीया संपुष्टात आली आहे. सन २०२७/२८ या शैक्षणिक या वर्षाकरिता इ. ११ वी जादा तुकडी/अतिरिक्त शाखेचे सर्व प्रस्ताव ON LINE पोर्टल मार्फत सादर करण्यात यावे. संदर्भीय क्र. १ व २ अन्वये शासनस्तरावरुन परत करण्यात आलेले व यापुढील ON LINE पोर्टलद्वारे सादर करण्यात यावेत. तसेच ऑफलाईन शासनस्तरावरुन प्राप्त झालेले प्रस्ताव परत नेण्याकरिता जबाबदार कर्मचा-यांना संचालनालयात उपस्थित राहणेबाबत आपलेस्तरावरुन निर्देश देण्यात यावेत.
ON LINE पोर्टलचे कामकाज अंतिम टप्प्यात असून सदर पोर्टल कार्यान्वियीत झाल्यानंतर स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील. यापुढे ऑफलाईन प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. सोबत : संदर्भीय पत्रे.
(टिपणी मा. आयुक्त (शिक्षण) यांनी मान्य केली असे.)
Digitally signed by
Mahesh Madhukar Palkar Date: 26-10-2026
15:39:27
(डॉ. महेश पालकर),
शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक,
प्रत माहिती व कार्यवाहीसाठी :
१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
२) शिक्षण निरिक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम), बृहन्मुंबई.
प्रत माहितीसाठी :
मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सविनय सादर.