Celebration of 21st June 2025 as the 11th International Yoga Day

Celebration of 21st June 2025 as the 11th International Yoga Day
क्र. शिर्समा/आंतरराष्ट्रीय योग दिन/विद्या शाखा/अ-२/२०२५२९८ zecz
दि. /०६/२०२५
17 JUN 2025
विषय: आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५.
संदर्भ :-
१. सह सचिव, स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र, दि.०६/०६/२०२१५.
२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र जा.क्र. शिआका/२०२५-२६/आस्था-क-माध्य, दि.१०/०६/२०२५.
३. शासन पत्र क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२२१/एस.डी.४, दिनांक १२/०६/२०२५,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, मा. पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली दि.२१.०६.२०२५ रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिन” देशभरातील अनेक ठिकाणी सकाळी ६:३० ते ७:४५ या वेळेत (योग संगम-सामूहिक योग प्रात्यक्षिक) आयोजित करण्यात येणार आहे. सदर दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग योग संगम प्रात्यक्षिकात सुनिश्चित करण्यासाठी शाळांनी प्रयत्न करण्याबाबत संदर्भीय पत्र क्र.१ व ३ अन्वये कळविण्यात आले आहे.
उपरोक्त केंद्र शासनाच्या संदर्भीय पत्र क्र.१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये करणेबाबत सूचना देण्यात याव्यात व याचाबतची नोंदणी केंद्र शासनाच्या विहीत पोर्टल बर करणेबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. तसेच मा. पंतप्रधान यांचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम विशाखापट्टणम येथे होणार असून विदर्भातील शाळा दि.२३ जुन २०२५ पासून सुरु होणार असल्या तरी सर्व शाळांनी सदर कार्यक्रमात सहभागी होणेबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना निदेश देण्यात यावेत.
सहभागी शाळांनी अधिकृत IDY पोर्टलवर आयोजक म्हणून नोंदणी करावी, जास्तीत जास्त सहभाग खालील नमूद केलेल्या गुगल स्प्रेडशीटमध्ये आणि आयुष लिकवर दर्शविला जाईल.
https://docs.google.com/spreadsheets/d/1OHipLg058TY5-wUXquuYwg HeFf9gXkwWeLlosx7c48/edit?gid=0#gid=0
https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam
वरीलप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास कळविण्यात यावा.
परिपत्रक पीडीएफ मध्ये या ओळीला स्पर्श करून प्राप्त करा
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे,
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व,
प्रत माहितीस्तव :-
१. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सविनय सादर.
२. श्री. अनिरुध्द कुलकर्णी, अवर सचिव (एस.डी. ४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांना सविनय सादर.
Also Read 👇
Celebration of 21st June 2025 as the 11th International Yoga Day SCERT GUIDELINES
दि २१ जून २०२५ हा दिवस अकरावा आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करणे बाबत
विषय: ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ साजरा करणे बाबत….
संदर्भ: श्रीमती अर्चना शर्मा अवस्थी, सहसचिव भारत सरकार यांचे पत्र क्र.D. O.
No.१३-१/२०२५-IS.४ दि.६ जून २०२५
उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार २१ जून २०२५ हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. या वर्षी ऐतिहासिक योग संगम हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते ७.४५ या वेळात पूर्ण देशभर विविध ठिकाणी साजरा करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सामान्य योग प्रोटोकॉल म्हणजे योगाच्या सरावासाठी निश्चित केलेल्या पद्धती ह्या आयुष मंत्रालयाच्या IDY पोर्टलवर २२ भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या वर्षीच्या योग दिनासाठीचा विषय “एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग” (Yoga for One Earth One Heath) असा आहे. आरोग्य, सुसंवाद आणि सजगता वाढीस लावणे असा ह्या उपक्रमाचा उद्देश आहे.
योग दिन साजरा करणेसाठीचे इतर सर्व साहित्य व १० प्रमुख उपक्रम हे
https://drive.google.com/drive/u/0/folders/1iRmU2qPHn0mjxGQyUYPJIX3Bt1oBIiMe
या लिंकवर उपलब्ध आहेत.
सदर उपक्रम शाळांमध्ये /संस्थांमध्ये आयोजित करण्यात यावा. शाळा किंवा संस्था त्यासाठी संदर्भीय पत्रामध्ये नमूद केलेल्या IDY च्या पोर्टलवर
https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam
या लिंकवर आयोजक म्हणून नोंदणी करू शकतात. तसेच
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार खालील प्रमाणे
🧘♂️ Join Yoga Sangam under IDY 2025! 🧘♀️
We request all schools, institutions, and individuals to register for the Yoga Sangam program as part of the International Day of Yoga (IDY) 2025 celebrations.
📲 Please scan the QR code above to complete the registration at the earliest.
यासाठी आपल्या कार्य क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या ( पी एम श्री शाळांसह) सर्व शाळा/संस्था यांना दि. २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ७.४५ या वेळेत शाळा सुरू ठेऊन विद्यार्थी व शिक्षक, पालक व समाजातील इतर लोक यांचा जास्तीत जास्त सहभाग सदर उपक्रमात असावा याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करावे.
यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक (सर्व )यांनी आपल्या जिल्ह्यात एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी. सदर नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांनी कार्यान्वित केलेल्या उपक्रमाबाबतची माहिती एकत्रित करून सोबत जोडलेल्या एक्सेल शीटच्या नमुन्यात ( PDF File नको ) इंग्रजी मध्ये भरून ……. या इमेल आय डी वर दि. २२ जून २०२५ रोजी ठिक 11.00 पर्यंत पाठवावी.
महाराष्ट्रामध्ये सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर योग दिन कार्यक्रम आयोजित करणे याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांनी आपल्या जिल्ह्यातील सदर कार्यक्रमाचा … या इ-मेल आय. डी. वर अहवाल सादहार होईल याबाबत खात्री करावी.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
संचालक (प्राथमिक/माध्यमिक)
शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत,पुणे-01.
प्रति,
१.विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,
२.उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व,
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
४.शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक ),जिल्हा परिषद,(सर्व)
५.शिक्षण निरीक्षक (पश्चिम,दक्षिण,उत्तर)
६.प्रशासन अधिकारी, (मनपा. नपा ) सर्व,
७.शिक्षणप्रमुख (मनपा)
Also Read 👇
Celebration of 21st June 2024 as the 10th International Yoga Day दि. २१ जून २०२४ हा दिवस दहावा आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करणे बाबत
Celebration of 21st June 2024 as the 10th International Yoga Day
शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक २१ जून रोजी साजरा करण्यात येतो. सयुंक्त राष्ट्रसंघाने “२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून घोषित केला आहे. यानुसार प्रतिवर्षी २१ जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत सविस्तर माहिती संकेतस्थळाला जोडले जाण्यासाठी स्पर्श करा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यानुसार योग विषयक दिलेल्या सुचनाचे पालन करुन जिल्हयामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा च्या संयुक्त विद्यामाने मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात यावा.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी खालील सुचनाचे पालन करण्यात यावे.
🧘♀️ आंतरराष्ट्रीय योग दिनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा
आंतराष्ट्रीय योग दिना बद्दल अधिक माहिती जानून घेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
१. जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने योग दिनाचे आयोजन करण्यात यावे.
२. शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन सी सी नेहरु युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यामध्ये सदर योग दिन साजरा करण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.
३. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाळामध्ये सदर दि नाचे आयोजन करण्यात यावे.
४. योग विषयक प्रचार व प्रसाराचे कार्य करणा-या विविध संस्था यांचे सहकार्य घेण्यात यावे. त्यांची बैठक आयोजित करुन त्यांचे मार्गदर्शक यांचे सहकार्य घेण्यात यावे.
५. मुख्य कार्यक्रमामध्ये मा. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नामांकित खेळाडू, नागरीक यांना आंमत्रित करण्यात यावे.
६. योग विषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी सदर दिनाचे महत्व विचारात घेऊन चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात यावे.
७. दिनांक २१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यशस्वीरित्या आयोजन संपन्न झालेनंतर त्याचा सविस्तर अहवाल क्रीडा संचालनालयास सादर करण्यात यावा. पेपर कात्रणे, योगा कार्यक्रमांचे करण्यात आलेले नियोजन, निश्चित केलेली स्थळे, फोटो, सहभागी युवक, युवती, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक इत्यांदी संख्या आंतरराष्ट्रीय योग दिनांचे आयोजन पुर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी दु. ३.०० वाजेपर्यत कार्यासन १० च्या ईमेल ला जोडले जाण्यासाठी स्पर्श करा वर पाठविण्यात यावी.+
उपरोक्त परिपत्रक पीडीएफमध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
सहसंचालक,
क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य