Bhatke Vimukta Divas ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणुन साजरा करणेबाबत शासन निर्णय

Bhatke Vimukta Divas

Bhatke Vimukta Divas

Vimukta Jati and Nomadic Tribes Diwas

Bhatke Vimukta Din

Regarding celebrating “August 31st” as “Bhatke Vimukta Divas”.

Bhatke Vimukta Diwas

31 august ha divas “bhatke vimukta divas” mhanun sajara karanebabat aavashyak nidhi vitaran, san 2026-27.

Disbursement of necessary funds for celebrating “31st August” as “Bhatke Vimukta Diwas”, year 2026-27.

Bhatke Vimukta Divas
Bhatke Vimukta Divas

“३१ ऑगस्ट” हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करणेबाबत आवश्यक निधी वितरण, सन २०२६-२७.

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र.९८/मावक, मुंबई-४०००२०.

दिनांक: २७/०८/२०२६

वाचा :-
१) इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२५/प्र.क्र.९८/मावक, दिनांक ३१/०७/२०२५.

२) संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम.एच.बी.कॉलनी शास्त्रीनगर, येरवडा, पुणे यांचे पत्र क्र. इमाबकसं/मावक/३१ ऑगस्ट-भटके विमुक्त दिवस/२६-२७/४७५१, दिनांक २०/०८/२०२६.

प्रस्तावना:-

सन १८७१ साली ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जमातींना गुन्हेगार म्हणून जाहीर केले. यामुळे या जातींमधील समाजबांधव स्वातंत्र्यानंतरही मुख्य प्रवाहापासून दूर राहीले. अमानुष अत्याचार पारतंत्र्यात सहन केल्यानंतर सुध्दा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भटके विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला, ज्याचे दिर्घकालीन समाजिक परिणाम या समाजावर झाले. स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ साली हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना “विमुक्त जाती” (म्हणजे मुक्त झालेल्या) म्हणून घोषित करण्यात आले. भटक्या जमाती (Nomadic Tribes) म्हणजे अशा समाजघटकांचा समूह की जे पारंपारिक पद्धतीने एकाच ठिकाणी न राहता फिरत्या स्वरूपात आपला उदरनिर्वाह करत असतात. भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहे. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्रउभारणातील योगदान पाहता त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस साजरा करण्यास संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार विविध उपक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यानुषंगाने संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांनी संदर्भाधीन क्र.२ येथील पत्रान्वये राज्यस्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संचालनालयास आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार उपलब्ध अर्थसंकल्पित तरतूद विचारात घेऊन आवश्यक निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

    शासन निर्णय :-

“३१ ऑगस्ट” हा दिवस “भटके विमुक्त दिवस” साजरा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपक्रम राबविण्यासाठी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे व त्यांच्या अधिपत्याखालील ०७प्रादेशिक कार्यालये व ३६ जिल्हास्तरावरील कार्यालये अशा एकूण ४४ कार्यालयांकरीता एकूण रुपये ३०,००,०००/- (अक्षरी रुपये तीस लक्ष मात्र) इतका निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर बाबीवर होणारा खर्च सन २०२६-२७ या वित्तीय वर्षात “मागणी क्रमांक झेड जी-३. प्रधानशीर्ष २२२५, अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्ग अल्पसंख्याक यांचे कल्याण, ०३ मागासवर्गीयांचे कल्याण, ००१ संचालन व प्रशासन, (०१) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण, (०१) (०१) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र संचालनालय (अनिवार्य) (दत्तमत) (२२२५ ई ७९५) या लेखाशिर्षाखाली “(१३) कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांतर्गत उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीत अनुदानातून खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. सदरहू निधी वितरीत करण्याकरीता संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे हे “नियंत्रक अधिकारी” तसेच संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण हे “आहरण व संवितरण अधिकारी म्हणून राहतील.

४. संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी ज्या प्रयोजनार्थ निधीची मागणी केली आहे, त्याच प्रयोजनार्थ निधी खर्च करावा. सदर निधी खर्च झाल्यावर त्याबाबतच्या खर्चाचे विवरण (जिल्हानिहाय खर्च) व उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासनास सादर करावे, वेळेच्या वेळी संबंधिताना वितरीत करण्यात येणाऱ्या रकमेचा वित्त प्रवाह (Cash Flow) बीम्स प्रणालीवर नोंदविण्यात यावा. तसेच, सदर निधी पूर्ण खर्च झाल्याबाबतच्या प्रमाणपत्रासह शासनास सादर करावा.

५. उपरोक्त आर्थिक वर्षातील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे तपासण्याच्या अधीन राहून निधी खर्च करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची राहील. तसेच, वित्तीय नियमावली, महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका यानुसार वेळोवेळी वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करुन कोणतीही वित्तीय अनियममितता होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांची राहील.

६. सदर शासन निर्णय वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक अर्थसं २०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक ०९/०४/२०२६ अन्वये विभागास प्राप्त अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२६०८२७१६२३३५३७३४ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Digitally signed by NITINKUMAR BABANRAO MAHADIK
Date: 2026.08.27 16:24:30 +05’30’

(नि.ब. महाडीक) कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

Bhatke Vimukta Divas
Bhatke Vimukta Divas

__________ ALSO READ _________

“३१ ऑगस्ट” हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणुन साजरा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-२०२५/प्र.क्र.९८/मावक, मुंबई- ४०००२०

दिनांक : ३१ जुलै, २०२५.

प्रस्तावना :-

सन १८७१ साली ब्रिटिश सरकारने C*riminal Tribes Act अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले. यामुळे या जातींमधील समाजबांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने भटक्या व विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला, पर्यायाने याचे दिर्घकालीन सामाजिक परिणाम या समाजावर झाले. स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी C*riminal Tribes Act हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना “विमुक्त जाती” (म्हणजे मुक्त झालेल्या) म्हणून घोषित करण्यात आले. भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहेत. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्रउभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” साजरा करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

     शासन निर्णय

“३१ ऑगस्ट” हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्यास शासन मान्यता देण्यात येत
आहे.

२. “भटके विमुक्त दिवस” हा दिवस राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर साजरा करण्यात यावा. सदर दिवशी भटक्या विमुक्त समाजाच्या संस्कृतीचे जीवनमुल्य, परंपरा दर्शविणारे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात यावे. शासकीय व अनुदानित आश्रमशाळा/शासकीय वसतीगृहे या ठिकाणी विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर/आधारकार्ड नोंदणी/जातीचे दाखले/जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांविषयी माहिती याकरीता शिबीराचे आयोजन करावे.

३. विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

४. “३१ ऑगस्ट” या दिवशी सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टी असली तरीही त्याच दिवशी “भटके विमुक्त दिवस” साजरा करावा.

५. सदर बाबीवर होणारा खर्च “मागणी क्रमांक झेड जी-३, प्रधानशीर्ष २२२५, अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्ग अल्पसंख्याक यांचे कल्याण, ०३ मागासवर्गीयांचे कल्याण, ००१ संचालन व प्रशासन, (०१) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण, (०१) (०१) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र संचालनालय (अनिवार्य) (दत्तमत) (२२२५ ई ७९५)” या लेखाशिर्षाखाली “१३-कार्यालयीन खर्च” या तपशीलवार शीर्षखाली असलेल्या अनुदानातून रु.१०.०० लक्ष इतक्या मर्यादेत खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

६. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०७३११७०८०७३५३४ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

उप सचिव, महाराष्ट्र शासन

IMG 20250801 083822
Bhatke Vimukta Divas
1753978196548
Bhatke Vimukta Divas

Leave a Comment

error: Content is protected !!