माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत Celebration Of Right To Information Day

Celebration Of Right To Information Day

Celebration Of Right To Information Day

Mahiti Adhikar Din Sajra Karne

Celebration Of Right To Information Day

क्र.साप्रवि-१२०२३/२५/२०२५/साप्रवि/कक्ष-६

दिनांक : १२ सप्टेंबर, २०२५

विषय :- माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत…

संदर्भ:- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. केमाअ-२००८/प्र.क्र.३७८/०८/सहा, दिनांक २० सप्टेंबर २००८.

महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भाधीन दिनांक २० सप्टेंबर, २००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य पातळीवर दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तथापि, सन २०२५ चा माहिती अधिकार दिन हा शासकीय सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी येत आहे.

🙋 अधिक जाणून घ्या माहिती अधिकार दिनाबद्दल तसेच प्रश्नमंजुषा सोडवा Right to Information Act Quiz

२. वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन या वर्षी सोमवार दि. २९ सप्टेंबर, २०२५ रोजी “माहिती अधिकार दिन” साजरा करण्यात यावा. संदर्भाधीन दिनांक २० सप्टेंबर, २००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सुचनांचे पालन करुन आपल्या अधिनस्त कार्यालयांना “माहिती अधिकार दिन” साजरा करण्याबाबत सूचित करावे व सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा, ही विनंती.

आपला,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन)
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालयासमोर, मुंबई-४०००३२.

प्रति,
सर्व विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय.

प्रत- कार्यासन-६

IMG 20250914 063915
Celebration Of Right To Information Day

Leave a Comment

error: Content is protected !!