Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Social Equality Week Program
Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Social Equality Week Program
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याबाबत.
दिनांक : ३० मार्च, २०२६.
संदर्भ-
१. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक सान्यावि-२०२२/प्र.क्र.७८/बांधकामे, दि.५.४.२०२२.
२. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक सान्यावि-२०२२/प्र.क्र.७८/बांधकामे, दि.५.४.२०२२.
प्रस्तावना :-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक युग पुरुष व आधुनिक भारताच्या निर्मितीचे शिल्पकार होते. ते एक विद्वान कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, समाजसुधारक आणि द्रष्टे नेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधानात लोकशाही, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मुल्यांच्या आधारे आधुनिक भारताच्या विकासाचा पाया रचला आहे. ‘भारतीय संविधानाच्या उद्देशिकेनुसार सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय निश्चितपणे प्राप्त करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. राज्य घटनेच्या कलम ४६ मध्ये “राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करेल.” असे नमूद करण्यात आले आहे. वरील निर्देशांचे अनुषंगाने अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पीड़ीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. आपल्या संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाली असून,भारत देश एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान आहे.
मा. मुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे १५० वे वर्ष व महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष साजरा करण्याचा विशेष उल्लेख केला आहे. “महाड येथील चवदार तळे सत्याग्रह हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठीचा आहे” असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. सबब, या सर्व उपक्रम/योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, या करीता राज्यात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
राज्यात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम” दि.०८ एप्रिल, २०२६ ते १४ एप्रिल, २०२६ या कालावधीत साजरा करण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात येत आहे. राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या कार्यालयांना खाली नमूद केल्याप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश या शासन निर्णयान्वये देण्यात येत आहेत:-

२. उपरोक्त कार्यक्रमात परिस्थितीनुसार स्थानिक स्तरावर बदल करावयाचा असल्यास तो संबंधित प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या स्तरावर करता येईल.
३. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी त्या त्या जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांची राहील व कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पर्यवेक्षणाची जबाबदारी संबंधित प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण यांची राहील.
४. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीतून प्रत्येक जिल्हयाकरीता रु.३.०० लक्ष (अक्षरी रु.तीन लक्ष) इतका निधी संबंधित सहाय्यक आयुक्त यांना तात्काळ उपलब्ध करुन द्यावा.
५. व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित, मुंबई, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, मुंबई, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांनी त्यांचे स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच, आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा अहवाल शासनास सादर करावा.
६. सदर कार्यक्रम साजरा करतांना ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगर पालिका व राज्य निवडणूक आयोगाने घोषित/लागू केलेल्या अन्य कोणत्याही निवडणूक/पोटनिवडणूकीची आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
७. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०३३०१३४६४१०४२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

HARSHADEEP SHRIRAM KAMBLE
(डॉ. हर्षदीप कांबळे) प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक: सान्यावि-२०२५/प्र.क्र.२७/बांधकामे
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
ALSO READ –

Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Social Equality Week Program
Samajik Samta Saptah Karykram Sajra Karne
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम साजरा करणेबाबत.
संदर्भ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय, क्रमांक सान्यावि-२०२२/ प्र.क्र.७८/बांधकामे,
दिनांक ५.४.२०२२.
प्रस्तावना :-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ४६ मध्ये समाजातील दुर्बल घटक व वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केलेली आहे. भारतीय राज्यघटना कलम ४६ अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनः यामध्ये “राज्य, जनतेतील दुर्बल घटक, आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे रक्षण करील.” असे नमूद करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेतील या तत्वांच्या अनुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक तसेच सर्व प्रकारचे पीड़ीत आणि शोषितांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यर्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी याउद्देशाने दरवर्षी दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत राज्यात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” हा कार्यक्रम साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व वचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी याउद्देशाने दरवर्षी दि.८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत राज्यात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांनी व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व कार्यालयांनी खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश या शासन निर्णयान्वये देण्यात येत आहेत:-



२. उपरोक्त कार्यक्रमात परिस्थितीनुसार स्थानिक स्तरावर बदल करावयाचा असल्यास तो संबंधित प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण व सहाय्यक आयुक्त, समानकल्याण, यांच्या स्तरावर करता येईल.
३ ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्याची सर्वस्वी नबाबदारी ही संबंधित निल्हयातील सहाय्यक जायुक्त समानकल्याण यांची राहील. सदर कार्यक्रम यशस्वीपणे आयोजन करण्याची व पर्यवेक्षणाची जबाबदारी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण यांची राहील.
४ सदर कार्यक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हानिहाय एकत्रित सविस्तर अहवाल मायुक्त समानकल्याण, पुणे यांनी दरवर्षी शासनास सादर करावा,
५. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maliarashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०४०४१२५८२८५५२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नादेशानुसार व नावाने.
(सो.ना. बागुल) सह सचित्र महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक: सान्यावि-२०२५/प्र.क्र.२७/बांधकामे मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई