Amendment In Policy Of intra District Transfers
Amendment In Policy Of intra District Transfers
विषय :- सन २०२५ मध्ये होणा-या जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे बदल होणेबाबत.
महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे बदल व्हावे असे वाटते.
१. सद्या एकत्र असलेले (३० कि.मी. च्या आतील) बदलीपात्र पती-पत्नी शिक्षक यांना तसेच संवर्ग २ मधील शिक्षकांना बदली प्रक्रिया २०२५ मध्ये संवर्ग १ प्रमाणे नकार देण्याची संधी मिळावी, जेणेकरुन बदल्यांची संख्या कमी होईल ही विनंती.
२. या आधीच ३० कि.मी. च्या आतील सदर पती-पत्नी शिक्षकांचा / संवर्ग २ शिक्षकांचा जोडीदार, यंदाच्या बदल्यांमध्ये बदली पात्र असल्यास, संवर्ग-२ प्रमाणे सर्व रिक्त जागा बदली पात्र सर्व शिक्षकांच्या जागा दाखवल्या जाव्यात ही विनंती.
३. पती-पत्नी यांना प्राधान्य देवून त्यांचे शासन धोरणानुसार एकत्रिकरण अबाधित ठेवावे ही विनंती.
४. अवघड क्षेत्र बदली राऊंडमध्ये पती/पत्नी विस्थापित संख्या मोठ्या संख्येने वाढेल या करिता नकाराची संधी द्यावी.
तरी, वरील प्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत बदल होणेबाबत विनंती आहे.

आपला,
(दादाजी भुसे)
ALSO READ 👇
Amendment In Policy Of intra District Transfers
Amendment in the policy of intra-district transfers of Group-C (Class-3) and Group-D (Class-4) cadre employees in the government decision of the Zilla Parishad dated 15th May 2014.
जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा.
दिनांक :- २८ मार्च, २०२५
वाचा :-
१) शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४
२) शासन पूरक पत्र क्र.जिपब-४८१७/प्र.क्र.२२८/आस्था-१४, दि.७.३.२०१९
शासन पूरकपत्र
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४ नुसार निश्चित केलेले आहे.
सदर शासन निर्णयातील प्रकरण-१ मधील कलम ३ (क) येथे “विधवा, परित्यक्ता/घटस्फोटित महिला कर्मचारी यानंतर व कर्करोगाने (कॅन्सर) आजारी/पक्षघाताने आजारी/डायलेसिस सुरु असेलेले कर्मचारी या अगोदर “४० वर्षावरील वयाच्या अविवाहित महिला कर्मचारी” असा मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.
सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३२८१३१२१४३२२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन पूरकपत्र क्रमांकः जिपब-४८१७/प्र.क्र.२२८/आस्था-१४ ,मंत्रालय, मुंबई