Graduates And Teachers Constituency Online Voter Registration Link
Graduates And Teachers Constituency Online Voter Registration Link
Graduates’ & Teachers’ Constituency 2025–2026 Online Elector Registration Link
Elector Registration Graduates’ & Teachers’ Constituency 2025–2026
मतदार नोंदणी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ २०२५-२०२६
औरंगाबाद, पुणे आणि नागपूर विभाग पदवीधर/पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक परिषद मतदारसंघांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यापूर्वी कृपया खालील माहिती वाचा.
१) पदवीधर परिषद मतदारसंघासाठी कोण अर्ज करू शकते?
अशी व्यक्ती जी पदवीधर मतदारसंघामध्ये सर्वसाधारण रहिवासी आहे आणि दि. १-११-२०२५ रोजी किमान तीन वर्षे आधीपासून भारतातील विद्यापीठातून पदवीधर आहे किंवा तिच्याकडे त्यास समतुल्य पात्रता आहे
२) पदवीधर परिषद मतदारसंघात नावनोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
i) त्याच्या/तिच्या सर्वसाधारण रहिवाशाचा पुरावा आणि
ii) भारत निवडणूक आयोगाच्या ५ सप्टेंबर २०१६ च्या पत्राच्या परिच्छेद २.२.१२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पदवी
पात्रता सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांपैकी एक. कृपया ते पत्र येथे पहा. या ओळीला स्पर्श करा
३) शिक्षक परिषद मतदारसंघासाठी कोण अर्ज करू शकते?
अशी व्यक्ती जी सदर शिक्षक मतदारसंघात सर्वसाधारण रहिवासी राहते आणि दि. १-११-२०२५ पूर्वीच्या सहा वर्षांच्या आत एकूण किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी, लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० च्या कलम २७ (३) (ब) नुसार निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापनात गुंतलेली आहे.
४) शिक्षक परिषद मतदारसंघात नावनोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
1) त्याच्या/तिच्या सर्वसाधारण रहिवाशाचा पुरावा आणि
ii) भारत निवडणूक आयोगाच्या ५ सप्टेंबर २०१६ च्या पत्राच्या परिच्छेद २.३.५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, अध्यापनातील त्याचा सहभाग सिद्ध करण्यासाठी शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी दिलेले प्रमाणपत्र. या बाबतचे आयोगाचे पत्र येथे पहावे. या ओळीला स्पर्श करा
१) पदवीधर/शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादीत नोंदणीसाठी अपात्रता काय आहेत?
कृपया लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम १६ मधील तरतुदी येथे पहा. या ओळीला स्पर्श करा
६) विधानसभा/संसदीय मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीबाबत विद्रद्यमान तपशील का आणि कसे भरायचे?
पदवीधर/शिक्षक मतदारसंघासाठी मतदार म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या सर्वसाधारण रहिवासाच्या पडताळणीसाठी हे आवश्यक आहे. संबंधित पृष्ठावर या उद्देशासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून आणि
१) मतदार ओळखपत्र क्रमांक किंवा
२) नाव, नातेवाईकाचे नाव, वय आणि लिंग किंवा
३) मोबाईल क्रमांक (नोंदणीकृत असल्यास) यासारखी मूलभूत माहिती प्रविष्ट करून तुम्ही तुमचे विधानसभा मतदार संघातील नाव व ईतर तपशिल सहजपणे शोधू शकता.
Also Read हे ही वाचाल Maharashtra Graduate and Teacher Constituency Election Schedule Announced
पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन
Facility for online registration of Graduates’ Constituencies is started
पदवीधर मतदार नोंदणी आवश्यक कागदपत्रे
नोंदणी करण्याची मुदत
30 सप्टेंबर 2025 ते 06 नोव्हेंबर 2025
पात्रता
आवश्यक कागदपत्रे पुढे दिलेली रहिवाशी पत्या संदर्भातील व शैक्षणिक माहिती भरणे वरिल प्रमाणे माहिती भरल्यास खालील कागदपत्रे अपलोड करणे
- मतदार नोंदणी फॉर्म : – फॉर्म नं. १८
- कोणत्याही शाखेतील पदवीधर जे २०२३ पर्यंत पदवी उत्तीर्ण झाले आहेत. / पूर्वीच्या कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम वर्षाच्या उत्तीर्ण गुणपत्रकेची झेरॉक्स प्रत आधारकार्ड, डिग्री सर्टिफिकेट (200 kb पर्यंत )
- कोणत्याही शाखेतील पदवीच्या मार्कमेमोची झेरॉक्स Pdf मध्ये size –200KB
- आधारकार्ड झेरॉक्स size –200KB
- पासपोर्ट साईज फोटो -100kb मध्ये
- स्वाक्षरी 100 Kb मध्ये
- सध्या नोंदणी सुरू असलेल्या विभागातील रहिवाशी असणे आवश्यक
- पासपोर्ट साईज फोटो फोटो व स्वाक्षरी (100 kb पर्यंत )
- मतदान ओळखपत्र/आधार कार्ड यापैकी एकाची झेरॉक्स प्रत
- नाव बदल असल्यास गॅझेट / विवाह नोंदणी प्रमाणपत्र / पॅनकार्ड
- भरलेला फॉर्म नं. १८ वरील सर्व कागदपत्रांसह
नोंदणीची मुदत- ३० सप्टेंबर २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५
नोंदणीचे ठिकाण- आपल्या तालुक्याचे तहसील कार्यालय - विवाह नोंदणी दाखला (200 kb पर्यंत ) विवाहित महिलांसाठी.
- स्वतःचा ओळखपत्र क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक मतदार यादीतील क्रमांक,आधार क्रमांक व आधार कार्डवरील जन्मदिनांक
- वरिल कागदपत्र अपलोड करून फॉर्म Submit करणे,त्यानंतर Acknowledgement Number येईल तो स्वतः जवळ ठेवावा,भरलेला pdf फॉर्म सुद्धा Download करा येतो.
मागील वेळी मतदार असलेल्या सर्व मतदारांनी नव्याने मतदार नोंदणी करायची आहे. प्रत्येक वेळी नवीन नांव नोंदणी करावी लागते पहिली नांव नोंदणी ग्राह्य धरल्या जात नाही.
आपण जेव्हा ऑनलाईन मध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करतो त्याला सेल्फ अटेस्टेड करावे ही विनंती
पदवीधरांनो मतदार बना
ऑनलाइन सुविधा उपलब्ध
असा आहे कार्यक्रम
१५ ऑक्टोबर : पहिली पुनर्प्रसिद्धी
२५ ऑक्टोबर : दुसरी पुनर्प्रसिद्धी
६ नोव्हेंबर : प्रारूप मतदारयादीसाठी हस्तलिखिते व छपाई
२० नोव्हेंबर : प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी
२५ नोव्हेंबर : दावे-हरकती सादर करण्याची अंतिम तारीख
१० ते २५ डिसेंबर : दावे-हरकतींचा निपटारा व पूरक यादी
३० डिसेंबर २०२५ अंतिम मतदारयादी प्रसिद्ध
ऑनलाईन नोंदणी कशी करायची ? प्रक्रिया अशी
लिंक- या वेबसाईटवर जाऊन पदवीधर स्वतःची नोंदणी अगदी सहज करू शकतात.
या संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य’ हे पेज ओपन होईल.
‘इलेक्टोर लॉगिन’ अशी लिंक दिसेल. स्वतःचा मोबाइल क्रमांक, स्वतःचा 10 अंकी मोबाईल क्रमांक टाकणे मोबाईल वर OTP येईल तो प्रविष्ट करणे कॅप्चा टाकावा. मोबाइलची खात्री पटविणाऱ्या माहितीसमोर टिक करावे.
त्यानंतर ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी टाकून लॉगिन करावे.
Voter search हि वेबसाईट ओपन करून Voter by Details हा ऑप्शन वापरून नाव वडिलांचे नाव व आडनाव टाकून search करा त्यात जिथे आपले मतदार यादीत नाव आहे,तो क्रमांक,भाग क्रमांक/polling station No,अनुक्रमांक/Serial No. व epic क्रमांक घेणे तो submit करणे
इलेक्टोर डिटेल्स असा पर्याय दिसेल. तुमच्या विधानसभा मतदारसंघाची माहिती द्यावी.
विधानसभा मतदारसंघात नाव नसेल तर दुसरा प्रतिज्ञापत्राचा पर्याय निवडूनही अर्ज प्राप्त करता येतो.
अर्ज ओपन झाल्यानंतर त्यात नाव, वय, जन्मतारीख, पत्ता, पिनकोड, शिक्षण ही संपूर्ण माहिती भरावी.
- इतर पदवीधर मतदारसंघात नाव नाही, असे स्पष्टीकरण देणाऱ्या सूचनेवर टिक करावे.
- अर्जात भरलेली माहिती सत्य आहे, हे दर्शविणाऱ्या सूचनेवरही टिक करावे.
- त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये फोटो (१०० केबीच्या आतील), स्वाक्षरी स्कॅन केलेली, रहिवासी पुरावा (आधारकार्ड इ.), गुणपत्रिकेची, डिग्री प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत अटॅच्ड करावी
- अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन सबमिटेड असा संदेश झळकेल. नंबर असलेली पावती मिळेल. त्यानंतर निवडणूक विभागाकडून या अर्जाची तपासणी करून अर्ज स्वीकृत किंवा नाकारला जाईल, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
नोंदणी ऑनलाईनही करू शकता Elector Login Register For Graduates' Constituency
पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी खालील लिंकचा उपयोग करा.
ऑफलाईन पदवीधर नोंदणी
सोबत देण्यात येत असलेला नमुना क्रमांक 18 हा फॉर्म भरून त्यावर 1 पासपोर्ट साईज फोटो चिकटवावा व स्वाक्षरी करावी.फॉर्म सोबत जोडायची कागदपत्रे1)पदवीचा मार्कमेमो झेरॉक्स स्वसांक्षाकित केलेली आधार कार्ड झेरॉक्स हा ऑफलाईन फॉर्म आपल्या तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात जमा करून त्याची पोहच पावती घ्यावी.
FORM 18 पीडीएफमध्ये हवा असल्यास या ओळीला स्पर्श करा
शिक्षक मतदार नोंदणी ऑनलाईन
Facility for online registration of Teachers’ Constituencies is started
शिक्षक मतदार ऑनलाईन नोंदणी कशी करायची ? प्रक्रिया अशी
शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणीचा अर्ज आता ऑनलाईन करता येणार
संबंधितांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी
शिक्षक मतदार संघासाठी ०१.११.२०२५ अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. मतदार नोंदणीसाठी अर्जाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध असून, सर्व संबंधितांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन भारत निवडणूक आयोगाने केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१.११.२०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार मतदारसंघात नव्याने मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार यादी कार्यक्रमानूसार नमुना क्रमांक-१९ व्दारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२५ असा आहे. शिक्षक मतदार संघासाठी नमुना क्रमांक-१९ मधील अर्ज भरण्याची सूविधा आता ऑनलाईन उपलब्ध असून त्यासाठी
या संकेतस्थळावर लॉगीन करुन पात्र शिक्षकांना आवश्यक त्या पुरावा कागदपत्रांसह दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२५ रोजी पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. तसेच, शिक्षक मतदार संघासाठी विहित नमूना क्रमांक-१९ मधील अर्ज आवश्यक पुराव्यांसह संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे *ऑफलाईन* दाखल करण्याची सध्याची कार्यपध्दतीसुध्दा मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२५ रोजी पर्यत सुरु आहे. या सुविधेबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी व पात्र शिक्षकांनी आपले अर्ज स्वीकारण्याच्या वर नमूद अंतिम दिनांकापर्यत सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षक मतदार नोंदणीसाठी खालील लिंकचा उपयोग करा.
या संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य’ हे पेज ओपन होईल.
‘इलेक्टोर लॉगिन’ अशी लिंक दिसेल. स्वतःचा मोबाइल क्रमांक, स्वतःचा 10 अंकी मोबाईल क्रमांक टाकणे मोबाईल वर OTP येईल तो प्रविष्ट करणे कॅप्चा टाकावा. मोबाइलची खात्री पटविणाऱ्या माहितीसमोर टिक करावे.
त्यानंतर ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी टाकून लॉगिन करावे.
कागदपत्रे आवश्यक
अध्यापनातील त्याचा सहभाग सिद्ध करण्यासाठी शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी दिलेले प्रमाणपत्र.मागील सहा वर्षांच्या कालावधीत मी पुढीलप्रमाणे तीन वर्षांहून अधिक कालावधीकरिता शिक्षक म्हणून कार्यरत आहे
मतदाराचे/अर्जदाराचे छायाचित्र
विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रमांक
भाग/मतदान केंद्र क्रमांक (माहीत असल्यास)
जन्मतारीख
मतदार छायाचित्र ओळखपत्र क्रमांक
संपर्क क्रमांक भ्रमणध्वनीदूरध्वनी
ईमेल (असल्यास)
FORM 19 नमुना-१९ (नियम-३१ पहा) शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी करावयाची मागणी पीडीएफमध्ये हवा असल्यास या ओळीला स्पर्श करा
