Celebration of Farmers Day In Maharashtra State GR
पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या स्मरणार्थ दि.१९ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्यात “शेतकरी दिन” साजरा करण्याबाबत…
दिनांक : १२ ऑगस्ट, २०२४
प्रस्तावना :-
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ शासन निर्णय कृषि विभाग क्र. शेदिजा- २०१२/प्र.क्र.१५०/३जे, दि.१६.८.२०१४ अन्वये दि.२९ ऑगस्ट, हा दिवस “शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतक-यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून सन २०२४ मध्ये दि. १९ ऑगस्ट, २०२४ या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे
आणि हो 👇
राष्ट्रीय शेतकरी दिन महत्वपूर्ण माहिती व प्रश्नमंजुषा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा
शासन निर्णय :-
सन २०२४ मध्ये दि. १९ ऑगस्ट, २०२४ (नारळी पोर्णिमा) हा दिवस राज्यात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर कार्यक्रमासाठी कोणताही अतिरीक्त निधी उपलब्ध करुन देता येणार नाही. या कार्यक्रमासाठी कमीत कमी खर्च आयुक्त (कृषि) यांच्या अधिनस्त असलेल्या तरतुदीमधून करावा.
Also read राष्ट्रीय शेतकरी दिन National farmer’s Day
३. शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषि आयुक्तालयाने निर्गमित कराव्यात.
४. वेबिनार संवाद / मार्गदर्शन वर्ग आयोजित करुन दि. १९ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्यात यावा.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या Web LINK या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८१२१२४०२८१२०१ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(संतोष कराड)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या स्मरणार्थ दि.१९ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्यात “शेतकरी दिन” साजरा करण्याबाबत…
Celebration of “Farmer’s Day” in the Maharashtra state
महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१५४/३-अ मुंबई
दिनांक : १२ ऑगस्ट, २०२४
वाचा : १
. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्रमांकः शेदिजा-२०१२/प्र.क्र.१५०/३जे, दि.१६.०८.२०१४
२. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१५१/३-अ, दि.२१.०८.२०१८
३. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०१९/प्र.क्र.९६/३-अ, दि.०२.०८.२०१९
४. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२०/प्र.क्र.९५/३-अ, दि.३१.०७.२०२०
५. मा. विधीमंडळ सदस्य यांचे दि. २९.०७.२०२२ रोजीचे निवेदन क्र.१२४१९/२०२२
६. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१५४/३-अ, दि.०३.०८.२०२३
In memory of Padmashri Dr.Vikhe Patil
Padmashri Dr. “Shetkari Diwas” is celebrated in the state of Maharashtra on August 19, 2024 in memory of Vikhe Patil
Also Read 👇
29th August, Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil’s birth anniversary to be celebrated as Farmers’ Day in the state
२९ ऑगस्ट, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती राज्यात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याबाबत.
तारीखः १६ ऑगस्ट, २०१४
वाचा-
१) कृषि आयुक्ताल याचे पत्र क्र. कृमावि/शे. दिन / विप्र-४/४७१/२०१२, दि. ९जुलै, २०१२
२) कृषि आयुक्ताल याचे पत्र क्र. कृमावि/शे.दिन/विप्र-४/७६९/२०१४, दि. २५/१/२०१४.
प्रस्तावना-
राज्यामध्ये कामगार दिन, महिला दिन, आरोग्य दिन, बाल दिन, अपंग दिन, कृषि दिन याप्रमाणे वेगवेगळया विभागामार्फत वेगवेगळे दिन साजरे केले जातात. तथापि, राज्यातील जनतेला आवश्यक असलेले धान्य, फळे, भाजीपाला, पुरवठा करुन त्याची गरज भागविणा-या शेतक-यांसाठी कोणताही असा विशेष दिन साजरा केला जात नाही.
महाराष्ट्रातील शेतक-यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना शेतक-यांची सामाजिक, आर्थिक उंची वाढविण्यासाठी पद्यमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या शेतक-यांसाठीच्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे. पद्यमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकरी म्हणून शेतक-यांकरिता केलेल्या भरीव कार्याचे स्मरणे व्हावे व राज्यातील सर्व शेतक-यांचा सन्मान म्हणून दि. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय
दि. २९ ऑगस्ट हा दिवस राज्यात प्रतिवर्षी शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. शेतकरी दिनाचे कार्यक्रम आयोजनासाठी शेतक-यांकरिता चहापाणी, मंडप, हारतुरे, फोटो, फ्लेक्स, प्रदर्शन इ. बार्बीवर होणा-या खर्चासाठी निधीची आवश्यकता असते. गाव पातळीवर प्रती ग्रामपंचायत किमान रु. १५००/- तालुका स्तरावर प्रत्येकी किमान रु. २५००/- तसेच जिल्हा स्तरावर प्रती जिल्हा रुपये ५०००/- याप्रमाणे खर्च करण्यात येईल.
३. सन २०१४ या वर्षी ग्रामपंचायत स्तरावर २७,९०६/- ग्रामपंचायती, तालुका स्तरावर ३५६ तालुके आणि जिल्हा स्तरावर ३३ जिल्हयांमध्ये शेतकरी दिन आयोजित करण्यासाठी प्रति ग्रामपंचायत रु. १५०० याप्रमाणे २७,९०६ ग्रामपंचायातीसाठी रु. ४,१८,५९,०००/-, तालुकास्तरावर किमान रु. २५००/- यानुसार ३५६ तालुक्याकरिता रु. ८,९०,०००/- तसेच जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी शेतकरी दिन साजरा करणेसाठी प्रत्येकी रु. ५०००/- याप्रमाणे एकूण ३३ जिल्हयांकरीता रु. १,६५,०००/-तसेच राज्यस्तरावर प्रचार व प्रसिध्दीकरीता रक्कम रु. १५,००,०००/- असा एकंदरीत रु. ४,४४,१४,०००/- इतक्या खर्चास शासन मान्यता देत आहे.
४. प्रस्तुत खर्च आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावर उपलब्ध असलेल्या निधीतुन भागविण्यात यावा.
५. शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषि आयुक्तालयाने निर्गमित कराव्यात. कृषि आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर खर्च करण्यात यावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१४०८१९१६५७३३४९०१ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांकः शेदिजा-२०१२/प्र.क्र.१५०/३-अ,मंत्रालय, विस्तार, मुंबई ४०० ०३२.