Effective Governance For Quality Education
Effective Governance For Quality Education
Gunvattapurn shikshansathi Prabhavi Saniyantran
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी संनियंत्रण करणे बाबत
महाराष्ट्र शासन
शिक्षण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र. आशिका /१०० दिवस कृती आराखडा/२०२५/आस्था-क-माध्य / ५८९
दिनांक 04 FEB 2025
प्रति,
१. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
२. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे १.
३. शिक्षण संचालक, (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे १.
४. शिक्षण संचालक, (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे
५. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे
६. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
८. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
९. विभागीय अध्यक्ष/विभागीय सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नवी मुंबई, कोकण, कोल्हापूर.
१०. संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, छत्रपती संभाजीनगर
११. संचालक, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर.
१२. विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर विभाग.
१३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) जिल्हा परिषद, सर्व
१४. प्राचार्य, शासकीय विद्यानिकेतन केळापूर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पूसेगांव.
१५. शिक्षण निरीक्षक मुंबई (पश्चिम/उत्तर/दक्षिण)
१६. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व
विषय :- गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी संनियंत्रण करणे बाबत.
संदर्भ :- १. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७/र.व.का.-१ दिनांक १३/०१/२०२५
२. मा. मंत्री महोदय यांचेकडील दि.१३/०१/२०२५ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त
संदर्भीय विषयान्वये आपणांस सूचित करण्यात येते की, राज्यातील शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यालय प्रमुख यांनी राज्यातील विभागाच्या संनियंत्रणामधील सर्व शाळा, तसेच सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व मंडळांच्या शाळा, व क्षेत्रिय कार्यालय यांच्याकरीता खाली विस्तृत नमूद केल्यानुसार निर्धारित केलेल्या बाबींची पूर्तता पुढील १०० दिवसात प्रभावीपणे करणे अपेक्षित आहे.
राज्यातील प्रत्येक मुलांच्या शिक्षण गुणवत्तापूर्ण व आनंददायी पध्दतीने होणे आवश्यक आहे. याकरीता राज्य शासनाच्या धोरणानुसार कृती कार्यक्रमाची जबाबदारी विविध घटकांवर देण्यात येत आहे. पुढील विवरण तत्क्यामध्ये या कृती कार्यक्रमाची जबाबदारी पुढीलप्रमाणे सोपविण्यात येत आहे. सदर सूचनांचे पालन योग्य पध्दतीने व्हावे. तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. विहीत कालमर्यादेत सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
अ.क्र.
विवरण/कार्यवाहीचा अहवाल
अंमलबजावणी करणारे पदनाम
जबाबदारीचे विवरण / कार्यवाहीचे मुद्दे/तत्व.
कालमर्यादा
उपरोक्त नमूद जबाबदाऱ्या व कार्यवाही विहीत कालमर्यादेत करण्याची व्यवस्था आपल्या पातळीवर तातडीने करण्यात यावी. याअनुषंगाने आपण करीत असलेल्या कार्यवाहीचे अनुपालन व स्थितीचा पहिला आढावा दि.१०फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात येणार आहे. तद्नंतर दर १५ दिवसांनी आढावा होईल. अंतिम आढावा दि.१५ एप्रिल, २०२५ ला घेण्यात येईल.उपरोक्त सर्व जबाबदाऱ्या माहे एप्रिल २०२५, दिनांक १५ पूर्वी पूर्ण करणे अपेक्षित आहे. तसा अंतिम अहवाल प्रत्येक संबंधित अधिकारी यांनी आयुक्त शिक्षण कार्यालयास लिखित स्वरुपात दिनांक १५ एप्रिल, २०२५ पूर्वी सादर करणे आवश्यक राहील.परिपत्रक
या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा(
सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.) आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे