दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी “माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत Celebration Of Right To Information Day

Celebration Of Right To Information Day

Celebration Of Right To Information Day

Mahiti Adhikar Din Sajra Karne

Celebration Of Right To Information Day

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

जा.क्र/प्राशिसं/८०२/संकीर्ण/२०२६-२७/२२०

दिनांक २४/०९/२०२६

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

       विषय :- दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी “माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत.

संदर्भ :- १. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि. २०.०९.२००८.

२. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र दि. २१.०९.२०२६.

३. कक्ष अधिकारी, एसडी-४, यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२२०/ई-१८६२४८१/एस.डी.४, दि. २४.०९.२०२६.

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रान्वये माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ बाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी “माहिती अधिकार दिन” साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी “माहिती अधिकार दिन” प्रभावीपणे साजरा करण्यात यावा.

सदर दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला इत्यादी स्पर्धांचे आयोजन, तसेच चर्चासत्रे, व्याख्याने व इतर जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात यावेत. तसेच, सदर उपक्रमांच्या आयोजनासाठी आवश्यकतेनुसार संबंधित शासकीय कार्यालये व स्थानिक सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात यावे. आपल्या स्तरावरून अधिनस्त सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना देऊन उपक्रमांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.

दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचा संक्षिप्त अहवाल, उपक्रमांची छायाचित्रे व सहभागींची माहिती आपल्या स्तरावर संकलित करून या कार्यालयास सादर करण्यात यावी. सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

प्रत माहितीस्तव सादर.

१. मा. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

२. संजय जगताप, कक्ष अधिकारी, एसडी-४, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

Celebration Of Right To Information Day
Celebration Of Right To Information Day

क्र.साप्रवि-१२०२३/२५/२०२५/साप्रवि/कक्ष-६

दिनांक : १२ सप्टेंबर, २०२५

विषय :- माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत…

संदर्भ:- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. केमाअ-२००८/प्र.क्र.३७८/०८/सहा, दिनांक २० सप्टेंबर २००८.

महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भाधीन दिनांक २० सप्टेंबर, २००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य पातळीवर दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तथापि, सन २०२५ चा माहिती अधिकार दिन हा शासकीय सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी येत आहे.

🙋 अधिक जाणून घ्या माहिती अधिकार दिनाबद्दल तसेच प्रश्नमंजुषा सोडवा Right to Information Act Quiz

२. वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन या वर्षी सोमवार दि. २९ सप्टेंबर, २०२५ रोजी “माहिती अधिकार दिन” साजरा करण्यात यावा. संदर्भाधीन दिनांक २० सप्टेंबर, २००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सुचनांचे पालन करुन आपल्या अधिनस्त कार्यालयांना “माहिती अधिकार दिन” साजरा करण्याबाबत सूचित करावे व सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा, ही विनंती.

आपला,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन)
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालयासमोर, मुंबई-४०००३२.

प्रति,
सर्व विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय.

प्रत- कार्यासन-६

IMG 20250914 063915
Celebration Of Right To Information Day

Leave a Comment

error: Content is protected !!