Improved Procedures of Class 11th Central Online Admission Process
Improved Procedures of Class 11th Central Online Admission Process
Regarding bringing more consistency in the online admission process for class 11 from the academic year 2026-2027
Shaikshnik Varsha san 2026-2027 pasun iyatta akaravi online Pravesh
Prakriya madhye adhik susutrta Ananya Bhabat शैक्षणिक वर्ष सन २०२६-२०२७ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः प्रवेश-१२२५/प्र.क्र.१६/ एसडी-२
मादाम कामा मार्ग, हुत्तात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक: २७ एप्रिल, २०२६
वाचा-
१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, एचएससी-१०९७/(१४४४/९७) उमाशि-१, दिनांक-२६.०६.१९९७.
२) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, एसएसएन २१०३/ (५०/०३)/माशि-२ दिनांक २७.०५.२००३.
३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, एचएससी-१७०९/ (४४/०९) उमाशि-१, दिनांक-२८.०५.२००९.
४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, एचएससी-१७०९/ (४४/०९) उमाशि-१, दिनांक-०७.०६.२०१०.
५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, एचएससी-१८११/(४४१/११) उमाशि-१, दिनांक-१६.०३.२०१२.
६) शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-१०१३/प्र.क्र.२३६/१३/एसडी-२, दिनांक-०३.०३.२०१४.
७) शासन निर्णय, अल्पसंख्यांक विभाग, क्रमांक, अशैस २०१२/प्र.क्र.२१/कार्या-५, दिनांक-१८.०६.२०१४.
८) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, व्यशि २०१४/प्र.क्र.८२/१४/एसडी-६, दिनांक-२१.०८.२०१४.
९) शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, प्रवेश-२०१४/प्र.क्र.१९२/एसडी-२, दिनांक-१४.०५.२०१५.
१०) शिक्षण संचालक (माध्यामिक व उच्च माध्यामिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. उच्च माध्यामिक-२४२/११ ऑनलाईन /६१३१, दिनांक-२७.१०.२०१५.
११) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, न्यायाप्र-२०१५/ (६१/१५)/एसडी-२, दिनांक २८.०३.२०१६.
१२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, प्रवेश-२०१६/(१८०/१६) एसडी-२, दिनांक ०७.०१.२०१७.
१३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, प्रवेश-२०१८/प्र.क्र.३३३३/एसडी-२, दिनांक-०७.०३.२०१९.
१४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश-२०१८/प्र.क्र-३३३/एसडी-२, दिनांक २३.०६.२०२०.
१५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश-०४२२/प्र.क्र-४१/एसडी-२, दिनांक ०९.०६.२०२२.
१६) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५/प्र.क्र.१६/एसडी-२ दिनांक २५.०२.२०२५.
१७) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५/प्र.क्र.१६/एसडी-२ दिनांक ०६.०५.२०२५.
प्रस्तावना-
सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्रातील सर्व उच्च माध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भ क्रमांक ३ येथील दिनांक २८.०५.२००९ च्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशामध्ये संदर्भ क्रमांक ४ व ५ येथील शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या होत्या.
संदर्भाधीन क्रमांक ६ येथील दिनांक ०३.०३.२०१४ च्या शासन पत्रान्वये सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात आलेली होती. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत त्रुटी असल्याचे नमूद करुन मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचिका क्रमांक १२७/२०१४ दाखल करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर जनहित याचिका प्रकरणी दि.०५.०६.२०१५ रोजी दिलेल्या निर्णयातील निर्देशानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रक्रियेबाबत सन २०१६ १७ साठी धोरण निश्चित करुन संदर्भ क्रमांक ११ मधील शासन निर्णय दिनांक २८.०३.२०१६ रोजी निर्गमित करण्यात आला होता. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासोबत सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून नागपुर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महानगरपलिका क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना लागू करण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक १२ येथील दिनांक ०७.०१.२०१७ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता.
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपुर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक २८.०५.२००९, दिनांक ०७.०६.२०१०, दिनांक १६.०३.२०१२ व दिनांक ०१.०१.२०१७ च्या शासन निर्णनयान्वये कार्यपध्दती निश्चित करण्यात आली होती. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आलेल्या आहेत.
सन २०१८-१९ च्या इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे २ रिट याचिका (रिट याचिका क्र.३८३९/२०१८ व रिट याचिका क्र.३९३२/१८) दाखल करण्यात आल्या होत्या. सदर रिट याचिकांबाबत मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश, सन २०१८-१९ च्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान तसेच तद्भतर आलेले अनुभव, पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या तक्रारी व त्या अनुषंगाने शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या कडून शासनास प्राप्त अहवाल इ. विचारात घेऊन सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापर्यंत प्रवेश प्रक्रिया करण्यात आलेली होती. या पार्श्वभुमीवर दिनांक २५.०२.२०२५ व दिनांक ०६.०५.२०२५ च्या शासन निर्णयान्वये इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने संपूर्ण राज्यात गुणवत्तेनुसार सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात आलेली आहे. या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी इ.११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी तरतूदी निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय
सन २०२६-२७ पासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इ. ११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक ०६ मे २०२५ याद्वारे अधिक्रमीत करण्यात येत असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून खालील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी :-
अ) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :-
(৭) राज्यातील सर्व क्षेत्रांकरीता उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यांचेशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील.
(२) राज्यातील अल्पसंख्यांक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतूदी लागू राहतील.
(३) शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय पध्दतीने व ऑनलाईन प्रणाली द्वारा करण्यात यावे. तसेच शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून HSVC व्यावसायिक थे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने शाळा स्तरावर होतील. शालेय शिक्षण विभागाच्या व्यतिरिक्त आदिवासी विभाग, सामाजिक न्याय व अन्य विभागाच्या राज्य मंडळ संलग्नित शाळांच्या विभाग प्रमुखांनी मान्यता दिल्यास अशा शाळा या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. ही परवानगी त्या त्या विभागाने दिनांक ३० एप्रिल पूर्वी देणे अनिवार्य असेल.
(४) खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न उच्च माध्यमिक शाखा यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरीष्ठांना उपलब्ध करून द्यावेत, तसेच विहित मुदतीत माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे आवश्यक राहील. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अनुषंगिक कामकाज विहित मुदतीत करणे आवश्यक राहील, याबाबत शाळा स्तरावरील कामकाज पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची असेल. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल.

शैक्षणिक वर्ष सन २०२६-२०२७ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.
ALSO READ 👇
विषय : इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ बाबत.
जा.क्र.शिसं/उमा/इ.११वीप्रवेश/अ-१/२०२५-२६/
दिनांक : २१/११/२०२५
संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई यांचा दिनांक ०६/०५/२०२५ रोजीचा शासन निर्णय.
उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयान्वये सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्त्ता ११ वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत.
त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, सद्यस्थितीत इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश बंद असून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी केलेल्या परंतू अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या किंवा कनिष्ठ महाविद्यालय अलॉट न झालेल्या विद्यार्थी / पालक यांचेकडून पुढील प्रवेश फेरीबाबत विचारणा होत आहे.
तरी आपण आपल्या विभागातील अशा विद्यार्थ्यांची माहिती खालील तक्त्यात संचालनालयास दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत सादर करावी.
अनु.क्र.
विद्यार्थ्याचे नाव
जिल्हा
विद्यार्थी प्रवेश नोंदण क्रमांक
शिक्षण सचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
ALSO READ 👇
Improved Procedures of Class 11th Central Online Admission Process
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुधारीत सूचना.
दिनांक: १० जून, २०२५.
वाचा:- १. शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५-प्रक्र.१६/ एसडी -२, दि. ०६.०५.२०२५.
२. शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५-प्रक्र. १६/ एसडी-२, दि. ०२.०६.२०२५.
प्रस्तावना:-
संदर्भाकित शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत सुधारित कार्यपध्दती अवलंबिण्यात आली आहे. तरी, आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचलनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार अल्पसंख्यांक महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोट्यातील जागा रिक्त राहिल्यास उर्वरीत जागा पहिल्या फेरीनंतर प्रत्यार्पित (Surrender) करण्याची मुभा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचलनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्याची मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्याअनुषंगाने यापुर्वी निर्गमित करण्यात आलेले संदर्भ क्र.२ येथील शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे, व सुधारीत शुध्दीपत्रक खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहे.
शुध्दीपत्रक
संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत सुधारित कार्यपध्दती अवलंबिण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामधील
अ) मुद्दा क्र.११-
“अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत अल्पसंख्यांक कोट्यातील जागा कोणत्याही परिस्थितीत प्रत्यार्पित करता येणार नाहीत. भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल. या कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील, अल्पसंख्यांक विभागाच्या दिनांक १८/०६/२०१४ च्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश करताना त्या-त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत. त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील. तद्नंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रत्यार्पित रिक्त जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचे तत्व बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या प्रवेशाप्रमाणे असेल.”
ऐवजी
मुद्दा क्र.११ –
“अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. परंतु, अल्पसंख्यांक कोट्यातील जागा पहिल्या फेरीअंती रिक्त राहिल्यास पहिल्या फेरीनंतर अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महविद्यालयांना उर्वरीत जागा प्रत्यार्पित करण्याची मुभा असेल. परंतु, दूस-या फेरीच्या वेळी अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाकरीता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील व तदनंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारण मध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा महाविद्यालयांना असेल. तथापि, उर्वरीत जागा प्रत्यार्पित करणे पुर्णतः ऐच्छिक असून कोणत्याही अल्पसंख्याक संस्थेवर बंधनकारक नसेल.
भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल. या कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील, अल्पसंख्यांक विभागाच्या दिनांक १८/०६/२०१४ च्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश करताना त्या-त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत. त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील. तद्नंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रत्यार्पित रिक्त जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचे तत्व बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या प्रवेशाप्रमाणे असेल.”
असे वाचावे.
आणि
ब) मुद्दा क्र.१३ – इन-हाऊस कोटा –
“इन-हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने भरण्यात याव्यात. उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात/आवारात माध्यमिक शाळा असल्यास या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल. बिगर अल्पसंख्यांक व अल्पसंख्यांक शाळांना इनहाऊस कोटा लागू असेल. सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा भरता येतील. तनंतर सदर जागा रिक्त असल्यास प्रत्यार्पित करणे व्यवस्थापनास अनिवार्य असेल. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन-हाऊस कोटा ५० टक्के असेल. या कोट्याकरीता इयत्ता १० वीची परीक्षा राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र असतील.”
ऐवजी
मुद्दा क्र.१३ – इन-हाऊस कोटा –
१. इन-हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने भरण्यात याव्यात. उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात/आवारात माध्यमिक शाळा असल्यास या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल. बिगर अल्पसंख्यांक व अल्पसंख्यांक शाळांना इनहाऊस कोटा लागू असेल. सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा भरता येतील. तद्नंतर सदर जागा रिक्त असल्यास प्रत्यार्पित करणे व्यवस्थापनास अनिवार्य असेल. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन-हाऊस कोटा ५० टक्के असेल. या कोट्याकरीता इयत्ता १० वीची परीक्षा राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र असतील.
२. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय /वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळा करीता एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील.
३. राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरणे योग्य राहील.असे वाचावे.
सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०६१०१६०७४०७८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
उप सचिव, महाराष्ट्र शासन.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुद्धीपत्रक क्रमांकः प्रवेश १२२५/प्र.क्र-१६/ एसडी – २, मंत्रालय, मुंबई
Also Read 👇
Improved Procedures of Class 11th Central Online Admission Process
शैक्षणिक वर्ष २०२५ -२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुधारीत सूचना.
दिनांक: ०२ जून, २०२५.
वाचा:- शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५-प्रक्र.१६/ एसडी-२, दि. ०६.०५.२०२५
प्रस्तावना:-
संदर्भाकित शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत सुधारित कार्यपध्दती अवलंबिण्यात आली आहे. तरी, आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचलनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार अल्पसंख्यांक महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोट्यातील जागा रिक्त राहिल्यास उर्वरीत जागा पहिल्या फेरीनंतर प्रत्यार्पित (Surrender) करण्याची मुभा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचलनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्याची मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शुध्दीपत्रक :-
संदर्भाकित शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत सुधारित कार्यपध्दती अवलंबिण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामधील
अ) मुद्दा क्र.११ –
“अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत अल्पसंख्यांक कोट्यातील जागा कोणत्याही परिस्थितीत प्रत्यार्पित करता येणार नाहीत.. भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल. या
कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील, अल्पसंख्यांक विभागाच्या दिनांक १८/०६/२०१४ च्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश करताना त्या-त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत. त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील. तद्नंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रत्यार्पित रिक्त जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचे तत्व बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या प्रवेशाप्रमाणे असेल.”
ऐवजी
मुद्दा क्र.११ –
“अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित ३ फेन्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. परंतु, अल्पसंख्यांक कोट्यातील जागा पहिल्या फेरीअंती रिक्त राहिल्यास पहिल्या फेरीनंतर अल्पसंख्याक दर्जा प्राप्त कनिष्ठ महविद्यालयांना उर्वरीत जागा प्रत्यार्पित करण्याची मुभा असेल. परंतु, दूस-या फेरीच्या वेळी अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाकरीता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील व तदनंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारण मध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा महाविद्यालयांना असेल.
तथापि, उर्वरीत जागा प्रत्यार्पित करणे पुर्णतः ऐच्छिक असून कोणत्याही अल्पसंख्याक संस्थेवर बंधनकारक नसेल.”
असे वाचावे.
आणि
ब) मुद्दा क्र.१३ – इन-हाऊस कोटा –
“इन-हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने भरण्यात याव्यात. उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात/आवारात माध्यमिक शाळा असल्यास या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल. बिगर अल्पसंख्यांक व अल्पसंख्यांक शाळांना इनहाऊस कोटा लागू असेल. सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा भरता येतील. तद्नंतर सदर जागा रिक्त असल्यास प्रत्यार्पित करणे व्यवस्थापनास अनिवार्य असेल. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन-हाऊस कोटा ५० टक्के असेल. या कोट्याकरीता इयत्ता १० वीची परीक्षा राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र असतील.”
ऐवजी
मुद्दा क्र.१३ – इन-हाऊस कोटा-
१. इन-डाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्याअंतर्गत मरण्यात येणान्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने मरण्यात याव्यात. उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात/आवारात माध्यमिक शाळा असल्यास या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल. बिगर अल्पसंख्यांक व अल्पसंख्यांक शाळांना इनहाऊस कोटा लागू असेल. सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा मरता येतील. तद्नंतर सदर जागा रिक्त असल्यास प्रत्त्यार्पित करणे व्यवस्थापनास अनिवार्य असेल. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन-हाऊस कोटा ५० टक्के असेल. या कोट्याकरीता इयत्ता १० वीची परीक्षा राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र असतील.
२. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय /वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळा करीता एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील.
३. राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसुली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन-डाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरणे योग्य राहील..
असे वाचावे.
सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०६०२१७२४१०६८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुद्धीपत्रक क्रमांकः प्रवेश १२२५/प्र.क्र-१६/ एसडी – २
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई
Also Read
Improved Procedures of Class 11th Central Online Admission Process
Improved Procedures of Class 11th Central Online Admission Process
Central Online Admission Process of Class 11th
इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत सुधारित कार्यपध्दती
Central Online Admission Process of Std 11th extending the scope streamlining
Regarding extending the scope of the Central Online Admission Process of Class 11th from the academic year 2025-2026 across the state and bringing more streamlining.
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढविणेबाबत व अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.
दिनांक: २५ फेब्रुवारी, २०२५.
वाचा:-
१) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः एचएससी १०९७/ (१४४४/९७) / उमाशि – १, दि. २६.०६.१९९७
२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः एचएससी १७०९ / (४४/०९) / उमाशि – १, दि. २८.०५.२००९
३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः एचएससी- १७०९/ (४४/०९) / उमाशि – १, दि. ०७.०६.२०१०
४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः एचएससी- १८११/(४४१/११) / उमाशि – १, दि. १६.०३.२०१२
५) शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः संकीर्ण १०१३/प्र.क्र.२३६/१३/ एसडी-२, दि. ०३.०३.२०१४
६) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः व्यशि २०१४/प्र.क्र. ८२/१४/ एसडी-६, दि. २१.०८.२०१४
७) शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश २०१४/प्र.क्र. १९२ / एसडी -२. दि. १४.०५.२०१५
८) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. उच्च माध्य २४२/११ ऑनलाईन /६१३१, दि. २७.१०.२०१५
९) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः न्यायाप्र- २०१५/ (६१/१५)/एसडी-२. दि. २८.०३.२०१६
१०) शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश २०१६/प्र.क्र. (१८०/१६)/एसडी-२, दि. ०७.०१.२०१७
११) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश ०४२२/प्र.क्र. ४१/एसडी-२, दि. ०९.०१.२०२२
प्रस्तावना:-
सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधिन क्रमांक २ येथील दि. २८.०५.२००९ च्या
शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशामध्ये संदर्भाधिन क्रमांक ३ व ४ येथील शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे संदर्भाधिन क्रमांक ५ येथील दि. ०३.०३.२०१४ च्या शासन पत्रान्वये सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी १२७/२०१४ या जनहित याचिका प्रकरणी दि.०५.०८.२०१५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रक्रीयेबाबत सन २०१६-१७ साठी धोरणनिश्चित करून प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याच्यादृष्टीने संदर्भ क्रमांक ९ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
सद्यःस्थितीत इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश राज्यातील मुंबई (MMRDA), पुणे पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात राबविण्यात येत आहेत. सदर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची उपयोगीता व व्यवहार्यता लक्षात घेवून तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांच्या सात कलमी कृती उद्दिष्टांमध्ये असलेल्या EASE OF LIVING या उद्दिष्टान्वये विद्यार्थी व पालकांचे जीवनमान सुखकर बनविणे व याकामी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम याचा अपव्यव टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दती राज्यभर राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णयः-
मुंबई (MMRDA), पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका सोबतच इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दती राज्यभर राबविण्याबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत खालीलप्रमाणे सुधारित कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी :-
१) इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र (MMRDA), पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक महानगरपालिका क्षेत्रासोबतच सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना लागू राहील.
२) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, लातूर व कोल्हापूर हे उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून नोंदणी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती उदा. शाखानिहाय तुकड्या, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना-अनुदानित (स्वयंअर्थसहाय्यित) वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले विषय इत्यादी तपासन शिक्षण संचालक (माध्यमिक व
उच्च माध्यमिक) यांनी निश्चित केलेल्या ऑनलाईन सेवा पुरवठादारास विहित कालावधीत उपलब्ध करुन देतील.
३) शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रकीया राज्यस्तरावर राबविण्यासाठी आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी नियंत्रण ठेवावे व या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या स्तरावर करण्यात यावी.४) राज्यस्तरावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिने विद्यार्थी व पालकांना प्रवेश पध्दती विषयी माहीती उपलब्ध करुन द्यावी. व आवश्यकता असल्यास याविषयी प्रशिक्षणासाठी व्हिडिओ उपलब्ध करून द्यावे.
५) इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणे व अन्य पुर्वतयारी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या स्तरावर करण्यात यावी.
६) नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करण्यात यावेत. तद्नंतर इयत्ता ११ वी चे प्रवेश उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सर्वांसाठी खुले (OPEN TO ALL) ठेवावेत व सदरचे प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर करण्यात यावेत. याबाबतचे आदेश संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात यावेत.
७) इ.११ वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीनेच होईल.
८) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सुचना त्यांच्या स्तरावरुन निर्गमित कराव्यात.कराव्यात.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०२२८१८०२५४४९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः प्रवेश १२२५/प्र.क्र-१६/ एसडी – २, मंत्रालय, मुंबई




