Balbharati Textbooks Change
Balbharati Textbooks Change
Regarding the change of curriculum
Regarding newly published textbooks and changes in textbooks…
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, ‘बालभारती’ सेनापती बापट मार्ग, पुणे
क्रमांक : ३/४/६/112-4
दिनांक : १९.०५.२०२५
परिपत्रक
विषय : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नव्याने प्रकाशित करावयाची पाठ्यपुस्तके तसेच पाठ्यस्तकांच्या बदलाबाबत…
संदर्भ : १) परिपत्रक क्रमांक व/ड/६/५९५७ दिनांक २४.०१.२०२४
२) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र २१६/ एसडी-४ दिनांक २८.०१.२०२५
३) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र ९४/एसडी-४ दिनांक १६.०४.२०२५
४) नियामक मंडळ ठराव क्रमांक ५५४९ दिनांक २६.०३.२०२५
संदर्भीय शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भाने झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.
१) संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून दिली जातील.
२) संदर्भ क्रमांक ३ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून टप्प्या-टप्प्याने खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.
अ.क्र. अंमलबजावणी वर्ष इयत्ता
१) शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ – इयत्ता १ ली
२) शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ – इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वी
३) शैक्षणिक वर्ष २०२७-२०२८ – इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी व ११ वी
४) शैक्षणिक वर्ष २०२८-२०२९ – इयत्ता ८ वी, १० वी व १२ वी
३) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १ लीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार असून पूर्वीप्रमाणेच नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून दिली जातील. तसेच अनुक्रमांक २ नुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याने त्या-त्या शैक्षणिक वर्षानुसार सदर इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.
🙋 हे आपण वाचलत का ? मग हे हि वाचा
पाठ्यपुस्तकांचा इतिहास काय आहे जाणून घ्या या ओळीला स्पर्श करा
४) इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीची सर्व नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून दिली जातील.
५) इयत्ता १ लीच्या खेळू-करू-शिकू या पाठ्यपुस्तकाऐवजी शिक्षक हस्तपुस्तिकेची निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद, पुणे कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
६) इयत्ता १ लीसाठी “खेल खेल मे सिखे हिंदी” (मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी) या पाठ्यपुस्तकाबाबत सर्व संबंधितांना अलहिदा कळविण्यात येईल.
७) मराठी शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांतील इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मजेत शिकूया’ मराठी या पाठ्यपुस्तकासंदर्भात अलहिदा कळविण्यात येईल.
🙋 हे आपण वाचलत का ? मग हे हि वाचा
Balbharati Aitihasik Bodh Kathamala Link
८) शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ (जून २०२५) हे इयत्ता २ री, इयत्ता ३ री, इयत्ता ४ थी व इयत्ता ६ वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे या इयत्तांच्या
पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.
९) इयत्ता २ री ते इयत्ता ८ वीच्या एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय, मुल्यमापन योजना समान आहे. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारीत आहेत. याबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घेण्यात यावी.
१०) पाठ्यपुस्तक मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्था यांना पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर १५ टक्के वटाव देण्यात येतो. तथापि, दिनांक २६.०३.२०२५ पासून फक्त एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर अधिकचा ५% बटाव देण्यात येईल. सदर रकमेचे समायोजन हंगाम कालावधी संपल्यानंतर करण्यात येईल.
११) पाठ्यपुस्तक मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्था यांचेकडे इयत्ता ३ री ते ८ वीच्या शिल्लक असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत निवेदन प्राप्त झाल्यास विक्री हंगामानंतर सदचा विषय नियामक मंडळाच्या सभेत सादर करण्यात येईल, तनंतर घेतलेला निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यात येईल.
तरी वरीलप्रमाणे पाठ्यपुस्तकांची रचना व बदलाबाबतची नोंद राज्यातील सर्व नोंदणीकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर सर्व संबंधितांनी घ्यावी.
संचालक,
पाठ्धपुस्तक मंडळ, पुणे