Deadline For Submitting Class Division Increase Proposal
Deadline For Submitting Class Division Increase Proposal
Deadline for submitting class division increase proposal to the government
Regarding setting a time limit for submitting proposals to the government regarding class division 5th 8th
Regarding setting a time limit for submitting proposals regarding batch expansion to the government
वर्ग तुकडीवाढी संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी कालमर्यादा आखून देणेबाबत
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांकः न्यायाप्र- २०२५/प्र.क्र. २७/ एसएम-५
४३६, ४था मजला, मंत्रालय (विस्तार), मुंबई
तारीखः २९ एप्रिल, २०२५
वाचा –
१) मा. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांचे नागपूर खंडपीठ यांचे रिट याचिका क्र. ६७९० /
२०१८ प्रकरणी दि. ३१.०१.२०२५ रोजी दिलेले आदेश
प्रस्तावना –
याचिकाकर्ते आदिम जाती जमाती बहुद्देशीय शिक्षण संस्था, अमरावती यांनी मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल केलेल्या रिट याचिका क्र. ६७९०/ २०१८ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.३१.०१.२०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार नवीन तुकडी सुरू करण्याचे प्रस्तावांवर शासनाने प्रत्येक वर्षाच्या दि. ३० एप्रिल पर्यंत निर्णय घ्यावा, जेणेकरून शैक्षणिक संस्था विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू करू शकतील. यानुषंगाने तुकडीवाढ संदर्भातील प्रस्ताव विहित वेळेत मंत्रालय स्तरावर उपलब्ध व्हावेत या दृष्टीने उक्त प्रस्ताव प्राप्त होण्याकरीता वेळापत्रक / कालमर्यादा आखून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
रिट याचिका क्र. ६७९०/ २०१८ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.३१.०१.२०२५ रोजी दिलेल्या सूचनांचे पालन करून तुकडीवाढीसंदर्भातील प्रस्ताव खालील वेळापत्रकान्वये संबंधित कार्यालयांकडे सादर करण्यात यावेत.
अ. क्र. १.
प्रस्ताव
तुकडी वाढ /इ. ५ वी व इ. ८ वी वर्गवाढ
शिक्षणाधिकारी
दि. ३१ ऑगस्ट पर्यंत
विभागीय संचालक
दि. ०१ सप्टेंबर ते दि.३१ ऑक्टोबर
उप शिक्षण संचालक दि. ०१
नोव्हेंबर ते दि. ३१ डिसेंबर
मंत्रालय स्तर दि.०१
जानेवारी ते दि.०१ मार्च
२. तसेच आगामी शैक्षणिक वर्षापासून जे परिपूर्ण प्रस्ताव वरील वेळापत्रकानुसार दि. ०१ मार्च नंतर मंत्रालय स्तरावर प्राप्त होतील, अशा प्रस्तावांवर पुढील शैक्षणिक वर्षात कार्यवाही करण्यात येईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०४२९१२५२०६१८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय / परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
उप सचिव, महाराष्ट्र शासन