शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्डस कागदपत्रे अपलोड करणेबाबत Digital Service Records Documents Upload in Shalarth Pranali

Digital Service Records Documents Upload in Shalarth Pranali

Digital Service Records Documents Upload in Shalarth Pranali

Upload Documents Digital Service Records in Shalarth Pranali

Regarding uploading documents to the Digital Service Records in the Shalarth system.

Regarding uploading documents to the Digital Service Records in the Shalarth system.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

क्र.शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी / 1685296

दिनांक :- २१/०१/२०२६
22 JAN 2026

विषय :- शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्डस कागदपत्रे अपलोड करणेबाबत.

संदर्भः संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२५/टि-७/शालाथ/१४७००६१/दि.०६.१०.२०२५

उपरोक्त विषयास अनुसरुन शालार्थ प्रणालीमध्ये पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.

१) शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बील माहे १५. फेब्रुवारी २०२६ पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नाही. ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे डि.डि. ओ-२/शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक/सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याचाबत वैध/अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल.

२) डिडिओ २ स्तरावरील लॉगीन मधून डिजिटल सर्विस रेकॉर्डस या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या नोंदी संदभांत आवक नोंदीबाबत कार्यवाही न केल्यास डिडिओ २ यांना त्या देयकांचे MTR 44 A जनरेट करता येणार नाहीत.

३) चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे वय ६० पेक्षा जास्त, व इतर करीता वय ५८ पेक्षा जास्त तथा कमांडन्ट पदावरील वय ६२ असल्यास अशा कर्मचा-यांच्या जन्म तारखेबाबत डिडिओ १ व डिडिओ २ यांनी तपासणी करुन जर काही बदल असल्यास उपसंचालक यांच्याकडून सदर जन्म तारीख बदल करुन घेण्याची कार्यवाही १५ फेब्रुवारी २०२६ पूर्वी पूर्ण करावी. याबाबत आवश्यक ते तांत्रीक व्हॅलिडेशन शालार्थ प्रणालीमध्ये होणार आहे.

४) संच मान्यता मधील मंजूर पदांपेक्षा अधिकच्या पदांचे वेतन व भत्ते, थकीत देयके इ. अदा करता येणार नाही,

५) युडायस क्रमांक एका शाळेचा एकच असणे आवश्यक आहे. प्राथमिक/माध्यमिक/यापैकी एका स्तरांवर एकाच युडायसवर दोन किंवा अधिक शाळेचे देयक अदा होत असल्यास असे देयक अदा करता येणार नाही.

६) शालार्थ प्रणालीमध्ये आजमितीस वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचारी संख्येपेक्षा अधिकची सर्व पदे अकार्यान्वित करण्यात येत आहेत. यापुढे कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास सदर पद अकार्यान्वित करण्यात येईल.

७) संच मान्यता मंजूर पदापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्यास संचमान्यतेमधील मंजूर पदांच्या मर्यादेत पद नव्याने कार्यान्वित करावयाचे असल्यास डि.डि.ओ. १ ऑनलाईन विनंती प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्याकडे करतील. त्याची संचमान्यतेप्रमाणे पडताळणी करुन शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) हे सदर प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पद निर्मितीच्या शिफारशीसह पाठवतील. त्यानुषंगाने विभागीय उपसंचालक यांनी संचमान्यतेतील मान्य पदांच्या मर्यादेत राहून पद निर्मिती करण्याची कार्यवाही करावी.

तरी वरील दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे

प्रतः श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट, (शालार्थ सिस्टीम) महाआयटी, मुंबई. /- याबाबत आवश्यक ते तांत्रीक बदल शालार्थ प्रणालीवर करण्यात यावेत.

Digital Service Records Documents Upload in Shalarth Pranali
शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्डस कागदपत्रे अपलोड करणेबाबत Digital Service Records Documents Upload in Shalarth Pranali

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक), जि. प सर्व
३) शिक्षण निरिक्षक (उत्तर/ दक्षिण पश्चिम) मुंबई.
४) प्रशासन अधिकारी महानगरपालिका/नगरपालिका/ नगर परिषद, सर्व.
५) अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक/प्राथमिक) सर्व.

Leave a Comment

error: Content is protected !!