Shikshaketar Padbharti
Shikshaketar Padbharti
Recruitment of non-teaching Staff
Regarding recruitment of non-teaching posts
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
क्रमांकः- पदभ २०२५/प्र.क्र.७०२/टिएनटि-१
प्रति.
दिनांकः-२४ सप्टेंबर, २०२५
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषयः- शिक्षकेत्तर पदभरतीबाबत.
संदर्भ:
१) शासन निर्णय क्र. एसएसएन २६९५/ (३९६/९५/माशि-२, दि. ३१.१२.२००२.
२) मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांचे रिट याचिका क्र.४२१९/२०१८ प्रकरणी दि.११.०८.२०२१ चे आदेश.
३) शासन पत्र क्र संकीर्ण २०२२/प्र.क्र.५६/टिएनटि-१, दि.१४.०९.२०२२. ४) शासन निर्णय क्र संकीर्ण २०२५/प्र.क्र.६७/टिएनटि-१, दि.०४.०४.२०२५.
५) आपले पत्र क्र. शिसंमा/शिक्षकेत्तर पदभरती/कार्यासन-टि-४/२५९२, दि.२८.०५.२०२५
उक्त विषयाबाबत आपल्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राज्यातील खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सेवेत असाताना निधन झाल्यानंतर त्यांचे वारसांना नोकरी देणेबाबत संदर्भीय क्र. १ च्या शासन निर्णयान्वये धोरण विहीत केले आहे. यासंदर्भात मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल जनहित याचिका क्र.४२१९/२०१८ प्रकरणी मा. न्यायालयाने दि.११.०८.२०२१ रोजी आदेश पारीत केले आहेत. यामध्ये मा. न्यायालयाने अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे ही मानवेतेच्या दृष्टीकोनातून करण्यात आलेली कृती असून शिक्षणाधिकारी यांचेकडून शासन निर्णयांचा चूकीचा अर्थ लावून प्रस्ताव नाकारले जात असल्याचे नमूद केले आहे. वास्तविक अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावयाचे पद हे मूळतः मंजूर असते, केवळ त्या पदावर या तत्वांतर्गत नियुक्ती करावयाची असल्यामुळे ही नवीन पदभरती नसते किंवा ही नवीन पदनिर्मिती देखील नसते, असेही निरीक्षण मा. न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे या नियुक्तीवर कोणत्याही पदभरतीबंदीचा वा आकृतीबंध निश्चित नसल्याचा प्रभाव पडत नाही, असे मत मा. उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. तसेच, यापुढे अशा प्रकारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकरल्याविरुध्द यचिका मा. न्यायालयासमोर दाखल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई तसेच मा. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कारवाई करण्याचे संकेतही मा. न्यायालयाने दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर निर्णय घेताना संदर्भीय क्र. ३ येथील शासन पत्रान्वये अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यायवाचे पद हे यापूर्वीच मंजूर पद असल्याने व अनुकंपा तत्वावरील पदभरती ही नवीन भरती नसल्याने तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही करताना, पदभरती बंदी वा आकृतीबंध निश्चित नसल्याच्या कारणास्तव प्रस्ताव अमान्य न करता त्यावर गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.
०२. संदर्भीय क्र.४ येथील शासन निर्णयान्वये शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरतीस देण्यात आलेल्या मान्यतेस अनुसरुन सन २०२४-२५ ची संचमान्यता पूर्ण झाल्यावर रिक्त पदांचा आढावा घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्यानंतर शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरतीबाबत निर्णय घेतला जाईल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची शिक्षकेत्तर भरती करण्यात येऊ नये, असे आपण आपल्या स्तरावरुन सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना कळविले आहे. यामध्ये अनुकंपा तत्वावरील भरतीबाबतचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. सदरची बाब मा. न्यायालयाच्या उक्त संदर्भीय क्र.१ येथील आदेशाचा अवमान ठरु शकते. यास्तव मा. न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण व त्यानुसार दि.१४.०९.२०२२ अनुसार दिलेल्या सुचना विचारात घेता, अनुकंपा तत्वावरील पदे ही मंजूर पायाभूत पदे असल्याने आपल्या संदर्भीय क्र. ५ अन्वये निर्गमित सूचनांमधून अनुकंपा तत्वावरील नियुक्तीस वगळण्यात येऊन अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याबाबतच्या सूचना सर्व सबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना तातडीने आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात, ही विनंती.
(मनोज भि. काळे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रत माहितीस्तव तथा उचित कार्यवाहीस्तव अग्रेषित, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

