ePPO eGPO eCPO New Guidelines

image 2
ePPO eGPO eCPO New Guidelines

ePPO eGPO eCPO New Guidelines

महालेखापाल (ले. व अ.) १, महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि सर्व १५ जिल्हा कोषागार कार्यालयांसाठी e-PPO, e-GPO, e-CPO प्रणाली संदर्भात सूधारित सूचना…..

तारीखः १२ ऑगस्ट, २०२४

प्रस्तावना:-
शासकीय कामकाजामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या केंद्र शासन आणि राज्य
शासनाच्या धोरणानुसार शासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने माहिती व तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर
करून कामकाजात सुलभता, सुसूत्रता निर्माण करणे, सेवा जलदगतीने उपलब्ध करुन देऊन कार्यक्षमता वाढविणे
इत्यादी बाबी अंर्तभूत आहेत. त्यास अनुसरून निवृत्तीवेतन व अनुषंगिक लाभांच्या मंजूरी व प्रदानाच्या प्रक्रियेमध्ये
अचूकता, पारदर्शकता व नियमितता येऊन निवृत्तीवेतन धारकांना अनुज्ञेय असलेली प्रदाने वेळेत व्हावीत यासाठी
महालेखापाल कार्यालय, मुंबई यांचे सहमतीने व संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांच्यामार्फत e-PPO,
e-GPO, e-CPO प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर e-PPO, e-GPO, e-CPO प्रणाली अधिदान व
लेखा कार्यालय, मुंबई येथे प्रथम प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात येऊन त्यानंतर उपरोक्त वाचा मधील अ.क्र.
१ येथे नमूद शासन निर्णयान्वये दि.१ सप्टेंबर, २०२३ पासून अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई या कार्यालयासह
महालेखापाल (ले. व अ.)-१, महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व १५ जिल्हा कोषागार कार्यालयांसाठी पूर्णतः
तर कोषागार कार्यालय, नागपूर येथे प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
तद्नंतर उपरोक्त वाचा मधील अ.क्र. ३ येथे नमूद शासन निर्णयान्वये दि.१ जून, २०२४ पासून प्रधान महालेखापाल (ले. व अ.)-२, महाराष्ट्र, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व १९ जिल्हा कोषागार कार्यालयांसाठी e-PPO, e-GPO, e-CPO प्रणाली पूर्णतः कार्यान्वित करण्यात आलेली आहे. परिणामी उपरोक्त वाचा मधील अ.क्र. १ येथे नमूद शासन निर्णयातील काही तरतूदी सुधारित करणे आणि काही सूचना नव्याने निर्गमित करणे क्रमप्राप्त ठरले आहे. या पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-


१. उपरोक्त वाचा मधील अ.क्र.१ येथे नमूद शासन निर्णयामधील परिच्छेद क्र.५ मधील
‘महालेखापाल (ले. व अ.)-१, महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यकक्षेतील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या परंतू महालेखापाल (ले. व अ.)-१, महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यकक्षेच्या बाहेरच्या (other accounting circle i.e. Nagpur and other States) कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकास उपदान प्रदान आदेशांचे प्रदान पूर्वीच्या प्रचलित कार्यपध्दतीचा अवलंब करुन संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल.’
ही तरतूद वगळण्यात येत असून, त्याऐवजी खालील तरतूद विहित करण्यात येत आहे.

Also Read

Pension Approval Order Available Online

Pensioners eppo egpo ecpo Order

दि. १ ऑगस्ट, २०२४ नंतर महाराष्ट्र राज्याच्या शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या 6 बाबतीत महालेखापाल (ले. व अ.)-१, महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर इतर राज्यातील (Other States) कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या उपदानाचे प्रदान करण्यासाठी महालेखापाल (ले. व अ.)-१, महाराष्ट्र, मुंबई यांनी प्राधिकारपत्र निवृत्तीवेतनधारक राज्याबाहेरील ज्या कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन घेणार आहे, त्या संबंधित कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करावे..
परंतु महाराष्ट्र राज्यातील अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा कोणत्याही जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या बाबतीत मात्र महालेखापाल (ले. व अ.)-१, महाराष्ट्र, मुंबई यांनी उपदानाचे प्रदान करण्यासाठीचे प्राधिकारपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्याऐवजी अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करावे.’
२. दि. १ ऑगस्ट, २०२४ महालेखापाल (ले. व अ.)-१, महाराष्ट्र, मुंबई यांच्याकडून निर्गमित होणाऱ्या शिल्लक उपदान रक्कम (Balance DCRG), उपदान पुर्नवैधता (Revalidation), रोखून ठेवण्यात आलेले उपदान (Withheld DCRG), इत्यादी सर्व प्रकरणी उपदानाचे प्रदान सहाय्यक, अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तिवेतन शाखा) / अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांचेकडून करण्यात येईल.
३. उपरोक्त वाचा मधील अ.क्र. २ येथे नमूद शासन परिपत्रकान्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान, तसेच रूग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान, त्याचप्रमाणे शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान प्रदान करण्यासाठीची कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. सदर कार्यपध्दतीनुसार दि. १ ऑगस्ट, २०२४ पासून पुढे महालेखापाल (ले. व अ.)-१ महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यालयाकडून प्रकरण मंजूर करण्यात आल्यानंतर, उपदानाच्या संदर्भात प्रदानाची कार्यवाही संबंधित आहरण व संवितरण अधिकारी
यांचेद्वारे न करता त्याऐवजी सदर कार्यवाही सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तिवेतन शाखा) / अपर
कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांचेकडून करण्यात येईल.तथापि, तत्पुर्वी उपरोक्त वाचा मधील अ.क्र. १ येथे नमूद शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ६ व ७ मधील तरतूदींनुसार संबंधित कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी यांनी कार्यवाही करून लागू असलेली सर्व प्रमाणपत्रे ओळखतपासणीच्या वेळी सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तिवेतन शाखा) / अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांना उपलब्ध करुन देणे अनिवार्य राहील. तदनंतर सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तिवेतन शाखा) / अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांनी निवृत्तीवेतनवाहिनी आज्ञावलीमध्ये देयक तयार करणेबाबत कार्यवाही करावी. (उपरोक्त वाचा मधील अ.क्र. १ येथे नमूद शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट १ मधील अ.क्र. २.६)
४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (Shalarth), आदिवासी विकास विभाग (Ashramshalarth), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (Ayurvedarth), सामाजिक न्याय विभाग (Samaj Sevaarth), इतर मागास बहुजन कल्याण विभाग (VJNT Sevaarth), पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग (Mafsuarth), कृषी विभाग (Sausevaarth), उच्च व तंत्र शिक्षण विभाग (HTESevaarth) कौशल्य विकास व उद्योजकता विभाग (HTESevaarth) या विभागातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ मंजूर करण्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नमुना ‘अ’, नमुना- ‘ब’ व नमुना ‘४२ अ’ या कागदपत्रांसोबत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे छायाचित्र (Photo) व नमुना स्वाक्षरी (Specimen Signature) व आवश्यक कागदपत्रे निवृत्तीवेतन अदा करणाऱ्या अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय येथे सादर करावीत. तदनंतर सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) / अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांनी निवृत्तीवेतनवाहिनी आज्ञावलीमध्ये देयक तयार करणेबाबत कार्यवाही करावी. (उपरोक्त वाचा मधील अ.क्र. १ येथे नमूद शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट १ मधील अ.क्र. २.६)५. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्तीवेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयास सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा. जेणेकरून महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्तीवेतनधारकाला सूचना / संदेश पाठविणे शक्य होईल.
६. प्रस्तुत शासन निर्णय मा. महालेखापाल (ले व अ)१, महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यालयाकडील अनौपचारिक संदर्भ क्र. Pension Misc/Ch-३/७००३८२२९/८००३२००१, दि. १० मे, २०२४ तसेच वित्त विभाग सेवा ४ कार्यासनाच्या अनौपाचारिक संदर्भ क्र. ४३/२४/सेवा ४, दि.१० एप्रिल, २०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२४०८१२१८०९३२५९०५ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Circular / GR PDF Copy Link


(डॉ. राजेंद्र गाडेकर)
शासनाचे उप सचिव,

महाराष्ट्र शासन वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२२/प्र.क्र. ८२/कोषा.प्रशा ५,
मुंबई

तारीखः १२ ऑगस्ट, २०२४
वाचा :
१. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र. ८२/कोषा.प्रशा ५, दि.२४.०८.२०२३ २. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. रानिप्र०२३/प्र.क्र.५७/सेवा ४, दि. २४.०८.२०२३
३. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.३४/२०२४/कोषा-प्रशा ५, दि.२२.०५.२०२४

Leave a Comment

error: Content is protected !!