शिक्षकांसाठी स्थानिक विचारक्षमता / अवकाशीय विचारक्षमता (Spatial Thinking) या विषयावरील ऑनलाइन कार्यशाळेसाठी नामनिर्देशित करण्याबाबत नोंदणी लिंक Workshop On Spatial Thinking

Workshop On Spatial Thinking

Workshop On Spatial Thinking

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

Nominate teachers for online workshops on Spatial Thinking

Regarding the nomination of teachers for the online workshop on Spatial Thinking organized in collaboration with the Department of Science and Technology (DST), Government of India

bharat sarkarchya vidnyan v tantradnyan vibhagachya (DST) sahkaryane aayojit sthanik vicharakshamta / avakashiya vicharakshamta (Spatial Thinking) ya vishayavaril online karyashalesathi shikshak namnirdeshit karnyababat

जा.क्र/राशैसंप्रपम/सा.शा./भारती विद्यापीठ-कार्य./२०२६/
दिनांकः स्वाक्षरीखाली नमूद आहे.

विषय - भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (DST) सहकार्याने आयोजित स्थानिक विचारक्षमता / अवकाशीय विचारक्षमता (Spatial Thinking) या विषयावरील ऑनलाइन कार्यशाळेसाठी शिक्षक नामनिर्देशित करण्याबाबत.

संदर्भ –
१) भारती विद्यापीठ (अभिमत), पुणे यांचे पत्र BVDU/IEER/१०९/२०२६-२७ दि.२८ ऑगस्ट, २०२६
२) शासन निर्णय दि. १७ ऑक्टोबर, २०१६
३) शासन परिपत्रक दि.०६ मे, २०२६

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, पर्यावरण शिक्षण व संशोधन संस्था, भारती विद्यापीठ (BVIEER) पुणे ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (Department of Science and Technology DST) भू-स्थानिक क्षमता विकास कार्यक्रमाची (Geospatial Capacity Building Program) नोडल संस्था आहे. सदर संस्थेने “शाश्वत विकास उद्दिष्टांचे (SDGs) स्थानिक पातळीवर आकलन व नियोजन करण्यासाठी स्थानिक / अवकाशीय विचारक्षमता” (Spatial Thinking for Localizing the Sustainable Development Goals SDGs) या नावाने आयोजित करण्यात येणाऱ्या अभिनव ऑनलाइन कार्यक्रमात शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (DST) सहकार्याने भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या पर्यावरण शिक्षण व संशोधन संस्थेमार्फत (BVIEER), पुणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेअंतर्गत एकूण १० ऑनलाइन सत्रे आयोजित केली जाणार आहेत. प्रत्येक सत्राचा कालावधी दीड तासाचा असेल. ही सत्रे दर आठवड्याला शनिवारी सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत आयोजित केली जातील. या सत्रानंतर सहभागी शिक्षकांना त्यांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागातून कृती-आधारित प्रकल्प राबविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले सर्व शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन BVIEER संस्थेमार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तदनुषंगाने राज्यातील २० शाळांमधून प्रत्येकी दोन शिक्षक याप्रमाणे एकूण ४० इच्छुक शिक्षकांसाठी सदर कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील इच्छुक शिक्षकांना सहभागी होणेकरिता सोबत दिलेल्या लिंकवर नावनोंदणी करण्यास सूचित करावे.

सोबत – १. संदर्भीय पत्र

Online Series on Spatial Thinking for School Teachers organised by BVIEER, Pune Registration LINK

२. नोंदणी लिंक – https://forms.gle/P5PkJBFfoLHPA1tYA

Digitally signed by Kamaladevi Shridhar Awate Date: 26-10-2026 19:41:34
(डॉ. कमलादेवी आवटे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे- ३०

	परिपत्रक पीडीएफ लिंक 
Workshop On Spatial Thinking
Workshop On Spatial Thinking

Leave a Comment

error: Content is protected !!