D El Ed Admission D Ed Admission 2023-2024
डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सन २०२३-२४ (शासकीय कोटा) प्रसिद्धी निवेदन
शैक्षणिक वर्ष सन २०२३ २४ साठी डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरणेबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. |
१. दि. १३.६.२०२३ पासून वरील संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात होईल. |
२. अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वत:चा Email ID असणे बंधनकारक आहे. |
३. प्रवेश अर्ज शुल्क – खुला संवर्ग रु. २००/-, खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग रु.१००/- असे राहील. |
४. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र शुल्क भरावे लागेल. |
५. प्रवेश अर्ज शुल्क स्वीकारण्याची पद्धती – प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन / payment gateway / Ewallet स्वतःचे किंवा नातेवाईकाच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारेच स्वीकारले जाईल. |
६. प्रवेश पात्रता- प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.व्ही.सी शाखेतील पात्र उमेदवार इ. १२ वी खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग संवर्गासाठी किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
७. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणा-या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.. |
८. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी स्वतःच्या registered ई-मेलवरून support@deledadmission.in या ई-मेलवर पाठवाव्यात. |
९. प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. याबाबत वर्तमानपत्रात पुन्हा स्वतंत्र जाहिरात दिली जाणार नाही. त्यासाठी उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे. |
दि. ०६/०६/२०२३ स्थळ- पुणे |
(शरद गोसावी) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे तथा अध्यक्ष, राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समिती, पुणे |
डी एड बंद होण्याच्या बातम्यांना पूर्णविराम डी एड प्रवेशाचा मार्ग मोकळा (अध्यापक विद्यालय) परिपत्रक सविस्तर वाचण्यासाठी उपलब्ध सविस्तर वाचा वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा मा संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दिनांक २४ मे २०२३ परिपत्रक काढून पूर्ण विराम दिला आहे